Literature

विषय विवेचन ११

वासनारूप संसाराच्या या जन्ममरणात्मक रहाटगाडग्यांत सापड लेल्यांना जर मुक्त व्हावयाचे असेल, या मृत्यूच्या ‘ जातस्य हि ध्रुवो मृत्युध्रुवजन्म मृतस्य च । चक्रगर्तातून आपली जर सुटका करून घ्यावयाची असेल तर शब्दस्पर्शादि जगद्भावानी रहित असणाऱ्या जगदाद्य अशा त्या महत्तत्व उपाधीलाहि मागे टाकून अनादि, अनंत व नित्य निश्चल असें तें परतत्त्वच, ती ब्राह्मी स्थितीच, तें पुरुषस्वरूपच अंतिम सुखाकरितां जीवमात्रानी निवडून घ्यावें, श्रुतीचे असे सांगणे आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ याच्या अलीकडचा प्रांत संसारात्मक आहे. याच्या पलीकडचा प्रांत मात्र परब्रह्मात्मक होय. ‘अहं ब्रह्मास्मि’ स्फूर्तिपासूनच सर्व काही झाले याचे विवरण बृहदारण्यकाच्या आधाराने मागेच केले आहे. या स्फूर्तीला ‘ माया’ हे नांव कसे येतें हेंहि पण तिथेच दाखविले आहे. काही ठिकाणी मायेस अव्यक्त म्हणून सांगितले आहे व कांहीं ठिकाणी ‘ अहं ब्रह्म स्फुरणालाच मायेचे स्वरूप म्हणून सांगितले. ‘अहं ब्रह्म स्फुरणांत जगाचा संकल्प नाही. तो पुढच्या अव्यक्त उपाधीतच बीजभूत असा असतो, असेहि पण काही ठिकाणी आले आहे. यामुळे मायेच्या व्याख्येचा थोडासा घोटाळा उडण्याचा संभव आहे म्हणून त्याचे थोडेसे विवेचन करू कठमांडुक्यादि उपनिषदांतून तींतच देह मानिले आहेत. चौथा देह न मानतां ‘ तुर्य’ म्हणजे परब्रह्म असे यांत सांगितले आहे

‘अव्यक्ताद्वयक्तयः सर्वाः प्रभवन्त्यह रागमे । रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके || ‘ ८|१८

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातः नः । यः ससर्वेषु

भूतेषुनश्यत्सु न विनश्यति|| (८।२० ) ‘पुरुषः स पर: पार्थभक्त्या लभ्यस्त्वनन्यया (८|२२)

इत्यादि भगवद्गीतेच्या वाक्यावरूनहि अव्यक्तापुढचे स्वरूप शुद्ध बुद्ध परब्रह्म हे स्पष्ट आहे. अव्यक्त उपाधीलाच इथे ‘माया’ नांव येते. बृहदारण्यकाच्या आधारें ‘अहं ब्रह्म स्फुरणच प्रथम होते हें ‘तदात्मानमेवावेत’ या वाक्याने स्पष्ट होते. तेव्हा तेच मायेचे स्वरूप मानावे लागते, हे कसे ते मागेच सिद्ध केलें आहे. श्रीमद्दासबोधाचा आधारहि पण तेथें दिला आहे. या दृष्टीने चार देह मानावे लागतात, या विधानांचा समन्वय करावयाचा म्हणजे काही ठिकाणी एक पायरी गाळून पुढच्यांतच मागचा समावेश केला आहे असे जाणावे म्हणजे काही घोटाळा उडणार नाही.

