Literature

विषय विवेचन ४

ब्रह्म वा इदमग्र आसीत्तदात्मानमेवावेदहं ब्रह्मास्मीति तस्मात्तत्सर्वमभवत् ‘ (बृह. १।४।१०) 

सर्वांच्या पूर्वी ब्रह्मच होते. ‘मी ब्रह्म आहेअशा या आपल्या भानाने त्याने आपल्या स्वतःला जाणले जाणिवेमुळेच पुढे तें सर्व कांहीं झाले, असा या श्रुतीचा अर्थ. ‘ मी ब्रह्म आहेही त्याच्या ठिकाणी झालेली त्याची आठवणच होय हे स्पष्ट आहे. ‘चिद्रूपं ब्रह्म ब्रह्म हे ज्ञानरूप आहे. ज्ञानस्वरूपाला विस्मृती कधीं संभवत नाही. स्मृति ही विस्मृतिसापेक्ष आहे तेव्हां नित्य ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी विस्मृति शक्य नसल्यामुळे  विस्मृतीनंतर येणारी स्मृती पण त्याला असणे शक्य नाही. अश्या दृष्टीने नित्यबोधस्वरूपाच्या ठिकाणी स्मृति येण्याला काही कारण दिसून येत नसल्यामुळे, कारणरहित कार्य मिथ्याच असल्यामुळे ही आठवण म्हणजे · अहं ब्रह्मास्मिहे स्फुरण मिथ्याच झाले

उपाधीविण जे आकाश तेंचि ब्रह्म निराभास तें निराभासी मूळ मायेस जन्म झाला॥‘ (दास.१०।३।१) ‘अहं ऐसे जे स्फुरण तेंचि मायेचें लक्षण (दास.१०।२।११

या श्री समर्थांच्या ओव्यानी हेअहं ब्रह्मास्मिस्फुरणच मायेचे स्वरूप झाले. हे स्फुरणभासात्मकचहे स्पष्टआहे. पण ब्रह्म मात्र निराभास स्वरूप हे श्रीसमर्थांनीच सांगितले आहे. निरा भासांत तद्विरुद्ध भासात्मक हे स्फुरण होईल कसे? निर्विकारांत विकाराची उत्पत्तीहि असंभवनीयच. माया झाली असे धरून चाललों तरी सयुक्तिक ठरत नाही; हे कसे ? ते पाहूं

चंचळ ते स्थिरावेना निश्चळ ते कदापि चळेना (दास. १४२१) ‘ब्रह्म हे निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ‘ (दास. ) निश्चळ ब्रह्म माया चंचळ. निश्चळाच्या ठिकाणी चांचल्य कसे होईल? ‘ब्रह्मनिरुपाधी केवळ। माया उपाधीरूपी‘ (दास. ) निरुपाधी ब्रह्म केवळ स्वरूपाने अद्वितीय असता दुसरे असे त्यात काय होईल ? तेव्हां उपाधीरूप मायेचे स्वरूप कधीहि होणे शक्य नाही. म्हणूनच ही माया अथवा ही अहं ब्रह्म स्फूतिब्रह्म स्वरूपांत खरी झालेली नव्हे म्हणजे खोटीच असे सिद्ध होईल. _ माया विकारी ब्रह्म निर्विकारी। (दास ६।५।८) ब्रह्म निर्विकारी असे झाले तर ते विकारी मायेचे स्वरूप कसे येईल?  

