Literature

विषय विवेचन ९

स एव सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् ।’ (कैव. ९) ‘ सहस्रशोषी पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् । (पुरु. सु. १, श्वेता. ३-१४)

‘पुरुष एवेद ‘ सर्व यद्भूतं यच्च भव्यम् ।

(पु. सु. २, श्वेता. ३-१५) • विश्वं भूतं भुवनं चित्र बहुधा जातं जायमानं च यत् सर्वो ह्येष रुद्र: । (रु.)

एकौहि रुद्रो न द्वितीयाय तस्थुः । ‘ (श्वेता ३-२) ‘विश्वतश्चक्षुरुत विश्वतोमुखः । ‘ (श्वेता ३-३)

सर्वानन शिरोग्रीवः । (श्वेता ३-११)

सहस्त्रशौर्ष देवं विश्वाक्षं विश्वशंभुवम् । विश्वं नारायणं देवम् ॥ (महो. १०)

विश्वमेवेदं पुरुषः ।’ (महो. ११)

या सर्व श्रुतींच्या आधाराने मागे झालेले, आता असलेले व पुढे होणारे हैं सारें विश्व रुद्र नारायणादि नांवानी युक्त अस णारे पुरुष स्वरूपच हे स्पष्ट होतें.

पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः । नानाविधानि दिव्यानि नानावणीकृतीनि च ॥ (भ.गी. ११|५)

‘इहैकस्यं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् । मम देहे गुडाकेश यच्चान्यद्रष्टुमिच्छसि ।’ (भ.गी. ११|७)

‘अनेकवक्त्रनयन मनेकाद्भुतदर्शनम् ।

अनेक दिव्याभरणं दिव्योनेकोद्यतायुधम् ॥’ (भ.गी. ११|१०) 

‘नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे | सहस्रनाम्ने पुरुषाय ।’ वगैरे स्मृतिवाकयावरूनहि ‘विश्वतो मुख’ हा पुरुष सर्वरूपानी नटला आहे, त्याचीच ही सर्व दिसणारी शिरकरचरणादि गात्रे हैं कळून येते. ‘ एक सन् बहुधा विचार: । एक सद्विप्रा बहुधा वदन्ति ।’ या वाक्याने या अनेकत्वांतून एकच ते पुरुषस्वरूप पहावें, त्यालाच हीं अनेक नांवें आलेली आहेत तो एकच असून त्या ठिकाणी अनेकत्वाची नुसती भावना केली जाते. अनेकत्वाच्या निराकरणाने तो एकच असे उद्घोषित होते. तोच अनेक रूपानी झाला, यांत एकावर अनेकत्वाचा आरोप भ्रमसिद्ध आहे.

‘सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते । अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् (भ.गी. १८।२० )

या सात्विक ज्ञानाच्या लक्षणाने देखील वेगवेगळया भासणाऱ्या तून सामान्य एकच पुरुषस्वरूप पाहणे युक्त असे भगवंताचे सांगणे आहे.

  • नैव स्त्री न पूमानेष न चैवायं नपुंसकः ।’ ज्याच्या योगाने हे स्त्री-पु-नपुसकादि देह प्रकाशिले जातात ते देहस्थ चैतन्य या देहापैकी कोणाचेहि न होता, स्फटिक जसा आपल्या उपाधीला आपण त्या रंगाचा न बनता आपल्यात भासवितो त्याप्रमाणेच देहस्थ चैतन्य त्या त्या उपाधीला प्रकाशवून ती ती उपाधी न होतां त्याहून वेगळेच असून ती ती उपाधी आपल्यात भासविते. ‘अशरीरं शरीररेषु ।’ ‘अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्या’ (भ. गीता. २-३८ )

या श्रुति-स्मृति वाक्याने सर्व देहस्थ चैतन्य सर्व देहाहून वेगळेच आहे. नित्य म्हणजे अविनाशी स्वरूपाच्या अमर्याद देहस्थ चैतन्याचे हें सारें उत्पत्ति, ना शयुक्त देह आहेत, ‘न जीवो म्रियत इति हें देहस्थ चैतन्य म्हणजे हा जीव नाश पावत नाही, तर याने रहित असे याचे शरीर नाश पावते, विनाशी हें अविनाशी होणार नाही. तेव्हा या साच्या उत्पत्तिनाशयुक्त असणा-या नामरूपाहून ते आत्मस्वरुप भिन्नच आहे. त्यावर या नामरूपाची भावना यामुळेच दिसून येणारी भिन्न कल्पना, विविधत्व वगैरे सारे हे भ्रमात्मकच आहे. कुठे चुकते हैं पाहुन चूक सुधारण्याकरितांच हा प्रयत्न ! ‘इंद्रियेभ्यः परा ह्यार्था अर्थेभ्यश्च परंमनः । मनसस्तु परा बुध्दि बुध्देरात्मा महात्परः || कंठ. १/३/१०) पुरुषान्न परं चिकित्सा काष्ठा सा परा गतिः (कठ १३/११)

