Literature

विधवाधर्म

प्रवृत्तिनिवृत्ति स्वरूपाच्या गृहस्थाश्रमांत प्रवृत्तीचें अंग गेल्यानंतर एक निवृत्तीच उरते आणि ती मग त्या सतीपतीपैकी उरलेल्याचे कर्तव्य गणली जाते. निवृत्ति म्हणजे विषयाची निवृत्ति. हाच मोक्षधर्म. कामं तु क्षपयेद्देहं पुष्पमूलफलैः शुभैः । न तु नामापि गृण्हीयात्पत्यौ प्रेते परस्य तु ॥ (मनु. ५-१५७ ) — विधवेनें पवित्र व शुद्ध अशा फलमूलपुष्पांच्या सात्त्विक आहारानें राहावें. तें शक्य न झाल्यास एक वेळ जेवावें. अन्न पवित्र व सात्त्विक असावें. नियमबद्ध शुद्ध आचरण असावें. जप, तप, पूजा, पारायण, श्रवण यांत दिवस काढावेत. निष्ठेनें राहावें. पंतिनिधनानंतर पुनर्विवाह राहिलाच पण परपुरुषाचें नांवसुद्धां तिनें घेऊं नये. प्रवृत्तीची वासनाच ठेवूं नये, इंद्रियभोगाची कल्पनाच मुळीं समूळ नष्ट करावी. आत्मनिष्ठ व्हावें. आसीदामरणात्क्षान्ता नियता ब्रह्मचारिणी । यो धर्म एकपत्नीनां कांक्षन्ति तमनुत्तमम् ॥ (मनु. ५-१५८) विधवेनें मरणापर्यंत क्षमायुक्त राहावे, नियमानें वागावें, कायवाङ्मनानें ब्रह्मचर्य पाळावें, मद्यमांसमैथुनाची कल्पनासुद्धां येऊं देऊं नये. पत्नीचा जो मुख्य एक पतिधर्म तो निर्दुष्ट असा उत्तम प्रकारें चालबाबा. अपुत्रस्य गतिर्नास्ति ।-अपुत्रवंतांना गति नसते अशीं वाक्यें संन्याश्याप्रमाणें विधवेलाहि लागू पडत नाहीत. ज्याच्या योगानें मोक्ष लाभतो तें ज्ञानच त्यांना पुत्रस्थानयि असते. ज्ञानान्मोक्षः । ऋते ज्ञानान्न मुक्तिः । मृते भर्तरि साध्वी स्त्री ब्रह्मचर्ये व्यवस्थिता । स्वर्ग गच्छत्यपुत्राऽपि यथा ते ब्रह्मचारिणः ॥ (मनु. ५-१६०) पतीच्या निधनानंतर जी साध्वी श्री ब्रह्मचर्यानें राहते ती अपुत्र असली तरी बालब्रह्मचाऱ्याप्रमाणे अथवा बाल संन्याश्याप्रमाणे निर्विषय, निष्काम असल्यास तीहि मुक्त होते अथवा ब्रह्मा विष्ण-शिवाच्या निर्विषय लोकाला जाते; सकाम असल्यास स्वर्गाला जाते विधवाधर्माच्या कोणत्याहि श्लोकांत कुठेहि पुनर्विवाहाचा उल्लेख नाही. या सर्व विचारांनी सतीपतीचे नाते कसे असते ते कळून येईल व त्यांचे मुख्य नियम लक्षांत येतील. आर्य संस्कृतीच्या दांपत्यजीवनाची कल्पना येईल. या वैदिक आर्य संस्कृतीत सतीपतींचा देह असतां नसतांनाहि व्यभिचार हा निषिद आहे, अतिनिंद्य व महान् नरककारक आहे.