माया कठीण ब्रह्म कोमल ‘ (दास. ६।५।२०) कठीण म्हाणजे  स्थूळ. ‘ऐसी माया उद्भवलीअसल्यामुळेजी वस्तु निर संचलीतींत ही झाली नाही असेच म्हणावे लागते. कार्य स्थूळ असते. हे स्थूळ कार्य जडच. ‘कारणकधीचकार्यहोऊं शकत  नाही. तसेच कारणरूप ब्रह्मांत जड कार्य उत्पन्न होण्यास काही कारणहि पण दिसत नाहीकोमळया शब्दानें अतिसूक्ष्म असा अर्थ दर्शविला जातो. ज्ञान हे अतिसूक्ष्म आहे. समजून येणारे स्थूळ असते. म्हणून ही स्फूर्तिरूप माया स्थूळच झाली. त्या अति सूक्ष्म असणाऱ्या परब्रह्माच्या ठिकाणी ही स्थूळरूपी माया उत्पन्न होण्यास काही कारणच दिसत नाही. ब्रह्म सूक्ष्म केवळ माय स्थूळरूपी ‘ (दास. ६।५।१३) झालेलें तें अल्प असते. या अल्प कार्यांतून कारणाचा समावेश होत नसल्यामुळे कारण हे कार्याच्या दृष्टीने अनंतच असणार. अशा या विशाल परब्रह्मांत ही अल्प माया कशी उत्पन्न होईल ? बृहत्वात् ब्रह्म।‘ ‘माया अल्प ब्रह्म विशाल ‘ (दास. ६।५।२०) या दृष्टीने विचार करू लागलों असतां माया नासे मायेची भावना नष्ट होते. म्हणजे तिची उत्पत्ति संभवनीय वाटत नाही. कारण विशाल अशा स्वरूपांत अल्पाची उत्पत्ति अशक्यच. जे उत्पन्न झालेले नसतें तें आहे कशावरून ? असणारेंचि सदोदित असते. सर्वकाळ ब्रह्मचि असे हे कां एकदां ठरलें म्हणजे या मायेच्या उत्पत्तीला काही कारण दिसत नाही. कारणरहित कार्य मिथ्याच असते. __‘सत्य म्हणजे स्वरूप जाण असत्य माया हे प्रमाण‘ (दास १०।१०।५५) या श्रीसमर्थांच्या ओवीनेहि मायेचे स्वरूप लक्षात येईल. सदोदित असणारे म्हणजे स्वरूपच. आपले स्वरूप नष्ट झाले असे समजले तरी ज्याला समजले ते आपणअवि नाशीचअसू. समजले नाही तर तें झालें कशावरून ? सारांश,स्वतःचा नाश स्वतःला भासत नसल्यामुळे आपण अविनाशी असें ब्रह्म तें शाश्वत एक आहोत या अविनाशी म्हणजे सत्य स्वरूपांत. परब्रह्मांत सदोदित एकरूपाने असणाऱ्या या आपल्यात ही माया खोटीच ठरते, या मा सा माया। ही माया शब्दाची उत्पत्ति ; यादृष्टीने अहं ब्रह्म म्हणुनि जीस्वरूपाच्या ठिकाणी प्रगटेतीसी माया म्हणत असें बाराव्या आर्येत सांगितले गेले आहे. या दृष्टीने अहं ब्रह्मास्मिया जाणिवेच्या योगाने मायेचीच उत्पत्ति श्रुतीने सांगितली आहे हे स्पष्ट होईल. माया सर्व करी ब्रह्म कांहींच करी माया नानारूपे धरी। ब्रह्म तें अरूप (दास .५।८) गुण मायेचे पवाडे। निर्गुणी हैं कांहींच धडे। (दा. ८।३।५२) नाना विकाराचे मूळ ते हे मळमायाचि केवळ। इत्यादि श्रीसमर्थांच्या वाक्यानीदेखील मायेपासून सर्व काही झाले हे स्पष्ट आहे. ‘निश्चळ गगनी चंचळ वारा। वाजो लागला भरारा। परी त्या गगना आणि समीरा भेद आहे॥ (दा. १०।१०।१०) रूप वायोचें झालें तेणे आकाश भंगलें। ऐसे हे सत्य मानलें। वचे की कदा॥ (दा. ८।३।२८) आकाश जैसें निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार मूळमाया ‘ (दा. ९।६।१) आकाशी वायू झाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळमाया जाण ‘ (दा. १०।९।१

