Literature

विधवांच्या केशवपनाबद्दल विचार

विधवांच्या केशबपनाबद्दल व पुनर्विवाहाबद्दल अलीकडे समाजांदन पुष्कळ ‘ भवतिं न भवति ‘ होते, शास्त्रकारांनी विधवांच्या केशवपनाबद्दल पुनर्विवाहाबद्दल जो इतका निषेध केला आहे त्यांत तच काय आहे याचा विचार करूं. विधयाकेशवपनाचा विषय येथे घेऊ. पुनर्विवाहाचा मार्गे थोडा विचार झाला आहे. ग्रंथविस्तारभयाच्या दृष्टीने तो तेवढाच पुरे करूं.

केशवपनांत विधवांनी संन्यस्त होऊन मोक्षमागांत राहावे हा हेतु आहे व त्याकरितांच ‘ विधवा यतिमार्गेण — संन्याश्याप्रमाणेच विधवांनाहि ही मुंडनाची दीक्षा दिली जाते हैं विसरता कामाचे नाही.

विधवा यतिमार्गेण कुमारी च विशेषतः । तांबूलाभ्यंजने चैव कांस्यपात्रे च भोजनम् ॥ यतिश्च ब्रह्मचारी व विधवा च परित्यजेत् । —विधवा, कुमारी, संन्यासी व ब्रह्मचारी या सर्वांनाहि कामादि विकारापासून अति दूर राहावयास पाहिजे असल्यामुळे, यो चौघांनाहि एकाच सदरांत ठेवून कामोत्तेजक, तांबूल, तैलाभ्यंजनस्नान, काशाच्या पात्रांत जेवणे इत्यादि करूं नये म्हणून नियम घालून दिले. शीलाचे पालन व्हावे म्हणून शास्त्रकारांनी किती बारीक विचार करून त्याकरितां कसे दूरदृष्टीचे व खोल विचाराचे नियम घालून दिले ते कळून आले की त्यांच्याविषयींचे प्रेमाश्रु कृतज्ञतेने त्यांना स्नान घालण्याकरितां स्त्रवू लागतात, गळा दाटून येतो.

आतांच्या काही शास्त्रीपंडितांची, नेत्यापुढाऱ्याची पद्धत मात्र या पूर्वीच्या ऋषिमुनींच्या पद्धतीहून अगदीच वेगळी. न स्त्रीणां वपनं कुर्यात् न च गोव्रजनं स्मृतम् । न च गोष्टे वसेद्रात्रौ न कुर्याद्वैदिकीं श्रुतिम् ||१६|| सर्वान्केशान्समुच्छ्रित्य च्छेदयेदङ्गुलद्वयम् । एष एव तु नारीणां शिरो मुंडापनं स्मृतम् ॥ १७ ।। ( बृहद्यम स्मृति अ. ४) याच अर्याचे असेच श्लोक यमस्मृतींत सुद्रां आले आहेत. सर्वान्केशान्समुद्धृत्य च्छेदयेदंगुलद्वयम् | एवमेव हि नारीणां मुंडमुंडापनं स्मृतम् ॥ न स्त्रिया वपन कार्य न च वीरासनं तथा। न च गोष्टे निवासं च न गच्छन्तीमनुव्रजेत् ॥ (यमस्मृति)

विधवांच्या केशवपनाबद्दल विचार (५४-५५) अशा ‘बादरायण’ संबंधाच्या अप्रासंगिक लोकांचा आधार घेऊन स्त्रियांना बपनच निषिद्ध आहे, बाकीचे कॅस वर धरून दोन बोटभर केस फार तर काढावेत, स्त्रीमुंडनाचा प्रकारच असा आहे, सबंध शिरोमुंडन स्त्रियांना सांगितलेच नाही म्हणून खुशाल थापवजा विधान करतात; आणि विधवाकेशवपन निषेध म्हणून नांव देऊन, हें कळण्याइतके पांडित्य कोणालाच नाही म्हणून त्यांत हे श्लोक अगदी निर्भयपणे खुशाल देतात. मांजर डोळे झांकून दूध पिते, ही म्हण या अशा शास्त्रपंडितांची कृति दर्शविते. प्रायश्चित्तांगवपनस्य एवमादिविषयेऽपवादः । प्रायश्चित्तांगभूत वपनाचा स्त्रियादिकांच्या विषयीं अपवाद आहे. म्हणजे श्री, राजा, राजपुत्र, बहुश्रुत ब्राह्मण यांना वपनाशिवायच नुसतें प्रायश्चित्त द्यावे व इतरांना मात्र सक्षौर प्रायश्चित्त द्यावे हा येथील आशय आहे. या ठिकाणी प्रायश्चित्तांगरूप केशवपन सुवासिनी स्त्रियांना निषिद्ध आहे. फार झालें तर बाकीचे केंस वर धरून दोन बोटेंच केंस काढले म्हणजे झालें असें इथे वास्तविक सांगितलें असतांना ‘ विधवाकेशवपन-निषेध ‘पर हीं वाक्यें आहेत म्हणून विधान केलें जातें याला काय म्हणावें ! घटं भिंद्यात्पटं छि॑िद्यात्कुर्याद्गर्दभगायनम् । येन केन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत् । अशांतलाच हा प्रकार झाला.

