Literature

विषय विवेचन २

जो सद्गुरूसी शरण गेला अद्वैत निरुपणी बोधिला। || जरी तो वेगळा केला तरी तो होणार नाहीं॥वेगळेपणाची माता। ते लटके वंध्येची सुता।म्हणोनिया अभिन्नता मुळीच आहे  (..२१|२३ ५४) सुषुप्त्यावस्थेत हे सर्व लीन झाले असता जे काही अरुप असते ते केवळ अज्ञानच नसून जागृतस्वप्नात दिसून येणाऱ्या सुखाच्या भानाला कारण असें केवळ शून्य ठरता, त्या शून्यात या सर्व दृश्याचा लय झाला त्यात भासणारे सुखाच्या अस्तित्वाचे भान ज्याच्यामुळे प्रकाशले जातें असें कांहीं तरी स्वयंप्रकाशमान आनंद रूपच त्याठिकाणी उरतें. जागृतस्वप्नात देखील सुखाच्या भाव नेने या सर्व पदार्थांतून त्या आनंदाचाच भास होत असल्यामुळे सुषुप्तीप्रमाणे यांत देखील अधिष्ठानरूपाने सदाचेच हे एकरूप आहे. हे भान काढून टाकले असता काहीच दिसून येता पदार्थ मात्रच नष्ट होत असल्यामुळे सदाचेच असणारे हे सुख यातून व्यापून असल्यामुळेच जागृतस्वप्नातून त्याचे भान होते हे स्पष्ट आहे. सदाचेच असणारे, शाश्वत असल्याकारणाने त्याचा कधीच नाश होत नाही

विनाशमव्ययस्यास्य कश्चित्कर्तुमर्हति (.गी. २-१७) जागृतस्वप्नांतून असलेले हे असले सुखाचे भान ज्याला आपले कारणत्व देते ते हे आनंदरूपच सुषुप्तीत केवळ रूपाने उरते. तेचमीया स्फुरणाने यथार्थ मूळस्वरूपच प्रातःस्मर णाच्याप्रातःकाली स्मरत मम...या पहिल्या श्लोकाने ध्वनित झाले आहे. ते आपले असे मूळ स्वरूप, हे जाणून अनेक जन्माच्या विषयसुखाच्या दगदगीने कंटाळलेले निर्विषय सुखप्रीतीच्या याविवेकोदयप्रातःकाळी आपले यथार्थ स्वरूप असे म्हणून आपलेच स्वरुप आपणअहंहे स्फुरण आठवीत आहे.तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाहयतः।(ईशावास्य ५) घटामधून मृत्तिका ज्याप्रमाणे व्यापून असते, त्याप्रमाणे आपले शाश्वतानंदरूप या सर्व भावनेतून, या मनांतून, या इंद्रियांतून, पदार्थांतून, या सर्वांना जाणणाऱ्या मीपणाच्या भावनेतून, इतकेंच नव्हे तर सुषुप्तीमध्ये काही समजल्या जाणाऱ्या त्या अज्ञानातून देखील व्यापून आहे.विचार करूं गेले असतां, सर्व अनर्थांनादुसरेंही भावनाच कारण आहे हे आढळून येईल. दुसरे म्हणून भासले नसतांना भीतीचा मुळी संभवच नसतो. कसलाहि अनर्थ तो कोणामुळे होणार ? विकाराची प्राप्ती ही अन्य पदार्थानेच दिसून येत असल्या मुळे एकत्वांत हा विकार तरी कसा उत्पन्न होईल ? एकत्वांत या मनाचे चांचल्य देखील उरणार नाही

यन्मदन्यन्नास्ति कस्मान्नुविभेमिति तत एवास्य भयं विहाय। मूळ  पुरुषाच्या उदाहरणाने त्याच्या अनुभवाने दुसऱ्या भागले वाटणारी ही आपल्या मनातील भीति जर काढून टाकावयाची   झाली तरमाझ्याहून ज्या अर्थी दुसरे काही नाही त्या अर्थी मी कशाची भीति बाळगावी? ‘ आपल्या मनातील या भुमिकेवरच प्रत्येकास यावयास पाहिजे. भीति ही आपल्या अद्वितीयत्वतेच्या ज्ञानानेच नष्ट होते, असें श्रुतींचे सांगणे आहे

सर्वत्राद्वैत बुद्धि कुर्यात् ‘ ‘सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानिति शान्त उपासीत (छांदो.३।१४।१) आत्मा वा अरे द्रष्टव्यः 