या श्रीसमर्थांच्या ओव्यानी आकाशात वायूच्या विकाराप्रमाणे ब्रह्मांत ही मूळ माया होते. आकाळ निश्चळ, वायू हा चंचल,  भरारा काजणारा. वायूच्या उत्पत्तीने आकाश भंगले म्हणजे खोटेच. अशा या वायू आणि आकाशांत भेद आहे. आकाशाप्रमाणे ब्रह्म निश्चल निराकार आहे. त्यांत या मायेमुळे विकार झाला नाही. तें जशेच्या तसेच अभंग आहे. आकाशांत भरारा वाजणाऱ्या वायू च्या उत्पत्तिप्रमाणेच या निश्चल म्हणून निःशब्द अस णाऱ्या या ब्रह्मांत अहं ब्रह्मास्मिमायेची उत्पत्ति घोषरूपाने होते. वायूआकाशाच्या भेदाप्रमाणेच या परस्परांत भेद आहे. त्या घोषासी माया म्हणत। अहं ब्रह्म म्हणून जो घोष प्रगटतो तो निश्चल निःशब्द अशा या आपल्या सकारण नसल्यामुळे खोटाच. यालाचमाया हे नांव आहे, असें जें या आर्येत म्हटले आहे ते या श्रीसमर्थांच्या ओव्यानी स्पष्ट होईल. माया आपुली कल्पना म्हणजेमी ब्रह्म आहेही आपली भावना हीचमाया सृष्टीची रचना। सर्व झालेल्याची जननीमी ब्रह्म आहेती स्मृति ज्याच्यावर उमटली तें आपलें सत्ता मात्र स्वरूप स्मृतिविस्मृतिपेक्षा पूर्वीचे जसेच्या तसेच असणारे केवळ ज्ञानस्वरूपच आहे. त्यांतमीहे विस्मृतिसापेक्ष स्मृतीचे स्फुरण संभवत नसल्यामुळे, ही स्मृतीच या सर्वाचे कारण असल्या मुळे, इच्यामुळेच आपल्यात विकाराचा भास दिसून येत असल्या मुळे मीपणापासूनि सुटला तोचि एक मुक्त झाला।‘ (दास ७।६।५४) असें श्रीसमर्थांचे सांगणे आहे. आकारालाच अवयव असतात. हे अवयवात्मक आकार कार्यातगणले जात असल्या मुळे, कार्य याच्या स्वतःपूर्ण कारण स्वरूपांत भ्रामक असल्या मुळे, भ्रम अधिष्ठानांत विकार करीत नसल्यामुळे, अधिष्ठान जसेच्या तसेंच असतांना त्यांत इतर भासणे मुळी अशक्यच असल्यामुळे अधिष्ठानरूपाने या कार्याहून विलक्षण म्हणून आपण निराकार निरावयव आहोत. त्या निरावयवीं कैसें झालें चराचर?’ या प्रश्नाला उत्तर अवघी माया विस्तारली असे जरी गृहित धरले तरी ती निराकारीकैसी झाली मूळमाया हा प्रश्न उरतोच, असे कोणी विचारल्यास, याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्या भान विवर्तरूप भासे ।। (दा. ८१२।२) या अहं ब्रह्मास्मि भानाचा संपर्क आपल्यास नाही. नित्य बोध स्वरूपाच्या ठिकाणी स्वत:ला जाणण्याच्या इच्छेचा आरोप खोटाच ठरतो. हीच माया हीमायाजाणिवेचे रूप‘ ‘ तीच इच्छापण हा नुसता आरोप. ‘ब्रह्मीं घडेआपल्यांत शक्यच नाही. दुजेवीण अनुभव हे बोलणेंचि तो वाव या कारणे नाही ठाव अनुभवासी (दा. ६।१०।२९) ___ मग ब्रह्म वस्तूनेच स्वतःलामी ब्रह्मम्हणून जाणले आणि या जाणिवेच्या योगाने पुढे सर्व काही झाले, असें श्रुतीने कसे गांगितले ? या वाक्यानेब्रह्माकडेच संबंध जातो ना!’ असे कोणी आरोपिल्यास, ज्ञानस्वरूपाहून कोणच्याहि अन्य वस्तूकडून काहींच भासणे शक्य नसल्यामुळे, स्वस्मृतीचा संबंध त्याकडेच लागत असल्यामुळे ज्ञानरूपाने ब्रह्म हे अद्वितीय असल्यामुळे याने स्वतःला जाणले, म्हणून श्रुति सांगते. ज्ञानविरहित विस्तार संभवत नसल्यामुळेमी ब्रह्म आहेया भानानें ब्रह्मच सर्व काही झालें म्हणून श्रुतीने सांगितले. म्हणे आतां मीचि स्वरूप तेंचि अहंतेचे रूप निराकारी आपेआप वेगळी पडे (दा. ९।२।१८) · अवघी माया विस्तारली। परी ही निःशेष नाथिली। ऐसी या वचनाची खोली विरळा जाणे ‘ 

(दास ८।३।२१

मूळ संकल्पी अवघे झालें त्या अवघ्याचे अवघे झालें। अष्टधा प्रकृत्तीचे बळावलें। सचराचर (. . ६।३) ‘जाणीवेचा मूळ संकल्प जाणीवेचे चैतन्यरूप मूळ मायेचें रूप तेंहि जाणिवरूप ‘ (. . ६।४) ‘ शोधून पहावें जगदांतरी जाणती तत्त्वें॥‘ (. . ६।२७) ‘मजमाजी मी रमतां, मद्रूपी सहज घोष जो उमटे त्या घोषासी माया म्हणत अहं ब्रह्म रूपि जी प्रगटे ॥१२॥ 

या बाराव्या आर्येचा अर्थ श्रीसमर्थांच्या शब्दानिशी श्रुतीच्या वाक्याशी आतापर्यंत ताडून बघितला. अजून थोड्या वेगळ्या दृष्टीने याचाच विचार करूं.

