Literature

मार्गशीर्ष वद्य द्वादशी

भक्ताने केलेली प्रार्थना परमात्मा ऐकत असतो. त्याची स्तुती स्तवनें करणाऱ्यांची संकटे तो नाहीशी करतो. ‘ जो अनन्यभावाने माझे स्मरण करतो त्याला मी सुलभ आहे. ‘ तसेच ‘ माझ्याठायी मन गुंतविणारा माझ्या कृपेमुळे सर्वसंकटापासून मुक्त होतो. ‘ असे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे. पण हे केव्हा शक्य आहे ?

असे समजा की, एक सावकार आहे त्याच्याकडे एक गरीब मनुष्य दान किंवा मदत मागण्यासाठी नव्हे तर कर्ज मागण्यासाठी गेला. त्याने सावकारास ‘ मी व्याजासह मुद्दल परत करीन ‘ जसे सांगितले. सावकार हा सर्वांना कर्ज देत असतोच पण प्रत्येक मनुष्याची परीक्षा करूनच तो कर्ज देत असतो. त्याचबरोबर त्याने इतरांकडून कर्ज काढले की काय ? तो दिलेले पैसे परत करील किंवा नाही ? याचीही खात्री करून घेतो. तसेच हा कर्ज घेण्याच्या लायकीचा आहे किंवा नाही ? याचाही पूर्ण विचार करून मगच कर्ज देत असतो. त्याचप्रमाणे परमेश्वरही आपल्या भक्ताच्या योग्यतेची परिक्षा करीत असतो. ती परिक्षा म्हणजे सुसंस्कृत मन, परिशुध्द आचरण, अनन्य शरणागती हे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत किंवा नाहीच हे पाहुनच भक्ताच्या भक्तीची किंमत ठरवून परमात्मा त्यास मुक्ती देतो. वरील गुण नसलेल्यास अर्थातच मुक्ती प्राप्त होत नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img