Literature

मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी

अवतरण म्हणजे खाली उतरणे. अवतार म्हणजे कोणीतरी वर असलेला खाली आला, असा त्याचा अर्थ. त्यादृष्टीने वरच्या लोकांत असणाऱ्या वैकुंठ, कैलास, ब्रह्मादिलोकामध्ये असणारे उच्च अशा देवत्वामध्ये असणारे परमात्मा किंवा परमात्मभक्त जगाला मार्गदर्शन करण्यासाठी भूलोकी जन्म घेतात तेव्हा त्याला ‘ अवतार ‘ असे नांव दिले जाते.

या अवताराचा उद्देश कोणता ? तर धर्मस्थापना हा अवताराचा मुख्य उद्देश. *’धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |’* धर्मस्थापनेचा हव्यास असणाऱ्यांना अवतार म्हणावे असाच याचा अर्थ. म्हणजेच धर्मस्थापनेचा संकल्प ज्यांच्याठायी उदय पावतों हेंच अवतारांचे लक्षण होय. अवतारात पूर्णावतार व अंशावतार असे दोन क्रम आहेत. ब्रह्मा, विष्णू व शंकर या त्रिमूर्ती धर्मस्थापनेच्या संकल्पाने धरणीतलावर जन्म घेतात तेव्हा त्याला पूर्णावतार असे म्हणतात. इतर वेळी तेवढ्या शक्तीच्या देवतेचे काम नसल्यास त्रिमूर्तीच्या आज्ञेने संकल्पाने त्यांच्या भक्तांचे अवतार होतात. हे अंशावतार ‘ पतीतपावन ‘ म्हणून घेणारे भक्तगणही पुन्हा पुन्हा धर्मस्थापना करतात. तेव्हा त्यांनाही अवतार म्हणतात.

जगाचे पालन करण्यासाठी धर्मस्थापनेची आवश्यकता असते. म्हणून त्यासाठी जगपालनकर्ता विष्णूच धर्मरक्षणासाठी अवतार घेतो असे म्हटले जाते. धर्मस्थापनेच्या उद्देशाने झालेले श्रीशंकराचे अवतारही विष्णूचेच कार्य करणारे असल्याने तेही विष्णूचेच अवतार होत असे म्हणता येईल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img