माया तु प्रकृति विद्यात् ‘ (श्वेता. ४।१०) या श्रुतीच्या आधाराने माया ही प्रकृति झाली. अमरकोशांत प्रकृति या शब्दालास्वभावअसा अर्थ दिला आहे. स्वरूपञ्च स्वभावश्च निसर्गः स्वभाव म्हणजे आपला भाव. भाव म्हणजे भावना अथवा कल्पना. स्वभाव म्हणजे आपली भावना अथवा आपली कल्पना. आपली कल्पना म्हणजे आपली जाणीव. आपली जाणीव म्हणजे आपली स्मृति. या दृष्टीने अहं ब्रह्मास्मि ही जी ब्रह्माच्या ठिकाणी स्वतःची आठवण झाली तिलाचप्रकृतिअथवा माया म्हणून म्हणावयाचे. ‘ अहंपणे जाणीव झालो तेंचि मूळप्रकृति बोलिली महाकारण काया रचिलो ब्रह्मांडाची ।। (दास. १०।१०।१३) यांत मूळ 

मायेलाच प्रकृति म्हणून श्रीसमर्थानी म्हटले आहे. विशेषः कालिकोऽवस्था। या अर्थाने प्रकृति ही कालकृत एक विशेष अवस्था आहे असे मानून याच्यावर थोडासा विचार करूं ! झालेल्याला कालपरिच्छेद असतोच. स्मृति झालेल्यांत गणली गेली की तीनित्य होता तिची विशिष्ट कालींच उत्पत्ति मानावी लागते. ऋतूंच्या चक्रगतीप्रमाणेच या सर्वांचे कारण असणारी प्रकृतिरूप मायादेखील अविर्भावनिरोभावानी युक्त गणी असली पाहिजे. माया उपजे ब्रह्म उपजेना माया मरे ब्रह्म मरेना माया धरे ब्रह्म धरेना। धारणेसी (दास. ६।५।६ ) झाले म्हणजे तें तें कार्य. कार्याला उत्पत्ति आणि नाश असणारच. उत्पन्न झालेले कार्य आपल्या नाशाकडे धावत असते, म्हणजे तें प्रतिक्षणी क्षीण पावत असते. क्रिया ही विधानच. म्हणून प्रत्येक कार्य गतिप्रधान असते. कार्यं हे गति प्रधान , गति ही वेगप्रधान, वेग हा घर्षणप्रधान, म्हणूनअहं ब्रह्मास्मिही स्मृति घोषरूप आहे इलाच माया असे म्हणतात,ही बाराव्या आर्येच्या उत्तरार्धातून आले आहे. प्रणवत्वात्प्रकृति  ।  प्रणवत्वामुळे प्रकृति म्हणजे प्रणवरूपच ही प्रकृति. अहं ब्रह्मास्मि या स्फुरणापासून सर्व काही झाले असें श्रुति सांगते 

ॐ कार प्रभवा देवाः ॐकार प्रभवा स्वराः ॐकार प्रभवं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम ‘ 

सर्व  देव, सर्व स्वर, थोडक्यांत सर्व त्रैलोक्य, हे सारे सचराचर ॐ कारा पासून झाले 

ॐमित्येतदक्षरमिद सर्वम्। (मांडु. ) हे सर्व कार रूपच आहे इत्यादि वाक्यांनी हा कारच अहं ब्रह्मास्मि 

