Literature

मार्गशीर्ष वद्य चतुर्थी

सनातन धर्मामुळे निर्मल असे विश्वबंधुत्व व स्थिर अशी जनशांतता प्राप्त होत असल्याने त्याकडे चिकित्सक दृष्टीने पहाणारा सुशिक्षित वर्ग निराळाच. सनातन धर्माचा निःपक्षपातीपणाने अभ्यास न करता उगीचिच वाचाळपंचविशी करणारा वर्ग आज मोठ्या प्रमाणात शिल्लक राहील किंवा नाही हा एकच प्रश्न आहे. तथापी निराश होण्याचे कारण नाही. कारण सनातन धर्म स्वयंप्रकाशी आहे. जगातील सर्व कोलाहल नष्ट करून सर्व मानवांना सनातन धर्मास शरण जावे लागेल.

सनातन धर्म मानवाच्या उत्कृष्ट जीवनाच्या कोणत्याही अंशाला कमी लेखीत नाही. इतकेच नव्हे तर मानवकुलाला हितकर अशा शास्राचे अत्युत्तम सार त्यामध्ये सामावले आहे. इहपरलोक मिळवून देणारा, शेवटी निरवधिसुखाचे ध्येय पुढे ठेवणारा, सर्व जनतेस ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार योग्य लाभ देणारा व सर्व वाहकता असलेला धर्म म्हणजेच सनातन धर्म होय. ऐतिहासिक दृष्ट्या अवलोकन केल्यास जगातील सर्व धर्म या सनातन धर्मापासून झाले आहेत अथवा कांही अशीं त्याचेच अनुकरण करणारे आहेत असे आढळून येते.
अशा अगाध सुखस्त्रोत असलेल्या सनातन धर्माचे अवलंबन करून सर्व मानव मोक्षाकडे म्हणजेच परमात्मसुखाप्रत जावोत, अखंड सुख मिळोत हेच या मानवीजीवनाचे ध्येय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img