Literature

विषय विवेचन १

नात्मलाभात्परोलाभ:आत्मलाभाशिवाय इतर कोणताहि लाभ विशेष नाही. जगांत जो पदार्थ जास्त सुखकर असतो त्या पदार्थावर जास्त प्रेम आढळून येते. या दृष्टीने पाहू गेले असता सर्वांपेक्षा ज्याच्यावर जास्ती प्रेम आहे ती अशी प्रियतम वस्तु सवोंपेक्षां सुखतम ठरेल. वा अरे सर्वस्य कामाय सर्व प्रियं भवत्यात्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति या श्रुतीच्या आधाराने पत्निपुत्रादि सर्वहि आप्तेष्ट, स्थावर जंगमात्मक सर्वहि जिंदगी ब्राह्मण क्षत्रियादि या सर्व जाति, मृत्युलोकादि हे सर्व लोक, ब्रह्मविष्णवादि सर्वहि देव, सर्वहि हे भूतजात, थोडक्यात जितके काही म्हणून ते हे सर्व त्याच्याच करिता प्रिय नसून, त्याच्यावरचे प्रेम आपल्या सुखाकरताच असते हे सिद्ध होते.यदर्थ यत् प्रिय वस्तु तस्मात्तदधिकं प्रियम्। या दृष्टीने हे सर्वहि जर स्वतः– ‘ करिताच प्रिय आहे तर या सर्वापेक्षा प्रत्येकाचे स्वत:वरच जास्त प्रेम असते हे स्पष्ट आहे. ‘आडवे आले की कापून काढावे,’ ही म्हण याचे सत्यत्व पटवून देईल. सर्वापेक्षा स्वत: आपणच प्रिय ठरलो की जी प्रियतम वस्तु ती सुखतम असते या न्यायाने आपणच या सर्व पदार्थांपेक्षा सुखतम ठरतो. जास्ती सुखरूप पदार्थावर जास्ती प्रेम असणे स्वाभाविक असल्यामुळे साहजिकच आपले आपल्यावर सर्वांहून  जास्त प्रेम कां असते याचे कोडे उलगडेल

तदेतत्प्रेयः पुत्रात्प्रेयो वित्तात्प्रेयोऽ न्यस्मात्सर्वस्मादन्तरतरं यदयमात्मा।‘ 

देहाला सोडून बाहेर असणाऱ्या पुत्रवित्तादिकापेक्षा जसे आपल्यावरच जास्त प्रेम असते तसेच ते देहाला धरून त्याच्या आत असणाऱ्या इंद्रिय, प्राण, मनोबुद्धादिकाहून सुद्धा आपल्या वरच जास्ती प्रेम असते हा या श्रुतीचा अर्थ, तेव्हा या देहेंद्रिय प्राणादिकाहून आपण प्रियतम ठरून या सर्वांपेक्षा यांच्यामुळे लाभणाऱ्या इतर सर्व पदार्थांच्या सुखापेक्षा आपणच सुखतम ठरलो की या सर्वापेक्षा जास्ती प्रेम हे आपणाला आपल्यावरच असणार, असे हे सुखतम स्वरूपच सर्वांना प्रिय आहे हे दाख विण्याकरिताआनंदात्मा प्रियोहयात्याअसे श्रुति सांगते. या देहाच्या बाहेर असणाया पदार्थाहून तसेच याच्या आत असणाऱ्या मनइंद्रियादिकाहूनहि जे वेगळे, याच्यामुळेच अनुभविल्या जाणाऱ्या सुखाहूनहि जे निराळे, याहून कितीतरी श्रेष्ठ असे ते हे आपले सुखतम स्वरूप सोडून सुखाकरिता कोणत्या अन्य पदार्थाचा लाभ आपल्याला विशेष होईल ? या जड दृष्य पदार्थांचा संयोगअन्य इंद्रियाशी होऊन लाभणारे कोणचे सुख आपल्याला विशेष ठरेल