स्मृतिरूप झाला. अहं ब्रह्मास्मीत्यनुसंन्धानं कुर्यात् मी ब्रह्म आहे म्हणून अनुसंधान करावें हे जसें सांगितले आहे त्याप्रमाणेच मित्यात्मानं युजीता।‘ ‘ॐ मित्येवं ध्यायथ आत्मानम् असेंहि सांगितले आहे. यावरून याचा अर्थअहं ब्रह्मास्मिअसा होतो हे स्पष्ट होईल. सकारं हकारं लोपयित्वा प्रयोजयेत। सन्धि वै पूर्वरूपाख्यं ततोऽसौ प्रणवो भवेत् ‘ __सोऽहं शब्दातील तत्पदवाच्य आणि त्वंपदवाच्यआणिही व्यंजने काढून टाकली म्हणजे ईशाजीवोपाधी घालवून शिल्लक राहिलेलें ब्रह्म याने लक्षित होते. हेच परं चापरं ब्रह्म यदोंकारः।‘ ‘ओमिति ब्रह्म।ओमितीद सर्वम् इत्यादि श्रुतिवाक्यानींहि सिद्ध होईल. प्रणवाची उपासना म्हणजे ईशजीवोपाधिरहित असें जे कां शुद्ध, बुद्ध सच्चिदानंदस्वरूप ब्रह्म तेच मी आहे असें जाणणे. ‘अहं ब्रह्मास्मिवाचक प्रणवोच्चाराने परतत्त्वांत आपले ऐक्य करणे. _ प्रणवो धनुः शरोह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते।ओमिति ब्राह्मणः प्रवक्ष्यन्नाह ब्रह्मोपाप्नवानीति।‘ ‘ब्रह्मवोपाप्नोति।‘ ‘सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तपा सि सर्वाणि यद्वदन्ति।यदि च्छन्तो ब्रह्मचर्यचरन्ति तत्तेपद सङ्ग्रहेण ब्रवोम्योमित्येतत् इत्यादि वाक्यांनीअहं ब्रह्मवत्यैकगम्यं तुरीयम् (वि. नौ.) मी ब्रह्म या निश्चयात्मक वृत्तिरहित कोणाच्याहि अन्य साधनाने लाभणारे तुरोयपद काराने लाभत असल्यामुळे याना अहं ब्रह्मअसा अर्थ होतो हे स्पष्ट आहे. या सर्वच आधारांनी ब्रह्मच या पूर्वी होते, त्या ब्रह्मवस्तूनेच स्वतःलामी ब्रह्मम्हणून जाणले हैं ही जाणीव उत्पन्न झाल्यानंतर या योगाने पुढे सर्व  काही झाले म्हणणे ब्रह्म यापूर्वी होते त्यांत कार उत्पन्न माला पुढे या योगाने सर्व काही झाले म्हणणे दोन्हीहि एकच. पहिल्या प्रथम अव्यक्त नादोऽभवत् म्हणून मंत्रशास्त्र सांगतें. ब्रह्मस्वरूपांत प्रथम कार्य हे स्मृतिरूपच असणार. त्यामुळे हा अव्यक्त नादअहं ब्रह्मास्मिअथवा प्रणव स्वरूप हे स्पष्ट आहे. ब्रह्म प्रणव सन्धानं नादः ‘ ‘सर्वे तत्र लयं यान्ति ब्रह्मप्रणव नादके। अवाच्यं प्रणवस्याग्रं यस्तं वेद वेदवित् नाद हा प्रणवरूप असून तो ब्रह्मानुसंधानपर आहे. त्या ब्रह्मप्रणवनादांतच सर्व लय पावतात. या प्रणवाचे अग्र म्हणजे मूलस्थान असें तें जो जाणतो त्याला सर्व सार समजलें, इत्यादि वाक्ये आतापर्यंतचे विवरणच पटवून देतात

स्वरेण सन्धयेद्योगमस्वरं भावयेत्परम्। अस्वरेण हि भावेन भावो नाभाव इष्यते सशब्दश्चाक्षरे क्षीणे निःशब्दम  परमं पदम् इत्यादि वाक्यांनी नादरूप शब्दाचे, अहं ब्रम्ह स्फुर्ती चे अथवा प्रणवाचे अधिष्ठान म्हणून  ब्रह्मच शेवटी उरतें असे सिद्ध होते. या सर्व विवरणावरून अहं ब्रह्मास्मि,’ माया,प्रकृति, प्रणव व नाद हे सर्व एकाच अर्थाचे शब्द आहेत हे सिद्ध होईल. 

