Literature

विधवांसाठी पारमार्थिक संस्था

संन्याश्यांच्या संस्थेप्रमाणे यांच्याहि संस्था निर्माण व्हाव्यात व त्यांत यांना ध्यानधारणेचें, वेदान्तविचाराचे शिक्षण मिळावे. केवळ पारमार्थिक वातावरणांत जीवन घालविण्यास सांपडावे. नवरा मेला म्हणजे ती माहेरी 

अथवा सासरी मजूरणीसारखी बघण्यांत येते; तिला राबवून घेण्यातयेते. तिचे आयुष्य इतरांची बाळंतपणे करण्यांत व मुलामुलींच्या घाणीची बस्ने धुण्यांतच जात. नाहीतर कुठे स्वयंपाक करून जीवन चालविणे येऊन बेतते अथवा तिला परिचारिका (नस) किंवा मास्तरीण व्हावे लागते. आवश्यकतेने हे इष्ट वाटल्यास नसावे असे म्हणणे नाही. त्यांचे रक्षण व्हावे व समाजाने त्यांच्याकडे पूज्यतेनें पाहावे हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. पुन्हा अशा निराश्रित दीन स्त्रियांवर परधर्मी व दृष्ट स्वधर्मी लोकांचेहि डोळे असतात. पर मार्याची माहिती नाहीं, उच्च आदर्श पुढे नाही व त्यांना भ्रष्टविण्याचा इतर दुष्टांचा प्रयत्न अशा खाईंतून मनाच्या वाढत असलेल्या विकारावर आळा घालणें जड जाऊन स्वमनाने अथवा बलात्काराने त्या शेवटी शीलभ्रष्ट होतात. त्यांच्याकरितां पारमार्थिक शाळा, पारमार्थिक संस्था, स्वतंत्र मठ निर्माण करून यांच्याकडून तात्त्विक सेवा होईल असे करावें. त्या ठिकाणी त्यांचीच व्यवस्था असावी. समाजाने यांच्याकडे पूज्य दृष्टीनेच पाहावें. असे घालून दिलेले नियम आंगवळणी पडले म्हणजे यांना समाजाकडून त्रास न पोहोचता यांच्याकडून कीर्तन-प्रवचन-व्याख्यानद्वारे स्त्रियांतून तरी धर्मजागृती करवून घेता येईल. उच्चनीतीचे, तत्त्वज्ञानाचे घडे जगाला मिळतील. इतर संपत्तीप्रमाणेच तात्विक आचारविचाराची ही एक संपत्ति आहे. त्याच्या उपार्जनाकरितां अशा संस्था कार्य करतील. नाहीतरी पारमार्थिक मठ, आश्रम, संस्था यांतून समाजाचे थोडे पैसे खर्च होत नाहीत ! त्यांत अशा पवित्र संस्थांची भर पडेल. सत्कार्याच्या आधिक्याने राष्ट्राची आवकहि वाढते, कमी होत नाहीं. अधर्मराहटीनें राष्ट्रांत दारिद्य वसते. अशा विधवांच्या आश्रमानें समाजांतली अधर्मप्रवृत्ति, नीतिभ्रष्टता व भ्रष्ट प्रजेची उत्पत्ति थांबेल व राष्ट्राचे इहपर कल्याण होईल. पुनविवाह, घटस्फोट, असवर्ण विवाह, सगोत्र विवाह इत्यादि समाजघातक कायद्यांपेक्षां उच्च नीतीचे, उन्नत सुखाचे असे सरकारानें कायदे केले तर राष्ट्र थोडक्याच काळांत आपल्या उन्नत कीर्तीनें जगांत मिरवेल, राष्ट्रांत सुखशांति व अचल वैभव नांदेल.

home-last-sec-img