‘ मया ततमिदं सर्व जगदव्यक्तमूर्तिना | मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्यवस्थितः ।। ‘ (९|४)

‘अवजानन्ति मां मूढा मानुषि तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् || (९-२१) 

  • अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते मामबुद्धयः । (७ | २४ )

‘त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् । मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् (७।१३)

गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति | ‘

या श्रीमद्भगवद्गीतेच्या वाक्यावरून सर्वव्यापी, व्यक्त नस लेले, आपल्यांत सर्वांचा समावेश करून आपण मात्र कोणच्याहि रूपाचें झालेलें, मनुष्यादि आकाररहित त्रिगुणापलीकडचें असून याप्रमाणेच परमात्मस्वरूप जाणाणाऱ्याला त्याची प्राप्ती होते, इतरांना ती होत नाही व जे याप्रमाणे परमात्मस्वरूप जाणत नाहीत ते भ्रांत व मूढ आहेत, असे श्रीभगवंताचे सांगणे आहे हे स्पष्ट कळून येते. ‘नैनमूर्ध्वं न तिर्यन्चं न मध्ये परिजग्रभत्। न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद्यशः ।। ( श्वेतः ४।१९ )

परमात्मा वर, खाली, मध्यभागी कुठहि सांपडत नाही. कर्तुम कर्तुमन्यथाकर्तुम् अशा विचित्र सामर्थ्याची ज्याची कीर्ति आहे त्याला कोणचीहि प्रतिमा म्हणजे रूप नाहीं. ‘ न संदृशे तिष्ठति रूपमस्य । न चक्षुशा पश्यतिकश्चनैनम् ।’ (श्वेत ४।२०) कोण च्याहि इंद्रियांना याचे रूप गोचर होत नसल्यामुळे ते अतिद्रिय रूप इंद्रियाचा विषय होत नाही म्हणजे याला कोणचाहि आकार नसल्यामुळे कोणीही याला डोळयाने पाहू शकत नाहीं.

‘यत्तद्द्रेश्यमग्राह्यगोत्रमवर्णमचक्षुः श्रोत्रं तदपाणिपादम्। नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्य यंयद् भूतपोनि परिपश्यन्ति धीराः । (मुं. १९१६)

या श्रुतीनेंहि परमात्म्याचे स्वरूप दृश्यरहित, मनेंद्रियांना ग्रहण न होणारें, जन्मरहित असल्यामुळे गोत्रवर्णानी रहित, निरंश असल्यामुळे चक्षु-श्रोत्र करचरणादि अवयवविहीन, नित्य सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, अतिसूक्ष्म, नाशरहित आहे व ते सर्व भूतांचे सर्वाद्य कारण विवेकी लोक चोहीकडेच बघतात असे, भ्रम अधिष्ठान मात्र असतो या न्यायाने परमात्मस्वरूपाची ओळख श्रुति पटवून देत आहे. विवेकी लोकांना या जगांत तें जसेच्या तसेंच भासतें म्हणून म्हणण्यांत जगदुत्पत्तीमुळे त्या परमात्म स्वरूपात कोणच्याहि तऱ्हेचा विकार होत नाही हा श्रुतीचा अभिप्राय.

, ब्रह्मभूतात्मनस्तस्मादेतस्माच्छक्तिमिश्रितात् । अपञ्चीकृत आकाशः संभूतो रज्जुसर्पवत् ।। (कठरु. १७) तस्माद्वा एतस्मादात्मान आकाशः संभूतः । आकाशाद्वायु । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्भ्य पृथिवो । पृथिव्वा ओषधयः । औषधीभ्योऽन्नन् । अन्नात्पुरुषः । (तैत ब्रह्म- १)

