Literature

विश्वाचा अधिकारीवर्ग

एको विश्वस्य भुवन राजा । (ऋग्वेद ६।३६|४)

— एखाद्या राज्यांतील प्रजा आपापल्या कामाकरितां त्या त्या वेळी आपल्याला आवश्यक अशा खाते-कचेरीस आपणहून गेल्याप्रमाणे या परमेश्वराच्या राज्यांतहि आपापल्या कामाकरितां त्या त्या वेळी आपल्याला आवश्यक अशा अधिकाऱ्याकडे त्या त्या स्थळी जावे लागते. ब्रह्मा, विष्णु, महेश्वर, अष्ट दिक्पालादि सर्व हा अधिकारी वर्ग होय. त्यांचे त्यांचे स्थान मान वेगवेगळे आहे. सत्यलोक, वैकुंठ, कैलास, स्वर्गादि हे लोक प्रसिद्ध आहेत. न्यायाधीशापुढे प्रत्येकाची तपासणी झाल्याप्रमाणें यमधर्माकडे प्रति व्यक्तीचीहि तपासणी होते. आपल्या शक्तीबाहेरचीं सत्कार्ये चिकाटीनें पार पाडून आपली पात्रता दाखविलेल्यांना बढती व गौरवाचे पारितोषक आणि अपराध्यांना व नालायकांना खालच्या दर्जावर ढकलून मानवी राज्यांत वेळी दंडहि केल्याप्रमाणें शक्तीबाहेरची मोठमोठी सत्कर्मे चिकाटीनें पार पाडून आपली पात्रता दाखविलेल्यांना वरवरच्या अधिकाधिक पुण्यलोकांची ( प्राप्ति ) बढती, अधिक सुखाचें पारितोषिक व ( अधिकारानुसार मोक्षहि ) दिला जातो. याच्या उलट निषिद्ध कर्म केलेल्या अपराध्यांना व नरदेहाचे सार्थक वेळींच करून न घेतलेल्या नालायकांना खालच्या दर्जाच्या योनी दिल्या जातात व यमदंडहि होतो. नरकांत खितपावें लागतें. स्वर्ग-कामनेनें कर्म

केलेल्यांना स्वर्ग, निष्काम कर्म करणाऱ्या विरक्ताला ब्रह्मलोक, ऐहिक सुखाच्या लालसेनें कर्म करणाऱ्या लोकांना हा मृत्युलोक आणि निंद्य-निषिद्ध कर्म करणाऱ्या लोकांना नरक अपरिहार्य असतो.

home-last-sec-img