Literature

मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी

पालन करणे हे विष्णूचे कार्य आणि तो एका क्षणांत जगाचा नाश करतो. सर्व लोकांचा काळ मीच असल्याने वाढणाऱ्या स्वर्ग, मृत्यू, पाताळादी सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी निघालो आहे असे श्रीकृष्णानीच सांगितले आहे. म्हणून तोच ब्रह्मा, विष्णु, रूद्रही तोच. कार्यपरंपरेने परमेश्वरास ही नावे मिळाली आहेत. या तिन्ही अवतारात एकमेव परमात्माच व्यापला आहे.

परमात्म्याचा प्रकाश मुक्तांच्याद्वारे अवतारामधून प्रगट होत असतो. परशूरामाचा अवतार म्हणजे परमात्म्याचा अनुग्रहाने सामर्थ्य मिळवून झालेला अवतार. अशाप्रकारे धर्मस्थापनेला आवश्यक असे सामर्थ्य परमात्म्याकडून अनुग्रहित झाल्याबरोबर झालेला अवतार तो विष्णूचाच अवतार म्हणता येईल. या दृष्टिकोनातून आपल्या भारतवर्षात जे जे धर्मस्थापनेसाठी झटले, कोणत्या तरी एका धर्मस्थापनेस ध्येय मानून ज्यांनी आपले आयुष्य घालविले ते सर्वजण अवतारीच ! निरालसता, नि:स्वार्थता, सत् शील लोकहिताच्या दृष्टीने पूर्वाचार दृढमूल करण्यासाठी जीवन समर्पण केलेले सर्वही अवतारच ! त्यांच्या त्याच्यातील कार्यकक्षा कमी जास्त असू शकतील. परंतु त्यांची योग्यता समानच असते. विस्तव लहान मोठा असला तरी तो अग्नीच नाही कां ? धर्मपालन हे कार्य विष्णूचेच. म्हणून धर्मकार्याची प्रवृत्ती असणारे सर्वजण विष्णूचे अवतार !

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img