Literature

राज्यकर्त्यांची जबाबदारी

कामवृत्तः स्वयं लोकः कृत्स्नः समुपवर्तते । 

यद्वृत्ताः सन्ति राजानस्तद्वृत्ताः सन्ति हि प्रजाः

–स्वाभाविकतःच सर्व लोक स्वेच्छाचारी असतात. राजानेच आपल्या अधिकाराच्या बळाने व शासनाच्या भीतीने त्यांना देवधर्मपर व नीति न्यायपर करावयाचे असतें. असे असतां राजानेच जर देवधर्म व नीतिन्यायांचा त्याग केला, राजाच जर स्वेच्छाचारी बनला तर प्रजेला शासन करणारा कोण ?  यथा राजा तथा प्रजा.’ राजाप्रमाणे प्रजाहि भ्रष्टाचाराने वागू लागते. अशा रीतीनें प्रजेच्या अधोगतीला राजाच कारण होतो. दुर्वृत्त राजा प्रथम स्वतः बिघडून नंतर आपल्या सर्व प्रजेलाहि तो बिघडवितो.

home-last-sec-img