Literature

मार्गशीर्ष वद्य एकादशी

प्रीतीनेच प्रीती वाढते असा मानवी मनोधर्म आहे. हीच गोष्ट देवलोकासही उपयोगी पडणारी आहे. म्हणजेच परमात्म्यासंबंधीही तीच गोष्ट योग्य ठरणारी आहे. परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यभाव, प्रेम, प्रीती ठेवणे हीच भक्ती होय. त्या भक्तीस अनुरूप अशीच प्रीती परमात्माही दाखवितो. सर्व शक्तिमान अशा भगवंताच्या कृपेने कोणती गोष्ट सहजरित्या साधणार नाही ? सावकार किंवा अधिकारी यांचा विश्वास संपादून व सेवा करून त्यांना संतुष्ट करून आपणांस हवे असलेले प्राप्त करून घेणे शक्य होते. असे असल्याने आपल्या भक्तीने संतुष्ट झालेला परमात्मा प्रसन्न झाल्यावर काय साध्य करून घेता येणार नाही. तो परमेश्वराजवळ अचल भक्तीची याचना करील. ‘ तुझी कृपा निरंतर राहू दे ‘ अशी परमेश्वराजवळ पुन्हा पुन्हा प्रार्थना करील व त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचाच अनुभव घेत सदासर्वदा आनंदीत राहील.

परमेश्वराची प्रीती प्राप्त करून घेण्यासाठी विभिन्न योग साधनीभूत असलेले तरी त्यात भक्तियोगच श्रेष्ठ व सुलभसाध्य आहे. पण विश्वासरहित भक्तीने कोणताही मार्ग सुगम होत नाही. *’ अन्यस्मथ सौलभ्यं भक्तौ ‘* यांचे तात्पर्य इतर मार्गापेक्षा भक्तिमार्गातच जास्त सुलभता आहे हेच होय. भक्तीचे मुख्यलक्षण अनन्य शरणागतीच !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img