मृतं भर्तारमादाय ब्राह्मणी वह्निमाविशेत् । जीवन्ती चेत्त्यक्त केशा तपसा शोधयेद्वपुः ॥ ( व्या. स्मृ. २-५२) पतचि शव घेऊन ब्राह्मण स्वनि सहगमन करावें. जिवंत राहिलीच तर संन्यासलक्षणात्मक केशवपन करून कायवाड्मनें दंडाचें तपाचरण करावें. कायदण्डे त्वभोजनम् । – निर शन व्रतानें राहावें अथवा एकभुक्त असावें हें देहदंडण होय. वाग्दंडे मौनमातिष्ठेत् । —मौनानें असावें म्हणजे तो वाग्दंड होतो. स्तोत्रपाठ, सद्गुरूला श्रवणांतल्या शंका विचारणें हें मौनांतच येते. मौनं मितभाषणम् । -अनिवार्य व्यवहारापुरतें अगदी थोडें बोलणेहि मौन म्हटले जाते. मन निर्विषय करणें, मन संकल्पकल्पनारहित करणे, त्याचे चांचल्य यांबवून केवल जाणीवेनेंच राहाण्याचा अभ्यास करणें हें सर्व मनोदंडांत मोडतें. मनःशुद्धते करितां नियम, जपध्यान, पूजन, वाचन, श्रवण, मनन, निदिध्यासन इत्यादि मनोलयाची साधनें करीत राहाणे मनोदंडांत येते. शौचामद्रियनिग्रहः ।— इंद्रियनिग्रह करणें, देहानें व मनानेंहि मैथुनाचा, स्त्रीपुरुषात्मक भावनेचा संपूर्ण त्याग करणे हीच देहमनाची शुद्धि होय. संन्याश्याप्रमाणेच विरक्त राहून भक्ति ज्ञानादि साधनांत काळ कंठणे, हें विधवांचे कर्तव्य होय. केशरंज तांबूलगंध पुष्पादिसेवनम् । भूषणं रंगवस्त्रं च कांस्यपात्रेषु भोजनम् ॥ द्विवारभोजनं चाक्ष्णो रंजनं वर्जयेत्सदा । स्नात्वा शुक्लांबरधरा जितक्रोधा जितेंद्रिया ॥ (बृद्धहारीतक स्मृति ११।२०-२०७)–केस ठेवून विंचरणें, शृंगारणें, विडा खाणें, गंध, पुष्प,पुष्पांच्या माळा,अत्तर,सुगंधी तेलें, सुगंधी द्रव्यें वापरणें, अलंकार घालणे, जरीचीं, रेशिमकांठी अथवा रंगीत नक्षीची चित्रविचित्र वस्त्रे वापरणें, कांशाच्या पात्रांत जेवणें, दोनदां जेवणें, डोळ्यांत काजळ घालणे इत्यादिकांचा त्याग करावा. या सर्वांचा त्याग नाहीं केला तर हीं सर्व स्वतःच्या व दुसऱ्याच्या

कामादि विकार उत्पन्न करण्यास कारणीभूत होतात व यामुळे क्रमेण भ्रष्ट होण्याचा बराच संभव असतो. स्वतःला व स्वतःकडे पाहून दुसऱ्याला कधीहि कामोत्पत्ति न होईल असा आहार, बिहार, आचार, विचार, उच्चार विधवांनी ठेवावा. आपल्याला पाहिल्याबरोबर दुसऱ्यांना पवित्र व पूज्यभावना उत्पन्न होईल व ती आपल्या सहवासाने, बोलण्याचालण्याने, वागण्याने बाढतच जाईल असे असावें. साधी राहणी असावी. कोठेहि कृत्रिमता नसावी. त्रिकाल स्नान, त्रिकाल उपासना करीत जावी. शुभ्र वस्त्र नेसावे. कामक्रोधादिकांचा समूळ नाश झालेला असावा. पाहिल्याबरोबरच जितेंद्रियतेची लोकांना भावना व्हावी व सात्विक वृत्ति व्हावी.