अनित्य वस्तूंच्या प्रेमापेक्षा नित्य वस्तूवरचे प्रेम केव्हाहि अधिकच असणार ! या अशा अनित्य वस्तु कोणत्या तरी एका नित्य वस्तूच्या आधारानेच असल्या पाहिजेत. ‘धृवं जन्म मृतस्यच नष्ट होणारी वस्तूच जन्म पावते. अशा या जन्मनाशयुक्त अस णाऱ्या वस्तु प्रतिक्षणी विकार म्हणजे रुपांतर पावत असल्यामुळे अस्थिर असतात. या सर्व अस्थिर वस्तु कोणत्या तरी एका स्थिर वस्तूच्या आधारानेच उत्पत्तिनाशयुक्त असतात. या अस्थिर वस्तूतून दिसून येणारे सुख या वस्तूंना आधारभूत असणाऱ्या  त्या स्थिर वस्तूचेच, हे स्पष्ट आहे. सदोदित स्थिर म्हणजे एक रुपाने असणारी वस्तूच नित्य म्हणून म्हटली जात हे असे नित्य वस्तुरुपच असणारे सुख या अनित्य वस्तूंतून भासते. असे झाल्यास नते नित्यसुख जसेच्या तसेच अनुभविता या अनित्य वस्तूंतू अनुभविणे कोणासहि तृप्तिकारक होणार नाही. जे तृप्तिकारक नसते ते समाधानकारकहि नसते. समाधानकारक नसणारे, सुख म्हणून म्हणता येणार नाही; यामुळे अनित्य वस्तु ज्या नित्य वस्तू कडून अस्तित्वात असतात तेच सुख असे झाले. नित्य हे अनित्य होत नसल्यामुळे अनित्य हे नित्याहुन विरुद्धच ठरले की, नित्य हेच जर सुख झाले तर अनित्य हे तद्विरुद्ध म्हणून दुःखरुप होईल. या दुःखरुपी अनित्य वस्तु ज्या नित्य वस्तूमुळे सुखरुप वाटतात ते स्वतःच सुख असून त्याचीच प्राप्ती प्राण्याला इष्ट आहे. जास्ती सुखरुप वस्तूंवर जास्ती प्रेम असणे स्वाभाविक असल्यामुळे, जास्त प्रेम प्रत्येकाला आपल्यावरच असल्यामुळे आपणच जास्ती सुखरूप आहोत. सर्वापेक्षा जास्त सुखरूप असणारे नित्य असते. त्याचा नाश कशाने होणार ? त्याला प्रतिस्पर्धी  असे दुसरे कोणते असणार ? इतर सर्वांचा अंतर्भाव यातच असल्यामुळे ते कशापासूनहि नष्ट होणारे असे झाले की  नित्यच. तेव्हा नित्य असणाऱ्या अशा या आत्मस्वरुपावरच सर्वांचे प्रेम  सर्वस्व असणे साहजिकच झाले. नित्यमात्मस्वरूपं हिदृश्यम तद्विपरीतगम्।या नित्य आत्मस्वरूपाहुन विरुद्ध ।।। या अनिन्य म्हणजे उत्पत्तिनाशयुक्त असणाऱ्या वस्तूंवर कोणाचेही प्रेम असणे संभवनीय नाही. संभवनीय नसून तसे वाटलेले भ्रामक असते. हे भ्रामकज्ञान प्रत्येकाला अनिष्टच होय. अनिष्ट इष्ट होत नसल्यामुळे, सुखच इष्ट होत असल्यामुळे अनिष्ट जाणारे दुखरूपच असते. उत्पत्तिनाशयुक्त वस्तु म्हणजेच दृश्य , हे दृश्य  कोणाला सुखावह होईल

नित्योऽनित्यानां चेतनश्चेतनानामेको बहुनां यो 

विदधाति कामान् तमात्मस्यं येऽनुपश्यान्ति धीरास्तेषां शान्तिः शाश्वती 

नेतरेषाम् ‘ (कठो. २।२।१३)

