Literature

मार्गशीर्ष वद्य दशमी

अखिल सनातन धर्मानुयायींच्या जीवनाचा अंतर्भाव ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र अशा चार वर्णात व ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रसथी व संन्याशी या चार आश्रमात होतो. मानवजीवनाचाच हा स्वाभाविकच धर्म होय. विधर्मीयामध्येही कोणत्या ना कोणत्या रूपांत वर्णाश्रम चालु आहेत. आपल्या धर्माने मात्र त्याला व्यवस्थित रूप दिले आहे. इहपरगतीसाठी सांगितलेला भगवत् प्रणीत धर्मच सनातन धर्म होय. हा जगाच्या उत्पत्तीपासून चालत आला आहे. त्यामुळे यातील सर्व तत्त्वे सुसंबध्द आणि इह-परकल्याणसाधक निश्चितपणे होत. ब्राह्माणापासून अंत्यजापावेतोच्या सुविधेसाठी, सुखी जीवनासाठी, समाज व्यवस्थेसाठी पूर्वसंस्कार पाहून भगवंताकडून केला गेलेला श्रमविभागच वैदिक वर्णविभाग होय. आपल्या अधिकारप्राप्त वर्ण व आश्रमानुसार वागून कर्म उपासनाद्वारे शेवटी ज्ञानाच्या योगाने ब्रह्मैक्य संपादन करणे वेदोक्त धर्म होय.

चार आश्रमामध्ये भोगापासून मोक्षापर्यंत सर्व सुखसाधनांचा अंतर्भाव झाला आहे. मानवीजीवन सफल करण्यासाठी ‘ असे करा व असे करू नका ‘ अशा प्रकारचा विधायक उपदेश करून सदाचरणाकडे प्रवृत्त करणारा सनातन धर्म होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img