Literature

मार्गशीर्ष शुद्ध तृतीया

मानवी जीवनास सावलीप्रमाणे असणारे अल्पसुख प्राप्त करण्याने धन्यता नाही. त्याने कोणतीही तृप्ती मिळत नाही. इतकेच नव्हे तर विषयाधीनता, अल्पता, परिवर्तनशीलता, विनाश अशा निरनिराळ्या दोषांनी अतृप्ती व अधन्यता वाढून मन विषण्ण होते. मानवी जीवनांचे ध्येय अल्पसुख नव्हे तर अनंतसुख हेच होय. विषयांपासून अपार दुःख अल्पसुखप्राप्ती होणार ! आपले ध्येय अनंत सुख प्राप्त करून घेण्याचेच आहे.

विषयसुखाच्या अनुभवाने विषयतृष्णा वाढतात. त्यायोगे जीवनध्येय साध्य होऊ शकत नाही. विषयामुळे जन्ममरणाची प्राप्ती होत असते. मृत्यूप्रिय असलेल्या विषयांत मन गुंतवून त्यासाठी प्रयत्नशील असणे हे मानवी जीवनांचे ध्येय नसून ध्येयाविरूध्द असेच वागणे होय. अशा विषयांच्या मोहात न पडता परमात्मप्राप्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असले पाहिजे. मानवामध्ये जन्मतःच विवेक असतो व मानवाच्या वाढीप्रमाणे तो वाढत जातो. मात्र या विवेकावर अज्ञानाचे पटल असते. त्यामुळे इतके दिवस तो धाव घेण्याचे श्रम करीत असतो. निरनिराळ्या जन्मात गुरफटतो आणि इकडे तिकडे धाव घेत इतस्ततः फिरत असतो. आतापर्यंत झालेल्या गोष्टी विसरून, झालेल्या अनर्थांचा हिशोब न करता अनर्थपरंपरेतून बाहेर पडणे हे जागृत मनुष्याचे लक्षण होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img