  1. या श्रुतीच्या मायाशक्तिमिश्रीत अशा हिरण्यगर्भा पासून रज्जुसप प्रमाणे आकाशादिकांची उत्पत्ति झाली हे स्पष्ट होते. ‘बद्धेरात्मा महान्प्रः।’ या वाक्याने आत्मा शब्दाचा अर्थ हिरण्यगर्भच हे स्पष्ट होईल, ‘कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् ।’ कर्माची उत्पत्ति बीजभूत अशा अव्यक्त उपाधीत नसल्यामुळे ती महत्तत्त्वापासूनच म्हणजे हिरण्यगर्भापासूनच हें स्पष्ट आहे. अव्यक्त हा कारणह हो कारण देहात म्हणजे सुषुप्तीत जसे कार्य काही संभवत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मांडकारण देहांत म्हणजे अव्यक्ततात देखील कार्य कांही संभवत नाहीं कार्याचा संकल्प येथे बीजभूत जरी असला तरी कोंबापासून जसा वृक्षाचा आरंभ होतो तसा ब्रह्मांडांत अथवा पिंडात कार्याचा आरंभ सूक्ष्मदेहापासूनच गणला जातो. म्हणूनच महत्त्व उपाधी हिरण्यगर्भालाच ‘कर्मंब्रह्म ‘ असे म्हणतात. ‘कर्माध्यक्षः सर्वलोकाधिवास’, हा हिरण्यगर्भच कर्मा ध्यक्ष होय. ‘तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत्। ‘ उत्पन्न करून त्यात प्रवेश केला या अर्थाची ही श्रुति हिरण्यगर्भालाच लागू पडते. ईक्षण, कामना संकल्पादि सूक्ष्मदेहाचेच असल्यामुळे सृष्टीच्या उत्पत्तीचा आरंभ हिरण्यगर्भापासूनच मानावा लागून उत्पन्न केलेल्या पदार्थांतून प्रवेशहि पण याचाच झाला हेंहि पण ओघानेच सिद्ध होते. 

‘न तस्य कार्यम् ।’ या श्रुतीच्या आधाराने ब्रह्म हें कशाचेंहि कारण होत नाही. तेव्हापासून ब्रह्मापासून आकाशादि कार्याची उत्पत्ति मानता येत नाही. आकाशादिकांची उत्पत्ति हिरण्यगर्भापासून झाली असतांही संकल्पात्मक सृष्टी हिरण्यगर्भाला नाहिशी करू शकत नसल्यामुळे त्याची स्थिती कायम राहून कार्याचा भास त्याच्यावर दिसतो. असे झाले की, रज्जुसर्पाप्रमाणे हिरण्यगर्भाच्या ठिकाणी अपंचीकृत आकाशाची उत्पत्ति झाली म्हणून जें विधान वर दिलेल्या श्रुतिवाक्यांत आहे त्याचे सत्यत्व पटेल. हिरण्यगर्भापासून त्याच्या विचित्र शक्तियुक्त असणाऱ्या संकल्पाने बहुविध नामरूपात्मक सृष्टीच्या उत्पत्त्यर्थ आकाश, वायु, अग्नि, आप आणि पृथ्वी हीं सूक्ष्म पंचमहाभूतें निर्माण झाली. आपल्या विचित्र शक्तिप्रभावाने या सूक्ष्म पंचभूतांचे विशिष्ट पद्धतीने विभाग पाडून सूक्ष्म देहांची उत्पत्ति केली. याला सूक्ष्म पंचीकरण म्हणतात. पुढे स्थूलदेहाच्या उत्पत्तिकरतां आपल्या विचित्र शक्तीने स्थूळ पंचभूत निर्मून त्यांच्या विशिष्ट विभागांच्या परस्पर मिश्रणांनी अनेक स्थूलदेह निर्माण केले. या स्थूल देहाला ‘अन्नमय’ असे नांव आहे. याला स्थूळपंचीकरण म्हणतात. आकाशापासून पृथ्वीपर्यंतचा क्रम स्थूल पंचभूतात सुद्धा असून असून पृथ्वीपासून पुढे मात्र पृथ्विव्या ओषधय औषधीभ्योऽन्नं। अन्नात् रेत । रेतः सः पुरुषः ।’ या क्रमाची स्थूळ देहाच्या उत्पत्तिकरता त्यांत आणखी भर पडली. ब्रह्मानंद वल्लीतून अन्नापासून रेत व रेतापासून पुरुष म्हणजे देह या पायच्या गाळून औषधीपासून अन्न व अन्नापासून देह असे संक्षिप्त वर्णन केले आहे. स्थूल अग्नीपासून अन्नमयात्मक स्थूल देहापर्यंत व्यक्त नामरुपाची उत्पत्ति पूर्ण झाली. डोळयाला गोचर होणारा आकार येथेच प्रगटला. या सर्व मालिकेचे पूर्वी असणारें हिरण्यगर्भाचे स्वरूप देहाकाराने युक्त असणे शक्य नाही.

