Literature

मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा

नव प्रजातीपैकी अत्रि महर्षींनी आपल्या अनुसया नावाच्या अर्धांगीसह केलेल्या तपाचे फळच श्री दत्तांचा अवतार. त्यांच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मा-विष्णु-महेश्वरांनी करण्याचे ठरविले व तिघेही त्यांचे पुत्र झाले. तिघांचेही एकवटलेले रूप म्हणजेच हा श्रीदत्तावतार ! *’गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः |* *गुरूसाक्षातपरब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः |’* श्री सद्गुरूच ब्रह्मा, चतुर्भुज विष्णु, त्रिनेत्र शंकर व साक्षात् परब्रह्म. त्या सद्गुरूला माझा नमस्कार असो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. श्रीगुरू हा त्रिमुर्तीस्वरूपी असतो हे तत्त्व त्रिमुर्तींनी जो अवतार घेऊन जगाच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले तोच हा श्री दत्तगुरूंचा अवतार. या देवत्रयाला ज्या ब्रह्मस्वरूपाचे प्रतिक म्हणून मानिले जाते. ते ब्रह्मच आपल्या सत्, चित्, आनंद या पदत्रयाच्या त्रिमुखाने जेव्हा प्रगट झाले तेव्हा सच्चिदानंद ब्रह्मालाच ‘ श्री दत्त ‘ हे नांव आले ‘ स्मरणानुगामी ‘ असे याचे विशेषण आहे.

अविनाशी स्वरूपामुळे, वरिष्ठत्वामुळे, धुवून गेलेल्या संसारबंधनामुळे व तत्त्वमस्यादि वाक्यांच्या लक्षार्थामुळे त्यांना ‘ अवधुत ‘ म्हटले जाते. यांत अ, व, धू, त या चारी अक्षरांच्या पृथक व्याख्या दिल्या आहेत. श्रीदत्तांची स्थितीही ‘ अवधुत ‘ आहे. ‘ अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त ‘ असा त्यांचा जयजयकार. संपूर्ण ज्ञानवैराग्याच्या पराकाष्ठेचे हे स्वरूप असल्याने त्यांना ‘ श्रीगुरू ‘ म्हणतात. निरिच्छेमुळे हे अत्यंत लवकर प्रसन्न होत असल्याने त्यांना ‘ अशुतोष ‘ असेही नाव पडले आहे.

*बोला अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त !*

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img