अकराव्या आर्येपासून समुद्राच्या दृष्टांताला आरंभ होऊन यात अमृतसुखनिधि असा हा मीचि चिद्रसैकरूपी या‘ ‘मजमाजी। उसळे आणि निमत असे सांगून बाराव्या आर्येत आनंदमहोदधी असा हा मी, आपल्या चिन्मयस्वरूपाने पूर्ण असा, माझ्या ।। आनंदरूपतेला व ज्ञानस्वरूपतेला अनुसरून माझ्यांत मीच रमणे हा आनंदाचा स्वभाव आहे. मात्र माझ्यात इतर काही नाहीं मग हा सर्व जगाचा भास होतो कसा ? या जगातून मी वेगळ्या पदार्थांच्या सुखापासून रमण्याची वहिवाट दिसून येते 

इला प्रारंभ कोठून झाला ? याला आद्य कारण कोणचें ? हे स्वरूपांत झाले कसे? या प्रश्नांना उत्तरे देण्याकरतां म्हणून, जगदुत्पत्ति सांगण्याचा स्फूर्तीचा परिपाठ येथेहि पण दिसून आला आहे. प्रथम कार्य कसे झाले? हे समुद्रात सहज दिसून येणाऱ्या घोषाच्या दृष्टांतानें पटवून देण्याचे योजिले आहे. समुद्राचा घोष, समुद्राची जाणीवच पटवून देणारा असल्यामुळे, येथेहि या स्वरूप भूत अशा चिन्महोदधींत जो घोष होतो तो याचीच जाणीव आणून देणारा स्मृतिरूपच, हे स्पष्ट आहे. ती स्मृति अहं ब्रह्मास्मिअशोच होणार. घोषाचा संबंध समुद्राला नसल्यामुळे त्यांतून भासणारा सर्व भास समुद्रामुळेच जरी असला तरी प्रत्यक्ष समुद्रांत तो कोठे मिसळून आलेला दिसत नसल्यामुळे, त्याच्या स्वरूपांत याला खोटेंच म्हणून मानावे लागते. याच दृष्टीने याला मायाहे अन्वर्थक नांव आहे. माया हेचि निजबोध । शब्दरूपे।। (आत्मा. २।१५) 

तेराव्या आर्येपासून सृष्टीच्या उभारणीला सुरवात झाली आहे. ईशजीवांचे स्वरूप व त्यांची उत्पत्ति या तेराव्या आर्येतून दिसून येते. श्रुतींच्या व श्रीसमर्थांच्या वाङमयाच्या आधाराने याचा थोडासा विचार करूं ! मधूनच ओघाने आठवलेली श्रीआचार्यादि पूज्य विभूतींचीहि वाक्ये देऊ. संदर्भानुसार येणाऱ्या साऱ्या श्रुतींचा व इतर संस्कृत अवतरणांचा अर्थ देऊ लागलो तर बरेच वाटेल, तेव्हा सोप्या वाक्यांचा अर्थ न देतां अवघड वाक्यांचाच मात्र अर्थ देऊ. विषयाच्या ओघावरून त्याची कल्पना सर्वांना येईल. 

या सर्वांच्या पूर्वी ब्रह्मच होते. मी ब्रह्मअशा या आपल्या भानाने त्यानेच स्वत:ला जाणले व या जाणिवेमुळेच पुढे तें सर्व काही झाले, या अर्थाची ब्रह्म वा इदमग्र आसीतदात्मानमेवा वेदहं ब्रह्मास्मीति तस्मात् तत्सर्वमभवत् । (बृ. १।४।१०) 

ही श्रुति मागेच आली आहे. या वाक्यांत दिसून येणाऱ्या मायात्मक अहं ब्रह्मास्मिया स्मृतिरूप स्फूर्तीलाच जाणीवअसें नांव देऊन या जाणिवेलाच ईश्वरअसे म्हणतात, असे या तेराव्या आर्येच्या प्रथम चरणांतून सांगितले गेले आहे. या चरणांत थोड्याशा विचारांती माया, जाणीव व ईश्वर म्हणजे मूळ पुरुष व हे एका अहं ब्रह्मया स्फूर्तीलाच म्हटले आहे असे आढळून येईल. मूळ माया तोचि पुरुष तोचि सर्वांचा ईश‘ (दास ८।३।२०) परब्रह्म असतां निश्चळ । तेथें संकल्प उठला चंचळ । तयासीच बोलिजे केवळ । आदिनारायण ॥ (दास. १३।३।३) मुळी संकल्प उठला । हरी संकल्प म्हणिजे त्याला। तोचि हरि समजला । पाहिजे मुळीं ॥‘ ( स. स. १।४।१३) मूळ माया जाणिवेची । मूळीच्या मूळ संकल्पाची। ओळखी पडगणेश्वरीची । येणेंचि न्याये॥ (दा. १५।७।२) इत्यादि

home-last-sec-img