अनित्य अचेतन अशा सर्व वस्तूंतून जी एक नित्य चेतनात्मक वस्तू व्यापून आहे, जिच्यामुळे या साऱ्या अनित्य अचेतनात्मक वस्तु अनेक कामना पूर्ण करणाऱ्या वाटतात, ती ही स्वमात्र असणारी वस्तुजे आत्मभावनेने जाणतात त्यांना आपणच सुखरूप असे होऊन अनित्य, अचेतन पदार्थांने त्यांचे धैर्य खचत नाही. अशा या धीर पुरुषांनाच चिरशांति लाभते. इतरांच्या वाटेला ती येत नाही.’ असे हे श्रुतीचे तात्पर्य. ही आत्मवस्तु आपल्याहून वेगळीच असे कोणी म्हणेल तरप्रियोह्यात्मा।या श्रुतीच्या आधाराने आत्मस्वरूपच आपल्याला असल्यामुळे सर्वा पेक्षा आपण आपल्याला प्रिय आहोत हे मागेंच सिद्ध झाल्यामुळे, प्रिय असणारेच आपण या नियमाने ही प्रिय म्हणून सांगितलेली आत्मवस्तु आपणाहून भिन्न नाही हे सहज सिद्ध होईल. आपल्या हुन वेगळे असणारे पदार्थ त्यांच्या अनुभवांती असत नाहीत. शेवटी अनु भवरूपाने आपणच उरतो. शेवटी उरणारे स्वरूप अविनाशी ठरत असल्यामुळेअविनाशी वा अरेयमात्मा। (बृ.) या श्रुतीच्या आधाराने देखील हे अविनाशी आत्मस्वरूप आपल्याहून नाही. उत्त्पत्ति, नाश हे आपल्याहून वेगळया पदार्थालाच असतात, आपल्याला हे नाहीत हे सहज सिद्ध होते. उत्त्पत्ति, नाश पाहून अथवा पाहून देखील आपण उत्त्पत्तिनाशाहून वेगळेच आहोत. पाहिले जाते ते वेगळेच पाहतां ते मुळीच कळून येत नाही म्हणून तें नाहींच. नाशयुक्त पदार्थ दुःखरूपी असतो. अविनाशी तद्विरुद्ध. त्यामुळे सुखच आपण हे स्पष्ट आहे. नाश हा इतर पदार्थामुळेच होतो व नाश होणारा पदार्थहि आपल्याहून वेगळाच असतो. इतर म्हणजे आपण नव्हे. याहून वेगळे असणारे आपण केवळ रूपानेच असतो असें कां सिद्ध झाले म्हणजे ते आपण अद्वितीयच आहों हे स्पष्ट होईल. सर्वांच्या अंती उरणारे आत्म स्वरूप अविनाशी म्हणून अद्वितीय आहे.नित्यं निरुपाधिकं निरतिशयं यत्सुखं स आनन्दः ‘(वासुदेव मनन.) 