श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्य :‘ (बह. २।४।५) स्वरूपानु संधानेन वसेत ‘ ‘सच्चिदानन्दात्मानमद्वितीयं ब्रह्म भावयेत् स्वरूपानु संधानं  विनान्यथाचारपरो भवेत् ‘ 

सर्वत्र अद्वैत  बुद्धी ठेवावी ‘ ‘ हे सर्व त्यातूनच उत्पन्न होत असल्यामुळे, उत्पन्न झालेले शेवटी त्यांतच उत्पन्न झालेल्या क्रमाने लीन होत असल्यामुळे, त्यांच्यातच हे सारे स्थितिकालीहि तज्जीवनरूपानेच चेष्टत असल्यामुळे तद्व्यतिरिक्त कांहीहि असत नसल्या मुळे तेंच हे सर्वकाहीं अशारितीने भिन्न भ्रांती टाकून भिन्नभ्रांतीच ज्या विकाराला कारण होते त्या विकाराने रहित म्हणजे शांत होऊन ते अद्वितीय पूर्णब्रह्मच मी असा निश्चय बाळगून त्या ब्रह्माची उपासना करावी.’ ‘ हे आत्मस्वरूप पहावें, आत्मस्वरूपाचाच निश्चय श्रीगुरु श्रुतींकडून ऐकावा, त्याचेच मनन करावे, त्याचाच निश्चय बाळगावा म्हणजे तेंचमीम्हणून निश्चयाने ध्यावं.’ ‘स्वरूपासंधानानेच असावें. — ‘सच्चिदानंदात्मक अद्वितीय ब्रह्मच मी म्हणून आपली भावना करावी.’ ‘ स्वरूपासंधानाशिवाय मनाला इतर कोणाचेंहि व्यवधान राखू नये. ‘ हाच या सर्व श्रुतींचा अर्थ

स्वात्मनोऽन्यतया भातं चराचिरामिदं जगत् स्वात्ममात्रतया बुध्वा तदस्मीति विभावय

वेगळे असणारे हे चराचरात्मक जग स्वमात्र जाणून आपली अद्वितीय भावना दृढ करावी,’ असे श्रुतीचे सांगणे आहे. ज्याला नाश असतो ते आपल्याहून वेगळेच असते. अशा या लक्षणाने आपला बोध करूं गेलो असतांना, कशापासूनहि नाश पावणारे, सर्वांना भासविणारे, अज्ञानातूनहि आपल्या अविकारी स्वरूपाने व्यापून असणारे निरंकुश असें स्वयंप्रकाशमान आपले स्वरूप आहे असे आढळन येईल. आपल्या अद्वितीयत्वतेंत उपाधीकृत हे अनेकत्व आपल्या शोधाने दिसत असतांच विरून जाते. आपलेच भान आपल्याला असणार. तेव्हां अद्वितीय स्वरूपाहून वेगळे कांहींच उरतां ज्ञान मात्र एक आपणच उरूं

यत्र वा अस्य सर्वमात्मैवाभूत्तत्केन कं जिघ्रेत्तत्केन के पश्येत्तत्केन क्रम श्रुणुयात्केन कं मन्वीत तत्केन कं विजानीयात् ।। (बृह. १४

ज्ञानमात्र स्वरूपानें अखंड असणाऱ्या या ज्ञान्याला इतर म्हणूनकांहीं उरत नसल्यामुळे हा आत्मक्रीड आत्मरति:आपल्यां तच आपण मुरून स्वस्थ असतो. याच्या प्रीतीला, याच्या क्रियेला अन्य म्हणून काहीहि उरत नाही. अखंड ज्ञान, अन्याभावीं निष्क्रियच असते. जिथे अज्ञानाने द्वैताची भावना होते तिथेच अन्याचा उपभोग अन्य कारणादिकांच्या अभिमानानें अन्य मी म्हणून  याच्या उपभोगाने मला सुख लाभेल म्हणून पहाणे, हुंगणे, चाखणे, बोलणे, ऐकणे, मानणे, स्पर्शणे, जाणणे वगैरे या क्रिया होत  असतात. आत्मज्ञानीपश्यत्यचक्षुः सश्रुणोत्यकर्ण: ज्ञान स्वरूपच असल्यामुळे डोळयाशिवाय बघतो, कानाशिवाय ऐकतो. म्हणून सर्व इंद्रियांचे धर्म याच्यामुळेच प्रकाशले जात असल्याने जाणीवेला अन्याची अपेक्षा नसल्याने सर्वावभासक आपल्याच ज्ञानमात्रतेने पूर्णत्त्व पावून इतर काही नसतां आपणच सारे होऊन सर्वांचा अनुभव आत्मदृष्टीनेच भिन्नत्वाने भासणारासर्व शब्द काढून टाकून स्वच्छ असतो. आपल्या अन्य निरपेक्ष आनंदां तच स्वभाव विरवुन म्हणजे आपल्या ठिकाणीअनुभाव्य, अनुभव आणि अनुभवितया त्रिपुटीचे उत्थान होऊ देतां आपणच ना हें कारणाने शिल्लक रहातो

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो विजुगुप्सते॥‘ (ईशा.