न कल्ककुहका साध्वी तंद्रालस्यविवर्जिता । सुनिर्मला शुभाचारा नित्यं संपूजयेद्धरिम् ॥ क्षितिशायी भवेदात्रौ शुचौ देशे कुशोत्तरे । ध्यानयोगपरा नित्यं सतां संगे व्यवस्थिता ॥ तपश्चरणसंयुक्ता यावज्जीवं समाचरेत् । तावत्तिष्ठेन्निराहारा भावेद्यार्ही रजस्वला ॥ (वृद्धहारीतक ११ २०८-२०९-२१०) – विधवा दंभाचारयुक्त नसावी, साध्वी असावी, झोपाळू नसावी, आळशी नसावी. देहाने व मनानें स्वच्छ, पवित्र, शुद्ध असावी. शुभाचार असावा. आपआपल्या गुरूपदेशाप्रमाणे राम, कृष्ण, विष्णु, शिव, अंबिका, आदि उपासनेत सदा असावें. भुईवरच झोपावे. तेवढे शक्य न झाल्यास गवताची चटई घ्यावी. प्रकृतिमानाप्रमाणे शुभ्र घोंगडेहि वापरावयास हरकत नाहीं. दर्भासनावर, कंबलासन व त्यावर वस्त्र घालून शुद्ध, पवित्र स्थळी ध्यानयोगपर नित्य असावे. सत्सहवास असावा. यावज्जीव तपश्चरणांत असावे. विटाळशी असतांना निराहार करावा अथवा फलाहार करावा. हा कामादि विकारनाशक संन्यस्त वृत्तीचा विधवांचा जीवनक्रम आहे. विधवा कबराबंधो भ्रतृबंधाय जायते । शिरसो वपनं तस्मात्कार्य विधवया तथा ॥ पर्यकशयना नारी विधवा पातयेत्पतिम् । तस्माद्भूशयनं कार्य पति सौख्यं समीहया ।। (व्यासस्मृति ) विधवेनें केंस ठेवून वेणी घातली किंवा बुचडा बांधला की त्यायोगें तिच्या मृत पतीला असेल त्या ठिकाणी बंधना मुक होते. म्हणून विधवेनें केस काढावेत. पलंगावर झोपू नये. पलंगावर झोपणाऱ्या स्त्रीचा पति नरकांत पडतो. तेव्हां पतिहिताची व सौख्याची दृष्टि ठेवून विधवेनें संन्यस्त वृत्तानें राहावें. भूशयन करावें. भर्ता पत्नीकृतं • पापं शिष्यपापं गुरुर्वहेत् ॥ -पत्नीने केलेले पाप नुसतें पत्नीलाच नव्हे तर

पतीलासुद्धा भोगावे लागते. गंधद्रव्यस्य संबंधो नैव कार्यस्तथा कचित् । तर्पणं प्रत्यहं भर्तुः कुर्यात्कुशतिलोद कैः । तत्पितुस्तात्पितुश्चापि नामगोत्रा नुपूर्वकम् । विष्णोस्तु पूजनं कार्य पतिबुध्या न चान्यथा । पतिमेव सदा ध्यायेद्विष्णुरूपधरं पतिम् । एवं धर्मपरा नित्यं विधवाऽपि पतिव्रता || -सुगंधी द्रव्ये वापरू नयेत. कुशतिलोदकानें प्रत्यही पतीला, सासऱ्या आजे सासऱ्यांना नामगोत्रोच्चारपूर्वक तर्पण द्यावें. पतिरूपानेच विष्णूचें आराधन करावें. या विधानाने स्त्रियांना पतिखेरीज अन्य उपासना नाही हे स्पष्ट येतें. विष्णु आदिकांची उपासना पति हा तद्रूपीच आहे अशा निष्ठेनेच करावी, म्हणून या पुढील स्लोकांतहि आहे. पतिमेव सदा ध्यायेद्विष्णुरूपधरं पतिम् । एवं धर्मपरा नित्यं विधवाऽपि पतिव्रता ॥ – श्रीनें पतिनिधनानंतरहि अशा धर्माचरणानें पातिव्रत्य पाळूनच राहावे हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. शास्त्रीय दृष्टीने विचार करून माणुसकी पाळावयाची एवढा विचार सर्वांना आला तरी या वैदिक धर्मानें सर्वांचा उद्धार होईल. देहाभिमानादभिवर्धते क्रिया । विद्यागताहंकृतितः प्रसिध्यति || ( रामगीता १४) देहाभिमानानें किया अधिक होत जातात. मोक्षमार्गांत देहाभिमानालाच ठाव नसतो. या दृष्टीने मोक्षमार्गाची अभिरुची लागली म्हणजे देहसुखाची वैषयिक कर्मे आपोआप कमी होत जातात. देहाभिमान जसा जसा अधिक वाढू लागेल तशी तशी देहसुखाची कल्पना अधिक अधिक बळावत जाते. देहसुखाची कल्पना बळावत गेल्याप्रमाणें बाह्य विषयसुखांच्या व त्या साधनांच्या तत्कमच्या कल्पनाहि अधिक अधिक वाढू लागतात. वैषयिक कर्मांनी विषयवासना अधिक जशी होत जाते त्याप्रमाणेच विषयवासना अधिक झाल्यानें वैषयिक साधनें व कर्मेहि अधिक होऊं लागतात. मग त्याला व्यसन हे नांव येते. शास्त्रीय निर्बंधाचा बांध फुटून जातो. तो मनुष्य स्वपर धातुक आचरणांनी स्वपर शत्रु होतो, समाजकंटक बनतो. या दृष्टीनेंच वैदिक धर्मात देहाभिमानाच्या निवृत्तीकरितां व ‘अव्हासव्हा’ विषय भोगाच्या निवृत्तीकरितां, व्यष्टिसमष्टि यांच्या आत्यंतिक हिताकरितां, इहलोकांची उन्नति व निरतिशय आत्मसुखाची निर्विषय तृप्ति सर्वांना प्राप्त व्हावी म्हणून विवेकवैराग्याचा मोक्षमार्ग दाखविला आहे, अध्यात्मविद्येचा पुरस्कार केला आहे. आत्मोन्नति होऊन जीवनव्यवहारहि सर्वांचा सुरळीत चालावा म्हणून सर्वांना त्या त्या परी आचरणाचे शास्त्रीय नियम घालून दिले आहेत; ते निर्दुष्ट व सर्वोत्कृष्ट आहेत.

