Literature

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी

विषयसुख हा मानवाच्या प्रगतीला किंवा ध्येयाला अडथळाच होय. हा अडथळा दूर करण्याची शक्ती मानवामध्ये नाही काय ? ज्या नरजन्मांत स्वेच्छापूर्वक विवेक व संयम करता येतो त्या जन्मात विषयरूपी पिंजरा नष्ट करण्याची शक्ति आहे. परंतु काही दिवस त्याच्या जीवनामध्ये विवेक सुप्त असतो. त्याला सावधानतेने जागृत केले पाहिजे. विवेक आणि संयम यांनी विषयसुखबीज नष्ट करून खऱ्या सुखासाठी प्रयत्न करून प्रगति करणे हे मनुष्यत्वाचे मुख्य लक्षण होय.

अपवित्र वासनांचे निर्मूलन झाल्याशिवाय परमात्म्याचे म्हणजेच दिव्य प्रकाशाचे दर्शन होणार नाही. परमात्मा आपल्या अनंत सुखरूपाने उपमारहित असल्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे मनुष्याचे महत्त्वपूर्ण कर्तव्य होय.

दृश्य पण नष्ट होणारे अपरिमित दुःखदायी अशा विषयसुखाचा संबंध तोडून मन परमात्म्याकडे वळविणे हीच जीविताची धन्यता होय, जीविताचे सारसर्वस्य होय आणि तेच आपल्या जीवनाचे ध्येय होय. ते साधल्यानेच आपली कर्तव्यकर्मे संपुष्टात येतात.

विषयसुखाचा उपभोग घेतल्यानंतर दुःखप्राप्तीच होत असल्याने ते सोडून खरे सुख प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करणे हा उत्तम मार्ग होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img