Literature

रजोगुण

अलीकडच्या काळांतल्या लोकांना यांत बरेंच समजून घेण्यासारखे असल्यामुळे माहितीकरितां हा भाग मुद्दाम येथे दिला आहे. रजोगुण येतां शरीरीं । वर्तणूक कैसी करी । साबध होऊनि चतुरीं ।परिसावें २ ५ ७. माझें घर माझा संसार । दैव कैचा आणिला थोर ।। ऐसा करी जो निर्धार  तो रजोगुण ॥ ८ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । दुसऱ्याचें अभिळाषावें । तो रजोगुण ॥ १० ॥ ऊँचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैचें ध्यान  विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥ नेणें तीर्थ नेणें व्रत । नेणें अतिथी अभ्यागत । अनाचारों मनोगत तो रजोगुण ॥ १२ ॥ धन धान्याचें संचित  मन होये द्रव्या सक्त । अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ॥ १३ ॥ मी तरुण मी सुंदर।मी बलाढ्य भी चतुर । मी सकळांमध्ये थोर । म्हणे तो रजोगुण ॥ १४ ॥ दुसऱ्या सर्व जावें । माझेच बरें असावें। ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण ॥ १६ ॥ कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार । अथवा कामाचा विकार । तो रजोगुण ॥ १७ ॥ वैभव देखोनि दृष्टी आवडी उपजली पोटीं । आशागुणे हिंपुटीं । करी तो रजोगुण ॥ २२ ॥ विनोदार्थों भरे मन । शृंगारिक करी गायेन । रागरंग तानमान । तो रजोगुण ॥ २४ ॥ उन्मत्त द्रव्यावरौ अति प्रीति । ग्रामज्य आठवे चित्तीं । नींचाची संगति । तो रजोगुण ॥ २८ ॥ तस्करविद्या जीवीं उठे। परशून्य ..बोलावें वाटे । नित्यनेमास मन विंटे। तो रजोगुण ॥ २९ ॥ देवाकारणी लाजाळु । उदरालागीं कष्टाळु । प्रपंचीं जो स्नेहाळु । तो रजोगुण ६०गोडग्रास आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण रजोगुणें उपोषण केलें न वचे ॥ ३१ ॥ शृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे कळालाघवीं पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥ नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थी प्रेमा । बळात्कारें घाली जन्मा। तो रजोगुण ॥ ३३ ॥

home-last-sec-img