राजा वा राजपुत्रो वा ब्राह्मणो वा बहुश्रुतः । अकृत्वा वपनं तेषां प्रायश्चित्तं विनिर्दिशेत् ॥ ( यमस्मृति ५५ ) न स्त्रिया वपनं कार्य — या यमस्मृतीच्या ५४ व्या श्लोकाच्या पुढचाच राजा, राजपुत्र व बहुश्रुत विद्वान ब्राह्मण असल्यास यांना मात्र इतरांप्रमाणे सक्षौर प्रायश्चित्त न देता नुसते प्रायश्चित्त द्यावें या अर्थाचा श्लोक लागोपाठ आला आहे. यांतून राजा, राजपुत्र व विद्वान ब्राह्मण यांना क्षौरच निषिद्ध आहे म्हणूनहि प्रसंगीं विधान ठोकून द्यावयाला असले पंडित मागेपुढे पाहाणार नाहींत असें वाटते. कोणी पायावर येऊन पडला अथवा पैसे चारले अथवा आपल्या किंवा आपल्या कडच्या माणसांच्या कृत्याचे समर्थन करावेंसें वाटलें तर कांहीं पंडित वाह्वतात, वाटेल तसा अर्थ करतात व कुठलें तरी अप्रासंगिक वाक्य ‘ आधारें लावून आपली टिमकी वाजवितात. अधर्म आणि अनीतीच धर्म व नीति म्हणून शाखाचं प्रमाण दाखवून सिद्ध करतात. खऱ्या सज्जन विद्वानांच्या ओरडीविरु • अधिकाराचा फायदा घेऊन तसेच कायदे करतात. आपल्याबरोबर  समाजालाहि असे नासून टाकतात. यांनी आपल्याशीच आपल्या समाजाच्या अहिताचा कृत्याचा व त्यामुळे आपल्याबरोबर होणाऱ्या विचार करावा. हा एक विद्यामदाचा, अभिमानाचा, वृत्तीचा धर्मपराङ्मुखतेचा, परदुःखशीतलतेचा व आपल्या दुष्कृत्यावर संभावितपणे पांघरुण घालावयाचा, अशा मताचा स्थापक व प्रचारक बनण्याच्या राक्षसी हव्यासाचा पंडितमन्य शिष्टांच्या आचरणांतून दिसून येणारा मोठा समाज कंटक दुर्गुण आहे. याचा त्यांनीच विचार करून अमागांतला आपला असा हट्ट नाहीसा करावा. एरवी त्यांना कोण सांगणार : सांगितले तरी ते कुणाचें ऐकणार ! यांच्याविरुद्ध शास्त्राप्रमाणे सांगणे व वागणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. मोठ्यांनी समजून आपले दोष सुधारावेत. त्यामुळे स्वपर हित होते.