जो  सर्वआपल्यातच बघून आपल्याला जो सर्वांमध्ये बघतो त्याला ह्या  जगांत अन्य असे काहीहि उरत नाही

शोके दुखवावी वृत्ती तरी ते जहाली निवृत्ति म्हणौनि साधु आदि अंतीं शोकरहित ‘ (दा. ८।९।३७)

मोहें झळंबावें मन तरी तें जाहले उन्मन या कारणे साधुजन मोहातीत (दा. ८।९।३८

साधु आपणचि एक तेथें कैचा दुःखशोक दुजेविण अविवेक येणार नाही” (दा. ८।९।४५

ज्ञान्यालासाधने जे काय साधावें तें तो आपणचि स्वभावे।असें पक्के ठसल्यामुळेसाधनें काय साधावें नेमे काय फळ द्यावे। आपण वस्तु भरंगळावें। कासयासी असे होऊन त्याच्या ठिकाणची कोणत्या तरी साधनाने सुख साधणारे आपण कोणी एक आहो, ही भावना सपशेल ठार झालेली असते. त्याच्या ठिकाणी साधकाच्या नांवे ।शून्याकार असतो. स्वरूपी भरतां कल्पना तेथों कैची उरेल कामना म्हणोनियां साधुजना कामच नाही (दा. ८।९।२४) राजहंसा चारा मोत्याचाची।मग तो काय म्हणून हे सारे अपेक्षील

नाश पावणारे तें सुख कधी होऊ शकत नाही. सुख नाश पावल्यानंतर सर्व कारभारच आटोपला. आपला नाश कोणीहि पहाणे शक्य नाही. स्वभावाने अविनाशी असणारी वस्तु कोणामुळे नाश पावेल ? असे हे अविनाशी सुख विनाश पावणाऱ्या सर्व पदार्थापासून वेगळे असल्यामुळे या सर्वांच्या निराकरणानेच त्याची प्राप्ती होते. कारणाचा आदि, मध्य अंत कार्याकडून समजणे शक्य नाही. कार्य हे अनित्य असते. अचेतन म्हणजे जड. कोणत्याहि अन्य चेतनात्मक निमित्तावाचन अचेतन पदार्थांच्या ठिकाणी कोणाचीहि प्रवृत्ती दिसून येत नाही. असे हे जड पदार्थ परिच्छिन्न असतात, म्हणजे देश, काल आणि वस्तूंच्या योगाने मर्यादित असतात, असे हे देश, काल, वस्तूंनी मर्यादित असणारे पदार्थ देशकालवस्तु ज्याला मर्यादित करु शकत नाहीत म्हणजे जे अमक्या एका ठिकाणी असून दुसरीकडे नाहिसे होत नाही, जे चोहोंकडे दाट व्यापून असते, जे सत्यस्वरुपानें अद्वितीय असते, ज्याला नामरुप नसल्यामुळे ज्याची उत्पत्ती संभवत नाही असें हे स्वरुप कोणत्याहि कार्यजातानी ओळखले जाणे शक्य नाही. जे ओळखले जात नाहीं तेंसांतहोऊ शकत नाही. ज्याची मर्यादा पळून येत नाही त्यालाचअनंतअसे म्हणतात. जे अनंत आहे अनादिअसते. ‘सादिपदार्थचसांतअसतात. जे कार्य नाही म्हणजेच ज्याला आदि नाही त्याला, कार्यच नाश पावत असल्यामुळे, अंतहि पण नाही. अशी ही अनाद्यवंत वस्तु अद्वितीयच असते. दोन अनादि अथवा दोन अनंत वस्तु असू शकत नाहीत.’ There Cannot be two Infinites nor two Eternals’ हें देशकाल वस्तूनी मर्यादित होणारे अद्वितीय, अनादि, अनंत स्वरुप  कधीहि ज्ञेय होणे शक्य नाही. ज्ञेय तें जडच असते. तेंव्हा या अनादि अनंत वस्तूची ओळख पटवून घेण्याकरतां तें हे काहीहि होत नसल्यामुळे या कार्यजाताचे निराकरण करणेच प्राप्त जाणार, त्याची ओळख पटणार ! तें कसें आहे या प्रश्नाचे उत्तर ते नव्हें ते नव्हें एवढेच देता येईल. अशा दृष्टीने सर्व कार्य जात निरसून जे काही उरते, त्या ठिकाणी त्याला पहाणारहि पण शिल्लक रहाणार नसल्यामुळे ते स्वरुप अमूकच असे कसे म्हणतां येईल ?