सर्वकर्ता तोचि देव । पाहो जातां निरावेव | याची कळा लीला लाघव । नेणती ब्रह्मादिक ।’ (दास. ८|१|२४)

‘अवघी सृष्ठी जो कर्ता । तो तें सृष्टोहूंन पर्ता । तेथे संशयाची वार्ता| काढूचि नये ॥ (दास. ८।१।३४)

‘जे जे जया: करणे पडे । तें तों हें कैसें घडे । म्हणोनि वायांची बापुडे | संदेहि पडती ॥ “(दास. ८| ३८)

स तपोतप्यत । स ऐक्षत । स कामयत | या सर्व वाक्यावरून हिरण्यगर्भाचें ठिकाणी जो एक संकल्पाचा भाव उमटतो त्यामुळे ‘संकल्पात्मकं मनः ।’ या लक्षाने युक्त असणारें व आम्हांला ज्याचा ‘चंचल’ म्हणून परिचय आहे तें हें आम्हाला सताविणारे मन त्या हिरण्यगर्भाच्या ठिकाणीही आहे काय ? म्हणून जर कोणाला शंका येईल तर त्याच्या समाधानार्थ थोडा विचार करूं!द्भा

‘महर्षयःसप्त पूर्वें चत्वारो मनवस्तथा । मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥’ (भ.गी. १०।६)

या श्लोकातून ‘मानसा जाताः’ या पदावरून मानसिक सृष्टी ठरून हिरण्यगर्भाच्या ठिकाणींही मन आहे असे जरी ठरलें तरी आमच्या या मनाची उत्पत्ति अपंचीकृत पंचभूतांच्या नंतरचीच असल्यामुळे हिरण्यगर्भाच्या ठिकाणी हे मन मानणे वेडेपणाचें होईल. वायूचा १|८ भाग आकाशात मिळून या मनाची उत्पत्ति झाली हें पंचीकरण वाचलेल्यांना स्पष्ट कळून येईल. हिरण्यगर्भाच्या ठिकाणी असणारा संकल्प दिव्य आहे. त्याच्या इच्छा आणि क्रिया ज्ञानात्मकच असतात. तोहि ज्ञानात्मकच असतो. याला ‘ जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्मनेति मामेति सोऽर्जुन ॥( यजु ) हे गीतावाक्य प्रमाण आहे. अन्त प्रविष्ठ शास्ता जनाना सर्वात्मा| सबाह्यान्तरों ह्यज| ( मु. २२) एषत आत्माऽन्तर र्याम्यमृतः ।’ (बृह्) ‘स एव इह प्रविष्ट आन खाग्रेभ्यः । शरीरांत प्रविष्ठ झालेला सर्व जनांचा शास्ता सर्वांचा आत्मा तो अजन्मा या सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापुन आहे. हाच तुझा नाशरहित असा अंतर्यामा आत्मा, तोच हा इथे या देहांतून नखशिखांत प्रविष्ठ झालेला आहे. या सर्व श्रुतिआधाराने हा सर्वव्यापी हिरण्यगर्भ देहरूप होत नाही, हे स्पष्ट होते.

‘यो मामजमनादि च वेत्ति लोकमहेश्वरम्

असंमूढः स मर्त्येषु सर्व सर्वपापैः प्रमुच्यते ॥ (भ.गी. १०|३) या गीतेच्या श्लोकाने जो कार्यब्रह्माला अथवा कर्मब्रह्माला जन्म नाशरहित समजतो तोच या मर्त्यलोकांतून भ्रम पावलेला बुद्धि मान व हाच सर्व पापापासून मुक्त होती हैं या भगवउक्तीनें स्पष्ट आहे

‘नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्।’ (भ.गी. ५।१३ )

‘न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।। १४ ) 

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥’ (भ.गी५ ) 

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ ( भ.गी. ९।२९ )

‘ न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् । (भ.गी. १०।३९ )

  • समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् | विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥’(भ.गी. १३ | २७ )
  • समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥’(भ.गी. १३।२८ )
  • अनादित्वानिर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥’(भ.गी. १३/३१)

