Literature

मार्गशीर्ष वद्य द्वितीया

सनातन धर्म हा संपूर्ण विश्वाचे जीवन होय. इतकेच नव्हे तर तो जीवनाचा आधार आहे. सत्यसुखाची दृष्टी संपूर्ण जगतात पसरवून जगदोध्दार करणारा आहे. आता हे पहा सनातनधर्माच्या ईश्वर प्रार्थनेचे उदात्त स्वरूप.

*’असतो मा सद़्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय | मृत्योर्मा अमृतं गमय |’* ‘ मिथ्याचा नाश करून मला सत्याची प्राप्ती करवून दे. अंध:काराचा नाश करून स्वयंप्रकाश दे आणि मृत्यूपासून सोडवून मला आत्मस्वरूपात विलीन कर. ‘ हीच ती सनातन धर्माची प्रार्थना.

हा नरदेह कितीही चांगला असला तरी तो एक साधनरूप असल्याने आपणास येणाऱ्या अनुभवाचे निरीक्षण केल्यास किंवा या देहाचे परिशीलन केल्यास या देहाचा शेवट नरकांतच आहे असे आढळून येते. या नरकातून मुक्ती प्राप्त करून घेणे हेच मानवजन्माचे सार्थक व या विमोचनासाठी एकमेव उपाय म्हणजे मनास विषयापासून निवृत्ती करणे हाच होय. मन सदासर्वदा निर्विषयी राखणे हेच मुमुक्षुंचे कर्तव्य होय. विषयकल्पनारहित असणारे मनच मोक्षप्राप्तीस अनुकूल असते बाकी इतर साधने म्हणजे योग, त्याग इत्यादीसुध्दा मनाच्या विषय वासनाच होत. विषयकल्पना काढून टाकून मन निराकार करण्यासाठी योगयागादिकांचा उपयोग होतो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img