पूर्वीच्या काळीं सहगमनाचच पद्धत प्रधान होती. कोणी शीलभ्रष्ट होऊं नये व त्याच्या शीलभ्रष्ट प्रजेमुळे समाजहि दुर्गतिक होऊं नये हा उद्देश यांत होता. इहलोकींचे सुख हे निःसार आहे. देह हा नश्वर असून आत्मा हा अमर आहे हे तत्त्व त्यांत होते. ही पद्धत हजार-बाराशे वर्षांपासून तर फारच कमी कमी होत, आतां तर ती आजिजबातच नाहीशी झाली आहे. साधारण तनिशे सव्वातीनशे वर्षांपूर्वी श्रीसमर्थांच्या चरित्रांत सतीची हकीकत आली आहे. त्यांच्या पुरश्चरणकाली ते टाकळीस असतांना चाळीसगांवच्या कुलकर्ण्याची पत्नी सती जावयास निघाली असतां वाटेंत दिसलेल्या ध्यानस्थ समर्थांनाना नमस्कार करून पुढे जावें म्हणून आली. नमस्काराच्या वेळी बांगड्यांचा शब्द ऐकून अर्धवट बहिर्मुख स्थितींत तिला सुवासिनी म्हणून ताडून ‘अष्टपुत्रा सौभाग्यवति भव’ असा आशीर्वाद समर्थांनीं दिला व नंतर पूर्ण बहिर्मुख वृत्ति त्यानंतर खरी वस्तुस्थिति जाणवली. आपला शब्द खरा करण्याकरितां त्यांनी तिच्या नवऱ्याला जिवंत करून उठावलें व ‘तुला पूर्वी दिलेले आठ व आतां देतों ते दोन असे दहा पुत्र होतील’ असा तिला पुन्हां आशीर्वाद दिला. त्याप्रमाणें प्रत्यक्षांत घडून आल्यानंतर त्या घराण्याचें ‘दशपुत्रे नांव पडलें असें आढळून येतें. तेव्हां श्रीसमर्थकार्ली कुठे कुठे ही पद्धत होती असे कळून येतें. पुढें मोठ्या माधवरावांच्या पत्नी रमाबाई याहि सती गेल्याची इतिहास साक्ष देतो. आतां तर या गोष्टी कानावरच येत नाहीत.

साधारण चारशे वर्षांपूर्वी पावित्र्य व शील यांच्या परिपालना करितां, आर्य प्रजा निर्दुष्ट राखण्याकरितां मुसलमानांच्या धाडींत आर्य स्त्रिया जोहार करीत असत. सती जाण्याचाच हा एक प्रकार होता. पति सहगमनाची दृष्टि यांत तितकशी नसली तरी शीलपालनाची दृष्टि यांत अधिकच होती. यावरून आर्य स्त्रियांनी कशा विस्तवाच्या खाईंतून व धग धगणाऱ्या अग्नीतून आपला दह पवित्र राखला, आपलें शील सांभाळले व मुसलमानांनीं आपल्याला स्पर्श करूं नये की आपल्याला मुसलमान बनवूं नये म्हणून मुसलमानांना जय मिळाला ही वार्ता कानीं आल्याबरोबर स्वधर्माच्या अभिमानानें आपला देह जाळून घेतला, हें चांगलें कळून येतें. तो काळ किती उज्ज्वल होता व आत्तांचा काळ किती मलीन आहे. आतां मुसलमानांशी अथवा ख्रिश्चननांशी स्वेच्छेने मुली लग्न करतात. किती ही अवनति !

येतां येता अशी को स्थिति झाली याचा विचार करावा व आता तर जाती धर्माचा प्रश्नच बगनून कोणीहि कुणाशी लग्न लावावे म्हणून कायद्यानेच मोकळीक मिळाल्यानंतर पुढे स्थिति काय होईल याचाहि विचार करावा.

home-last-sec-img