या सर्व गीतेच्या वाक्यानी तो ज्ञानमात्र असा अकाय निर्गुणी आत्मा या देहांतूनहि असल्यामुळे इथेहि तो अजन्मा, अविनाशी, कर्तृत्व भोक्तृत्व रहित असा आहे व याच दृष्टीने सर्वत्र त्याची व्याप्ती पहाणाऱ्यास मोक्ष लाभतो हे स्पष्ट होईल. देहांत प्रविष्ठ झाल्यानंतरहि तो जशाचा तसाच असतो. याला • अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यतें

तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ (भ.गी. २।२५ ) ‘अजो नित्यःशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हत्यमाने शरीरे ॥ (भ.गी. २/२०) या सारखी इतर श्रुति-स्मृतींची वाक्यहि प्रमाण आहेत.

देहच मी, मी कर्ता, मी भोक्ता, मी जन्ममरण प्रवाहांत सांपडलेला, प्रारब्धादि कर्मपाशांनी जखडला गेलेला, मी तें परमात्मस्वरूप नव्हे, ‘पापोऽहं पापकर्मोऽहं पापात्मा पापसंभवः।’ मी अल्पज्ञ, तो परमात्मा सर्वज्ञ, परमात्मा स्वामी, मी सेवक, तो ईश्वर प्रेरक, मी त्याच्या प्रेरणेने वागणारा, जगांत असणारी सारी सुख-साधनें या ईश्वराच्या कृपेनेंच मला लाभून माझे जीवन,

सुखावह होते. परमात्मा नित्यतृप्त, विषयसुखच माझे जीवन च्या कृपेनें त्याचा यथेष्ट लाभ करून घेणे हा माझा धर्म, तो ईश्वर स्वतंत्र मी परतंत्र बाह्यपदार्थच मला सुख देणारे ते मला इहलोकी व परलोकीही विपुल लाभतील अशी अनेक कर्म करीत राहणे म्हणजेच सुख मिळविण्याचा माझा उपाय. माझ्या समाधानाची स्थळे म्हणजे वस्त्राभरण सृग्चंदन, स्त्री-पुरुष दिव्य अन्नपानादि हेच. इहपरलोकांत यांचा यथेष्ट लाभ म्हणजेच मोक्ष यात्री व्याप्ती कोणच्याहि रितीने करून घेणे माझे कर्तव्य इत्यादि स्त्री पुरुष समुदायांतून दिसून येणाऱ्या भावना बघितल्या म्हणजे

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किज्ञ्जन | नानवाप्तवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ (भ.गी. ३/२२)

‘अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः । अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ (भ.गी. १०|२० )

या गीता वाक्यांच्या अगदींच विरुद्ध जिवाच्या ठिकाणी या अशा विरुद्ध भावनांना कारण म्हणजे देहाभिमानच. या देहाभि मानास पंधराव्या आर्येच्या पूर्वार्धातून जीवाला स्व-विस्मृतीच कारण झाली आहे व स्व-विस्मृतीनें ज्याला सदाचाच जड देहाचा अभि मान होतो त्यालाच ‘जीव’ असे म्हणतात हे ‘ विस्मृतिरूपे जड हे भासें ज्या, वदत त्यासि जोव सदा ।’ या ओळीने प्रगट झाले आहे.

देहबुद्धिचेनि बळें । शुद्धज्ञान तें साकोळें । भ्रांति हृदयींप्रबळे | संदेहरूप ॥(अंतर्भाव ५|१६)

  • म्हणोनि देहातीत जें सुख |त्याचा करावा विवेक | तेणे गुणे अविवेक । बाधूं न शके | (अ. भा. ५/१७ )

जीव परमात्मरूपाहून भिन्न म्हणून म्हणावे तर न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा I’ (भ.गी. ४०१४)

इत्यादि भगवंताच्या वाक्याप्रमाणे आपले यथार्थ रूप जाणलेल्या जीवाची स्थिती असते हे भगवंताच्या या खालील वाक्यावरून स्पष्ट होतें.

  • कर्मभिर्न स बध्यते ।” आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते । (भ.गी. ३|१७)

, न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ।’ (भ.गी. ३|१८) • आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय’ (भ.गी. ४-४१)

home-last-sec-img