जे सुख नित्य असते, जे कोणत्याहि इतर उपाधीरूप पदार्था पासून लाभत नाही, जे निरतिशय असते, ज्याच्याहून अतिशय म्हणजे जास्ती असें श्रेष्ठ सुख नसते म्हणजेच जे सर्वाहून जास्ती सुखरूप असते त्यालाचआनंदअसे म्हणतात. ‘आनन्दात्माया श्रुतीने आपणच असे हे नित्य निरुपाधिक आणि निरतिशय असणारे सुख म्हणजे आनंदरूप आहों असें ठरते. हेच युक्तीने आणि प्रत्येकाच्या स्वानुभवाने सिद्ध करावयाचे जर झाले तर सुषुप्तीचा स्वानुभवच पुरे. सुषुप्तींत बाह्यदृश्याच्या अनुभवाला साधन म्हणून असणारी ही मन, इंद्रिये दिसून येत नसतांना होणारे राग, यांच्यामुळे मिळत नसलेले असे झाले की यांच्यामुळेच जागृत स्वप्नात अनुभविल्या जाणाऱ्या सुखात सातिशयत्व दिसुन येत असल्याने यांच्यामुळे जे अनुभविले जात नाही ते या सतिशयाहून वेगळेच म्हणजे निरतिशय सुख होईल. साति शयत्वं सुखाचे तारतम्य. हे दृश्याच्या भिन्नभिन्नतेवरच अवलंबून असल्यामुळे, हे भिन्नत्व नामरूपात्मक पदार्थानेच भासत असल्यामुळे हे नामरुपात्मक दृश्य जागृतस्वप्नांतच दिसून येत असल्यामुळे, सुषुप्तीत  ते नसल्यामुळे, दिसून येणाऱ्या नामरुपात्मक दृष्याचाच अनुभव ज्याच्यामुळे होतो अशा या मनइंद्रियादिकांकडून सुषुप्तीत अनुभविले जात असणारे सुख नसल्यामुळे, याच्याकडून अनुभविल्या जाणाऱ्या, जागृत स्वप्नांतच भासणाऱ्या नामरुपामुळेच होणाऱ्या, अनित्य, सोपाधिक सातिशय अस णाऱ्या अशा या सुखाहून ते सुख वेगळेच ठरुन याहून वेगळे म्हणजे ते सुषुप्तिस्थ सुख नित्य, निरुपाधिक निरतिशय असेच होईल. सुषुप्तीतील सुख अद्वितीय आहे. जागृत स्वप्नांत पदार्था मुळेच सुख लाभत असल्याने पदार्थांच्या अनेकत्वामुळे सुखांत तारतम्य दिसून येऊन त्यात अनेकत्त्वाचा भास होतो. सुषुप्तीत असणारे ते सुख, या पदार्थांमुळेच लाभत नसल्याने, या पदार्थां तच अनेकत्व असल्याने, या अनेक पदार्थांच्या अनुभवानेच सुखां तहि अनेकत्त्वाचा भास होत असल्याने, या अनेक रुपाने भासणाऱ्या दृश्य पदार्थांचा अनुभव ज्या जागृतस्वप्नांत होतो ते जागृत स्वप्न आपल्यांत भासणान्या अनेक पदार्थांसह पदार्थांच्या अनु भवामुळे वाटणाऱ्या अनेक विविध सुखांच्या भावनेसह सुषुप्तीत मावळून जात असता त्यात असणारे ते सुख अद्वितीयच ठरते. त्यात सुखाच्या अनेकत्वाला कारण होणाऱ्या अनेक नामरुपात्मक उपाधी दिसून येत नाहीत. शब्दस्पर्शादि भिन्न विषयाच्या अनु भवाला कारण असणारी ही भिन्नभिन्न इंद्रिये देखील तेथे सुषु प्तीत नसतात. या इंद्रियामुळे यांच्याकडून दिसून येणाऱ्या अनेक नामरुपात्मक दृश्यामुळे अनेक सुखाच्या भावना करणारे हे मन सुष प्तीत या सर्वांच्या अभावी सुखाच्या अनेकत्वाची कल्पना करण्यास शिल्लक उरत नाही. याप्रमाणे सुखाच्या अनेकत्वाला या दृश्यासहित कारणीभूत असणारी ही मन, इंद्रिये ओसरली असता सुखाचे अनेकत्व मावळून, यांतून व्यापून असणारे एकच एक उपाधिरहित सुख सुषुप्तीत उरते. ते मन इंद्रियांकडून भासले जात नाही. ते नामरुपात्मक नसल्यामुळे सूर्यचंद्रादिकांकडूनहि प्रकाशिले जात नाही. ते स्वयंप्रकाशितच आहे. सुषुप्तीमध्ये असणाऱ्या काही समजले नाही.’ या अज्ञानतेत सुख झालेअशा या अनुभवाने दर्शित होणाऱ्या त्या सुखांत स्वयंप्रकाशकत्व अज्ञानतेला देता येत नसल्याने ते सुखालाच देणे योग्य आहे. समजणारे ते जड असते. जड असणारे स्वतःला दुसयाला जाणू शकत नाही. या दृष्टीने काहीं समजणाऱ्या या स्वभावाने जडरुप होत असलेल्या अज्ञाततेस स्वयंप्रकाशच लाभत नाही. स्वसिध्यर्थ अन्यनिरपेक्ष असणारे हे स्वयंप्रकाशित सुख स्वमात्र असल्यामुळे सहजच अद्वितीय ठरते. सुषुप्तीतकाही समजले नाहीया अनुभवामुळे दिसून येणारे अज्ञान हे याचे स्वरुप नव्हे. यांत ते असणेहि संभवनीय नाही. याचा आणि त्याचा परस्पर संयोग होणेहि पण शक्य नाही. स्वयंप्रकाशित वस्तु अद्वितीयच असतेआत्मैवास्य ज्योतिर्भवति !’ ‘तस्य भासा सर्वमिदं विभाति ! ‘ ‘अत्रायं पुरुषःस्वयं ज्योति: ‘ ‘सता सोम्व तदा सम्पन्नो भवति ! ‘ (छांदोग्य) इत्यादि श्रुतिआधाराने जागृतस्वप्नांतमीम्हणून दिसून येणारी ही स्फुर्ती सुषुप्तीत दिसून येणाऱ्या अज्ञानाला आपले कारणत्व देतां आपल्या ज्ञानात्मकतेने सुषुप्ति  असणाऱ्या स्वयंप्रकाशित सुखरुपाकडेच आपल्या कारण त्वाचा संबंध दाखविते. ‘मीहे आपलेच भान कोण नाकबूल करील ? भान म्हणजे स्मृति अथवा आठवण. ‘मीम्हणून होणाऱ्या या आपल्या स्मृतीचे उत्पत्ति आणि लयस्थान असणारे आपण अभावरुप कसे होऊ ? भावरुप म्हणजे असणारेच म्हणून एकदा का ठरले, की ते आपण अज्ञात तरी कसे होऊ ? म्हणून जे काही सुषुप्तीत उरते तेच मी या स्मृतीने लक्षित होणारे  आपले रुप हे स्पष्ट आहे. ते आपण स्वतः इतर कोणाकडूनहि प्रकाशले जात नसल्यामुळे स्वयं प्रकाशरुप आहोत. सर्वांचा लय झाल्यानंतर उरत असल्यामुळे ते आपले रुप केवळ भावाने अद्वितीय आहे. ‘तेथे चंद्रसूर्य ना पावक नव्हे काळोखे ना प्रकाशक उपाधी वेगळे एक। निरुपराधिक ब्रह्म। ( दा. १७ ) जिकडे पहावे तिकडे अपार कोणीकडे नाही पार ।एकजिनसी स्वतंत्र दुसरे नाही॥ (दा. २०।२।३) ‘अजन्मा होता निजेला। तेणे स्वप्नीं स्वप्न देखिला। सद्गुरुस शरण गेला संसारदुःखें।।‘ (दा. ६।१०।३६) ‘सदगुरुकृपेस्तव जाला संसार वाव ज्ञान जालिया ठाव पुसे अज्ञानाचा ‘ (दा. ६।१०।३७) ‘मिथ्या स्वप्ने वोसणाला तो जागृतीस आणला तेणे पूर्वदशा पावला। निर्भय जै॥‘ (दा. ५।६।७) ‘शून्यत्वातीत शुद्धज्ञान तेणे झाले समाधान ऐक्यरूप _ अभिन्न सहजस्थिती॥‘ (दा. ६।१०।३९)