वरचे स्त्रीकेशवपननिषेधाचे लोक ‘गोधाती स्त्रीपुरुषांच्या प्रायश्चित्त प्रकरणांत आले आहेत. बृहद्यम स्मृतीच्या चवथ्या अध्यायांत गोवधे चैव यत्पापं बलीबर्दस्य चैव हि । प्रायश्चित्तं भवेत्तत्र स्त्रिया या पुरुषस्य चा || ४|२|| अशा रीतीने विषयाला प्रारंभ झाला आहे. गोधाती मनुष्याला सक्षौर प्रायश्चित्त देऊन गाईमध्ये रात्री ठेवावें म्हणजे गोठ्यांतच राहवात्रे. दिवसा गाईच्या पाठीमागे जावयाला सांगून गाईची सेवा करावयास सांगावी. ज्याचा अपराध त्याच्याच सेवेने त्याचा अनुग्रह संपादावयाचा असतो, या नात्याने हे विधान आहे. पुरुषांना प्रायश्चित्त सांगितल्यानंतर स्त्रियांना सांगतांना वर दिलेले श्लोक दिले आहेत. न स्त्रीणां वपनं कार्यं । त्रियांचे पूर्ण वपन करवूं नये. न च गोव्रजनं स्मृतम् । गाई चारायला गाईंबरोबर पाठवू नये. न च गोष्ठे वसेद्रात्रौ । रात्री गोठ्यांत तिने असू नये. न कुर्याद्वैदिकी श्रुतिम् । पुरुषाप्रमाणे त्यांना पापनाशक वैदिक मंत्र ऐकवूं नयेत. सर्वान्केशान्समुच्छ्रित्य च्छेदयेदंगुलद्वयम् । एष एव तु नारीणां शिरोमुंडापनं स्मृतम् ॥ बाकीचे केस वर धरून दोन बोटे मात्र केस काढावेत. सुवासिनी स्त्रियांचा प्रायश्चित्तांग शिरोमुंडनाचा असा हा प्रकार आहे असे सांगितले आहे. असे असतां हे लोक विधवाकेशवपन निषेधपर आहेत म्हणून सांगून कांही विद्वान म्हणविणारे बहुजन समाजाला एकदम बुचकळ्यांत पाडून किंकर्तव्यमूढ करून टाकतात. तसेच पुनर्विवाहाच्या बाब तीतहि नष्टे मृते प्रत्रजिते क्लीवे च पतिते पतौ । पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते || (पाराशरस्मृ. ४-३०) या श्लोकाचा अर्थ विपरीतपणे करून पुनर्विवाहाला या श्लोकाचा आधार दाखवितात. सप्तपदी व लाजा होम होण्याच्या पूर्वी कोणत्याहि प्रकारानें नाहींसा झाल्यास, पूर्वी एकाला • दाखवून ऐन अंतरपाट धरावयाचे वेळी ज्याच्याशी कोणीहि लग्न करून घेणार नाही अशाला उभा केल्यास, मरण पावल्यास, पळून गेल्यास, भ्रष्ट, पतित, व्यसनी असल्यास, पुरुषत्व नसल्यास, व्यंग असल्यास या पांचांपैकी कांहीं दोष पतीच्या बाबतीत आढळून आले अथवा संभवले तर या पांच आपतत (सप्तपदी, लाजाहोम होईपर्यंत पतिपत्नीचा संबंध दृढ होत नसल्या मुळे त्याच्या आंत ) दुसऱ्याशी त्या मुलीचा विवाह करून द्यावा असे यांत विधान आहे. श्रीसमयांनी लग्नमंडपांतून ऐन ‘सावधान’ म्हणण्याच्या प्रसंगी विश्वकल्याणाकरितां धूम ठोकल्यानंतर त्या भानजी गोसाव्यांच्या मुलीचें याच श्लोकाच्या आधारें दुसरे लग्न झालें. सप्तपदी व लाजाहोम यांपूर्वीच अंतर्पट धरण्याचें व ‘सावधान’ म्हणण्याचे विधान असतें. पुनर्विवाह व विधवांचे केशधारण यांनी समाजाचे कल्याण होण्याऐवजी ऐहिक पारलौकिकहि अकल्यागच होतें, हें पारमार्थिक दृष्टीने विचार करणाऱ्या कोणासहि आढळून येईल.