निर्विकल्पमनन्ततञ्च हेतु दृष्टान्तवर्जीतम्।‘ 

आपले स्वरुप विकल्प असून अनंत आहे. तेथे कार्यकारणभावाचा मागमूसहि काही कोणच्याहि दुष्टांताने समजणे शक्य नाही. जो पदार्थं अमूक म्हणून जाणता येत नाही त्याला कसलेहि विशेषण लागू पडत नाही. तेहे नव्हेएवढे सांगता येईल 

एष नेति नेत्माऽगृहयो हि गृहयते ‘ (बृह.) — नेदं यदिदमुपासते। (केन. ) जे मन इंद्रियाकडून ग्रहण केले जाते जे मन इंद्रियाकडून उपासले जातें तें काही आत्म स्वरुप नव्हे, असे सांगून ते कसे आहे या प्रश्नाचे उत्त अवचनेन प्रोवाच मौन व्याख्येनेच श्रुति देत आहे. अन्यामुळे प्रकाशली जाणारी वस्तु प्रकाशविणाऱ्या वस्तुकडून जाणली जाते. विज्ञा तारं अरे केन विजानीयात् ? स्वयंप्रकाशक स्वयंप्रकाशवस्तु कोणाकडून प्रकाशिली जाणार ? जे ज्याच्याकडून प्रकाशिले जातें तें प्रकाशरहित असल्यामुळे या आपल्या प्रकाशकाला प्रकाशू शकत नाहीं; म्हणजेच जाणू शकत नाही. जाणणे म्हणजेच प्रकाशणे. जे प्रकाशुं शकत नाही ते जाणू शकत नाही, सर्पभानाच्या संपूर्ण नाशानेच या भ्रमाला कारणीभूत असणाऱ्या दोरीचे जसे ज्ञान होते तसेंच ज्ञात, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी ओसरुन गेल्यानंतरच तें जाणले जाते. म्हणजे भ्रमकार्य ओसरल्यानंतर ते स्वतःच स्वयं प्रकाशाने उरते असा याचा अर्थ. भ्रमरुप कार्यामुळे अधिष्ठान कधीहि विकार पावत नाही, दोन भिन्न पदार्थांच्या मिश्रणानींच परस्परांचा परिणाम परस्परांवर दिसून येतो, ‘सावयवपदार्थाचाच संयोग होतो. भ्रमरूप कार्य हे ज्यांत मुळी नसते अशा त्या सत्य अधिष्ठानाशी या भ्रमकार्याचा संयोग होणे शक्य नाही. भ्रमरुप असणाऱ्या सर्पाच्या भावनेला दोरी जशी असंग असते तसेच हे जगदधिष्ठान या भ्रमरुप कार्याशी असंग असते. असंग नहि सज्जते। या असंग आत्मीय स्वरुपाला दुसऱ्या श्लोकांतउदासहा शब्दप्रयोग आढळून येतो.’ आहे तरी चहूंकडे परी अणुमात्र दृष्टी पडे उदास परी येकीकडे पाहतां दिसेना (दा. १।९।४

उदासयाचा अर्थउद्विग्नअसा नसून आपल्यावर भासणाऱ्या भ्रामक कार्याला प्रकाशित करीत जे स्वतः सिद्ध आनंद स्वरुप असते जे आपल्या पूर्णतेकरतां या भ्रामक कार्याची अपेक्षा करीत नाही तेच हेउदास

