Literature

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा

मानव या जन्मांत विवेकी बनून सुखस्वरूप होऊ शकतो. त्याला हे न उमजल्यास तो मोठ्या गर्तेत पडण्याची शक्यता असते. जन्म म्हणजेच दुःख, अशाश्वता योग्य साधनांनी पूर्ण सिध्दी प्राप्त झालेले महात्मे परमात्म्याकडे येतात. अशा लोकांना पुनर्जन्म नाहीच. परमात्मप्राप्तीसाठी मिळालेल्या जन्माचे योग्य साधनाद्वारे सार्थक न करता विषयातच मग्न होणारे लोक पापी होत. अशा मूर्ख अधम लोकांना खरे सुख मिळत नाही.

मानवी जीवनाची सार्थकता सिध्द करण्याच्या कार्यात मनालाही महत्त्वाचे स्थान आहे. मानवजन्माच्या प्राप्तीसाठी मन ही एक अमोल चीज आहे. जगव्यवहारात ते एक साधन आहे. मानवास प्राप्त होणाऱ्या अनेक शक्तींचे उगमस्थान मनच. कोणत्याही कार्यसिध्दीसाठी मन खंबीर असावे लागते. हे मन ज्या विषयांचे चिंतन करील तोच आपणास प्राप्त होणार ! मन ज्याचे ध्यान करील तत्स्वरूपी आपण होतो. विषयात आसक्ती ठेवून त्यांचेच चिंतन केले तर मन त्यातच जड, मूढ होईल. त्यातील क्षणभंगुरता, दुःख असे दोष आपणांतच आहेत असा भास होईल. असे होण्याने स्वतःचा खरा अधिकार मानव गमावून बसेल.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img