Literature

यज्ञोपवीताचे थोर सामर्थ्य

अष्टोत्तर शतोपनिषदांपैकी अथर्ववेदांतर्गत परब्रह्मोपनिषदांत या यज्ञोपवीताचा विचार केला आहे. तो पाहूं.

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे । स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ 

या सर्व यज्ञाच्या अधिकाराचें यज्ञोपवीत हें एक चिन्ह आहे. या यज्ञोपवीतांत सूक्ष्मरूपाने सर्व कांही सांठविले आहे. जे इथे नाहीं तें कुठेच नाही व जे इथे आहे तेंच सर्वत्र व्यापून आहे. यज्ञोपवीत हें ब्रह्मोपदेश झाल्याचे एक लक्षण आहे. असार देहाचे ते एक साररूप आहे. वेदाच्या अनंत सामयीकडे नेण्याचें तें एक सूक्ष्म द्वार आहे. अभ्युदय-निःश्रे यसाच्या उन्नत मार्गांतली यज्ञोपवीत ही एक विजयमाळ आहे. निरवधि आनंद धन परब्रह्माच्या ऐक्यरूप योगाचा यज्ञोपवीत हे एक अधिकारपद आहे. यांन पिंडब्रह्मांडाचे ऐक्य आहे, जीवब्रह्माचे ऐक्य आहे.

home-last-sec-img