केशवपन विधवेनें न केल्यास केसाच्या शुश्रूषेत अनुष्ठानाचा बराच वेळ जातो. इच्छा असो वा नसो डोक्याला तेल लावणे, विंचरणें, आठाठ दिवसांनी न्हाणे, डोक्यांत सांचलेला मळ घालविण्या करितां शिकेकाईचा उपयोग करणें; कांहीं प्रयोजन नसतां अशा या नसत्या प्रयत्नांनी वेळ दवडणें, असे हे सर्व करावेच लागते. आरशात तोंड पाहावें लागते. एखाद्या वेळी सौंदर्याची कल्पनाहि येते, देहाभिमानाकडे वृत्ति वळते. कामादिकांचे अंकुर फुटतात, अमार्गी प्रवृत्ति होते व करूं नये तेन कृत्य हातून घडून स्त्रीपर इहपर गतीवर बोळा फिरविला जातो. समाजांत ते विषारी वायुप्रमाणेच पुढें राहतात. सर्वांच्याच बाबतीत असें होतें असें सांगतां आलें नाहीं तरी आधुनिक समाजाचे निरीक्षण करून बहुतेकांचें असे होतें असें सांगतां येईल. केशवपनानें सौंदर्याची आकर्षकता कमी करून होईल तितका दुसऱ्यापासून होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आहे. दुष्ट लोकांची दृष्टि सकेशांकडे गेल्याइतकी केश काढलेल्या स्त्रीकडे जात नाहीं, हेहि पण आढळून येतें. सौंदर्यात भर पाडणारे केश असतात. स्त्रियांना देहाच्या सौंदर्याची कल्पना दृढमूल असते. केशधारणानें देहाच्या अभिमानाकडे व क्रमेण विकाराकडे झुकण्याचा संभव बराच असतो. केश काढल्यानें त्यांच्या देहाभिमानावर मोठीच गदा पडते. परमार्थाला अनुकूल होते. त्यागाची वृत्ति वाढते. त्यागद्योतक ही संख्यासाची दीक्षा आहे. अशी जाणीव मनांतबिंबलेली असली तर ती क्षणोक्षणी जागे करते. आडमार्गावर शक्यतों जाऊं देत नाही. शास्त्रकारांनी यांच्याकडे पूज्य दृष्टीनेंच बघण्यास समाजास शिकविले आहे. पारमार्थिक त्यागाचे तें एक संन्यासासारखेच प्रतीक मानावें म्हणून शास्त्राचे सांगणे आहे. ‘गंगा भागीरथी’ म्हणून पत्रांत लिहिण्याची पद्धत आहे. ही पद्धत देखील किती त्यांच्याविषय पूज्यभावना निर्माण करते व पूज्य दृष्टीनें बधावें म्हणून शिकविते. केशवपनानें स्त्रियांच्या ठिकाणचा कामविकार बराच कमी होतो हें तत्त्व आर्यांनी चोखाळूनच हा नियम विधवांच्या बाबतीत घातला. केशवपन केलेल्या विधवेची दागिन्याची हांव नष्ट होते. मोठमोठी जरीकांठी लुगडी, शालू, पैठण्या यांची हौस नष्ट होते. विरक्तीकडेच मन वाहू लागते. एक वेळ जेवणाच्या नियमानें जिन्हेंवरहि ताबा मिळतो. नियमांच्या आचरणानें मन पवित्र होते. जीवनाच्या गरजा कमी होतात. वैराग्याच्या उत्कर्षानें ज्ञानाभ्यासास अनुकूल होते. केशवपनानें विधवा स्त्रियांचे सौंदर्य घालवितात, त्यांना मुद्दाम विद्रूप करतात; कां तें या विवेचनाने लक्षांत येऊन आक्षेपास कारण उरणार नाही. अलीकडे विधवा स्त्रिया केस ठेवतात, बांगड्या, पाटल्या घालतात व चोळी किंवा पोलके घालतात. कुंकू लावतात, दागिने घालतात. काळी पोतहि कुठे कुठे दिसते. ही सर्व प्रवृत्तीची सौभाग्यद्योतक लक्षणे आहेत, संन्यासयोतक नव्हेत. कंचुकं न परिध्यात् । चोळी घालू नये इत्यादि श्लोकांनी या सर्वांचा निषेध केला आहे. आतां तर याहून पुढची मजल म्हणजे पुनर्विवाहच होतो. पारमार्थिक दृष्टीने व शास्त्रीय दृष्टीने हा केवळ अधःपात आहे, हे कळकळीनें प्रगट बोलून दाखवावे लागते.

कोणी पाहूं नये म्हणून खोलीत बसवून केशवपन करवितात. नापिक दुष्ट असला तर ती विधवा शीलभ्रष्ट होते; नाहीं तरी त्याचा स्पर्श असह्य होतो, इत्यादि सर्व आक्षेप घालवावयाचे असल्यास, त्याला स्त्रीयाकरितां नापिकांच्या स्त्रियांचीच योजना करावी म्हणजे अशा कोणत्याच आक्षेपाला जागा मिळत नाही.

home-last-sec-img