Literature

मार्गशीर्ष वद्य सप्तमी

आपणांस दृष्टी आहे तशी आंधळ्यास नसते असे आपण म्हणतो. पण सत्य शोधू गेल्यास आपण आंधळ्यापेक्षाही आंधळे आहोत. अंधास वस्तू दिसत नाहीत. तसेच आपणही स्वतःस पाहू शकत नाही. आपल्याला तळहात दिसतो. त्याचप्रमाणे देहाच्या पुढील सर्व भाग पाहू शकतो. पण आपणांस स्वरूपभूत असलेला परमात्मा पाहू शकत नाही. आंधळ्यास दिसत नाही म्हणूनच आपण आपला गौरव करून घेणे योग्य ठरेल काय ? परस्त्रीच्या रूपदर्शनाने कामुक वासना निर्माण झाल्यास तुम्हास दृष्टी असून काय उपयोग ? असलेली दृष्टी नरकास कारणीभूत होत असेल तर तुमच्यापेक्षा अंधच श्रेष्ठ असे कां म्हणू नये ?

सामन्यजनांची दृष्टी अल्प म्हणजेच मंद असते. त्यादृष्टीने परमात्मा दिसणार नाही. म्हणून आपल्या दृष्टीस ज्ञानदृष्टी प्राप्त करून घेऊन तिची शक्ती वाढविल्यास सृष्टी पहाणे शक्य होईल. या सृष्टीचा निर्माता कोण आहे ? अशा कूतूहलाने पाहू गेल्यास ज्ञानदृष्टी वृध्दिंगत होणे शक्य आहे. ती दृष्टी वाढल्यास तिच्या परमात्म्यास पहाण्याची शक्ती येऊ शकेल या दृष्टीलाच ‘ सत्यदृष्टी ‘ म्हणतात.

या विनाशी जगात अविनाशी अशा एकमेव परमात्म्यास जो पहातो तेच दृष्टीवान होय. तोच यथार्थाने पाहतो असे भगवद़्गीतेत म्हटले आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img