 म्हणून म्दटले जाते. स्वयं ज्योतिर्हि पुरुषः स्वयं प्रकाशमान वस्तूंच्या ठिकाणी दुसरे काही नसल्यामुळेअन्याचेभान त्याला असत नाही. ही वस्तुस्वेन भासा स्वे महिम्नि।स्वमात्र असते. ती आपल्याच भासाने भासते, आपल्याच थोरपणाने थोर असते, आपल्याच प्रभावाने प्रभावशाली असते, आपल्या अनंत वैभवाने वैभवशाली असते. हिला अन्याचा आश्रय नसतो. ही आपल्याच स्वरूपाने प्रतिष्ठित असते. अखंड दंडायमान असणाऱ्या या स्वयं प्रकाशित वस्तूंत कार्य हे भ्रामकच असते. भ्रमात्मक असणाऱ्या सर्पाविभासातून दोरीच्या व्याप्तीप्रमाणे या भ्रमकार्यातून स्वयं प्रकाशमान स्वतःसिद्ध अधिष्ठानाची अविकारी व्याप्ति असते. भ्रमकार्य अधिष्ठानात फेरबदल करीत नाही. सर्पाच्या विशेष भासाने दोरीत जसा फेरबदल होत नाही तसाच या स्वयंप्रकाशमान वस्तूत अन्याच्या विभासाने म्हणजे चंचळ आणि नामरुपात्मक अश्या  कार्यरुपी विशेष भासाने थोडासुद्धां फरक होत नाही. दोरीजशी आपल्या अद्वितीयत्वाने आपल्यावर भासलेल्या भ्रामक सर्पाविभासात व्यापून असते त्याचप्रमाणे ही स्वयंप्रकाशमान वस्तू देखील आपल्या अद्वितीयत्वेने या सर्व भ्रामक कार्यातून भरगच्च मापुन आहे. आकाशासारखी ही आपल्याहून वेगळ्या पदार्थांना 

अवकाशप्रद नसून अन्य कार्याला आपल्यांत मुळीच अवकाश देणारी अशी एक भरीव वस्तु आहे

उपाधीविण जे आकाश तेंचि ब्रह्म निराभास।‘ (दा. १०।३।१) रज्जूवर भासणारा सर्प रज्जूचा भरीवपणा कायम ठेवूनच भासतो त्याप्रमाणेच या स्वयंप्रकाशमान वस्तूंचे भरीव पण कायम ठेवूनच त्याच्यावर हे भ्रामक कार्य भासते. हा भावच अद्वैतत्त्वे सधन सकली या शब्दाने प्रकट झाला आहे. रज्जूच्या ज्ञानानंतर आपल्या निरुपद्रवी स्वभावाने एकदां का रज्जू डोळया पुढे आली की सर्व भ्रांतियुक्त मन जसे मावळते त्याचप्रमाणे इथेंहि एकदां कां या निर्विकारी स्वयंप्रकाशमान अधिष्ठानाचे ज्ञान झाले आणि त्याचे अद्वितीयत्व एकदां कां पटले म्हणजे भिन्नभास दाखविणारे भ्रामक मन मावळून जाते. ते पुढे जीव धरून रहात नाही

यन्मनस्त्रिजगत्सृष्टि स्थितिव्यसनकर्मकृत् तन्मनो विलयं याति तद्विष्णोः परमं पदम्  

जगत्रयाची उत्पत्ति, स्थिति लय करणारे मन पूर्णपणे मावळून जाऊन उर्वरित उरणारी अवस्थाच ब्राह्मीस्थितिरूप मुक्ति. हेच विष्णुपद

यद्धि मनसा ध्यायति, यन्मनसाभिगच्छति, तद्वाचा वदति, तत्कर्मणा करोति ‘ (तै. . २।५।११

मनामधील निश्चयच वाणीतून प्रगटतो त्याप्रमाणेच कर्म घडते. – 

दृष्यम  जडं द्वन्द्वजातं अज्ञानं मानसं जगत् ‘ 

दृश्य, जड द्वंद्वारुपाने भासणारे सर्व अज्ञानात्मक जग मानसिकच. मनो मात्रमिदं सर्वम् सर्व मनोमात्रच. आत्मस्वरुपमात्र याहून वेगळे आहे. तें नैव वाचा मनसा प्राप्तुं शक्यो चक्षुणावाणीनें, मनानें, डोळ्याने प्राप्त होत नाही. दृश्योन्मुख इन्द्रियांस चेतविणाऱ्या या मनाची धाव आत्मस्वरुपाच्या ठिकाणी लंगडी पडते. दृश्य संकल्पाचेंच या मनाला बाळसे येते. ‘अहं ब्रह्माहम स्मीति स्मरणस्य मनो हि मी परब्रह्म म्हणून जेव्हा कां जिवाला स्मृति येते तेव्हा मनाचा ठावच पुसला जातो. आत्म मात्र स्थितीत भिन्न भास दाखविणारे हे मन शिल्लक कसे राहील? एकत्वांत अन्याचा मागमूसहि नसतो. असे झाले की, भिन्न भाव नच जीव धरुन असणारे हे मन उभ्यानेच प्राण सोडते. त्याचे जीवनच जर नष्ट झाले तर ते राहील कसे ! हाच भावज्याच्या गानी मनचि नुरतेंया शब्दानी दुसऱ्या श्लोकात प्रगट झाला आहे

home-last-sec-img