 ‘मीयातले असणारे अज्ञान सद्गुरुबोधाने अशा प्रकारे नाहिसे होऊन त्यांत जो विवेक अरुणोदय होतो तोच हाप्रातः समय ! यांतमीही स्मृतिरुप आत्मीयस्फूर्ति आपल्या यथार्थ स्वरुपाच्या भानाने संतुष्ट होऊन त्या आनंदातिरेकाने सहज आजपर्यंत भासलेल्या अज्ञानाचे निराकरण करीत आपलेच भान आपणाला जे आणून घेते तेच हे तिचेप्रातःस्मरण !’  

स्वरूपाची जाणीव देण्याकरतां परमात्म्याने जिवाच्या जीवनांत महदाश्चर्यकारक अशी ही सुषुप्ति अवस्था ठेवली आहे. मी कोण ? जग खरें किंवा खोटे ? मला प्राप्तव्य काय आहे ? सत्य वस्तु कोणची? या सर्व प्रश्नांचा उलगडा एका सुषुप्तीकडे पाहिले म्हणजे सहज होतो. देह मी म्हणून जे जागृतींत वाटते तें या सुषुप्तींत भासत नाही. देहहि पण दिसत नाही. डोळ्याला दिसणारे हे जगहि तेथे मावळून गेलेले असते. ही इंद्रियेहि तिथे दिसेनाशी होतात. तेथें मनहि पण कोठे दिसत नाही. आपण हे जे जागृतींत या सर्व उपाधी वेष्टुन घेऊन कर्तव्याच्या म्हणा,सुखाच्या म्हणा जाणिवेने इतकें अव्याहत कार्यपर असतो तो हा भामना संस्कार सुषुप्तींत कोठे असतो? एकक्षण देखील स्थिर नसणारे काहीतरी भावनेचे तरंग उठवीत असणारे हे मन त्या सुषुप्तींत कोठे असते? राजापासून रंकापर्यंत अनुभविली जाणारी ही अवस्था सर्वभेदशून्य आहे. येथे उच्चनीच भावनेचे गुंथाडे मुळीच  दिसून येत नाही. विविधत्व मावळून गेलेले असते. भिन्नत्वाच्या  भावनेचा अगदीच लोप झालेला असतो. व्यावहारिक उच्च  नीच भावनेचा प्रश्न बाजूला राहूं द्या ! पण ही जीवेश्वरां तील भेदाची जाणीव तरी तेथे असावयास पाहिजे होती ! ती जाणीव सुध्दा येथे  दिसून येत नाही. ही सुषुप्तिअवस्था बाहय प्रदेशी अमक्याला  अमके ठिकाणी गेले असतां लाभते असे नसून ती या देहाच्या आंतच प्रत्येकाकडून अनुभविली जाते. या अवस्थेत  सर्वांचा  लय होत असल्यामुळे हे सर्वहि अफाट विश्व आपल्यात  विलीन करून घेणारे असे कोणचे या देहांत आहे? ते किती असावे ? बाहयपदार्थांचे होणारे भानदेखील देहाच्या आतच कोठे तरी होत असते. बाहेर दिसणाऱ्या पदार्थांतून त्याभानाचा  मागमूस हि  आढळून येत नाही. विचाराने या देहाकडे पाहू गेले असतां देह हासप्तधात्वात्मकआहे. ‘सप्तधातुअन्न विकाररुप आहेत. या अन्नविकारातून दृश्याचे भान जेथे होते अशी कोणची तरी जागा शोधून पाहूं गेलो असतां, त्या भानामुळेच हे सर्व पाहिले जातें असें ठरून शेवटी भान कोठे आहे याचा पत्ताच लागत नाही. त्याचे स्वरुप काय ? आंत राहून ते बाहेरचे कसे बघतें ? देहसुद्धा या भानाला संपूर्ण दिसून येत नसून चक्षु रादि इंद्रियांना भासणारा जितका म्हणून भाग आहे तितकाच भासतो. हे भान देहांतच असून देहाच्या आतील भाग मात्र याने गोचर होत नाही. देहांत असणारे हे एकच भान कानाने ऐकतें, डोळयाने बघतें, जीभेने रुची चाखतें, घ्राणेंद्रियाने सुगंधदुर्गंध पदार्थं निवडतें, त्वचेने कठीणमृदुशीतोष्णादि भाव ओळखते. या सर्व इंद्रियांच्या आंत असणारी ही जाणीव एकच असली तरी तें तें ज्ञान तिला त्या त्या इंद्रियाकरवींच होते. एका इंद्रियाचे काम दुसऱ्या इंद्रियाकडून होत नाही. इंद्रिये जरी वेगळी असली, त्यांच्याकडून बाहयपदार्थांचा अनुभव शब्दस्पर्शादि भेदानी जरी वेगळा असला तरी याचा अनुभव एकंदरीत कोठेतरी एकाच ठिकाणी झालेला, शेवटी उरलेल्या अनुभवाच्या दृष्टीने समजून येईल. ‘होयनव्हेअशा रितीची शंकात्मक जाणीव मन म्हणून जरी मानले तरी हे मन या इंद्रियाप्रमाणेच ज्याच्यामुळे भासले जाते ते ज्ञान कोणचे ? बुद्धिनिश्चयात्मकवृत्ती जरी मानली तरी हा वृत्तीचा निश्चय कशामुळे प्रकाशला जातो? ‘मीम्हणून हे भान या सर्वांच्या पूर्वी असणारे. याच्यामुळेच हे सर्व समजते असे जरी मानले तरीमीहा अनुभव उजळणारा असा तो कोणचा ज्ञानप्रकाश ? आपल्या तेजाने उजळणारा असा कोणता तरी एक स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशरुप हा प्रकाश असला पाहिजे. ज्ञानापासूनच ज्ञानाचा व्यवहार घडणे संभवनीय

या साऱ्या ज्ञानात्मक व्यवहाराला कारण असणारे ज्ञानरुपच असले पाहिजे. हे केव्हाहि या सर्वापूर्वीच असणार. ‘मीया भानाला गोचर होणारे सर्वहि दृश्य काढून टाकल्यानंतर काहींच दिसून येता म्हणजे जागृतस्वप्नहि भासतामीया भानाचे पूर्वीचेच गाला उजळणारे कोणचे तरी स्वप्रकाशज्ञान स्वरुप, ‘मीया भानाच्या लयानंतर याचे लयस्थान म्हणून उरत असले पाहिजे. मीया भानात असणारा दृश्यभाव आणि चांचल्य हे आप ध्यान प्रकाशाने उजळणारे नव्हेत. याला उजळणारे, आपल्याच पाशाने प्रकाशमान असणारे असे ते कोणचे ज्ञानस्वरुप, म्हणून गा। पाहू गेले असतांना यांत ते आढळता या सर्व अन्यायाच्या निराराकरणाने हेच शेवटी स्वतः सिद्ध असे उरते. यातमी पणहें, उत्पन्न झाले कसे म्हणून शोधू गेले असता हे एकच शेवटी शिल्लक राहील. सर्वांनाहि उजळणारी, सर्वांच्या निराकरणाने शेवटी उरणारी स्वयंप्रकाश अशी वस्तु अद्वितीयच ठरेल. स्वयंप्रकाश  वस्तु दोन असू शकत नाहीत. ‘मीहे स्वतःचे भान, कोणत्या का कारणामुळे होईना, या स्वयंप्रकाशित ज्ञानस्वरुपात दिसून आले  तरी स्मृतीरुपाने त्या स्वयंप्रकाशमान ज्ञानरुपाचेच 

|| आपले मळ म्हणून दाखवील. अर्थात या दृष्टीनेमीया अपरोक्षभानाला  लक्ष्य म्हणून असे हे स्वयंप्रकाशस्वरुपच ठरले की आपल्याच भानाने  ती वस्तु अद्वय अशी सहजच होईल.

home-last-sec-img