एकापेक्षा एक कार्यकारण भावांनी श्रेष्ठ असून कारणांत  कार्य आपल्या उत्पत्तिकमानें लीन होते. ज्यात जे लीन होते ते त्याहून अल्प असते. अशी ही अल्प कार्य आपल्या कारणामुळेचं अस्तित्वांत असतात. कार्यातल्या प्रयोजन दृष्टीपेक्षा ज्यामुळे हे कार्य प्रयोजन वाटते त्या कारणासच प्रयोजनदृष्टी ठेवणे रास्त होईल तेव्हां सुखाची दृष्टी ठेऊन सर्वकारण असणारी सर्वाद्य वस्तुच सुखाकरिता निवडणे म्हणजे निरतिशय सुखप्राप्तीकरिता असणाऱ्या मार्गाचे अवलंबन करणे होय. या श्रुतीत पुरुषस्वरूप पराकाष्ठेची उन्नत गति म्हणून सांगितले आहे. मार्ग उपाय, अवस्था, स्थिति यापेको कोणाच्याहि अर्थाने या ठिकाणी ‘गति याचा अर्थ केला तरी युक्तच ठरेल. झालेले हे सर्व अल्प ठरलें की, या पूर्वीचे झालेल्यांत न मोडणारेच पूर्ण ठरणार ! पूर्णत्वात पुरुषः।’ हेंच पुरुषस्वरूप झालेल्यांत न मोडणारे म्हणजेच झालेल्या या सर्वाच्या पूर्वीचे हें स्पष्ट आहे. पुढे झालेला पूर्वीच असलेल्याला कारण असू शकत नसल्यामुळे सान्या पूर्वीचेच याला कारण अस णार. जे कारण असते ते आपल्या सत्तेनेच सर्व या कार्याच्या स्थितीस कारण होते. कार्य हें कारणाच्या सत्तेनेंच जगतें. असें झाले की कार्यातून त्याच्या जीवनार्थ कारणाच्या सत्तेची व्याप्ति मानावी लागते. अशी पूर्ण वस्तूच अल्प असणाऱ्या सर्व कार्याला व्यापून असते. कार्याकडून या स्व-कारणाचा शेवट पाहणे शक्य नसल्यामुळे कारण अनंत ठरणार. बहुतामध्ये थोडियासी । क्षयो बोलिला ।’ (दास) पूर्ण वस्तूतच अपूर्ण वस्तु विरणार जे ज्यांचे ‘आदि’ असतें तेंच त्याचे प्रस्थान हि असते, ‘आद्यवत च यद्भाति वर्तमाने च तत्त्वता ।’ आदि अंती असणारी वस्तु मध्येहि असते या न्यायाने या सर्व झालेल्यातून ती पूर्ण वस्तुच व्यापून आहे असें कां एकदां ठरले की या सर्व कार्यात सुखाकरितां हीच वस्तु निवडणे योग्य होईल. पूर्णवस्तूत अपूर्णरूप भ्रामकच असतें हे भ्रमकार्य सत्याच्याच अधिष्ठानावर भासतें असें झालें की या भ्रमकार्यातून जॅ सुख भासतें – भ्रमाला स्वतंत्र सत्ता नसल्यामुळे त्या सत्यस्वरूप अधिष्ठानाचेच हे स्पष्ट होते हे अधिष्ठानात्मक सुख भ्रमकार्यातून न अनुभवितां हैं सारें भ्रमकार्य त्यांतून वगळून तेंच सुख म्हणून सुखाकरितां निवडणें शहाणपणाचे यांत संशय नाही हीच दृष्टी ठेऊन झालेल्या कार्याची कार्यकारण परंपरा लावून, एकापेक्षा एक श्रेष्ठ असे दाखवून, शेवटी उरणारे या सर्व कार्यकारणाचे आद्य कारणच पूर्ण, या सर्वांचा समावेश आपल्यांत करून उरणारे या स्वसत्तेने व्यापून असणारे, तेव्हां सुखाकरितां तेच निवडावे असे दर्शवित असतां झालेल्यांत मोडणाऱ्या कार्य कारण परंपरेची मालिका वर दिलेल्या श्रुतिवाक्यांतून दाखविली गेली आहे त्याचा थोडासा विचार करू. जगांत सर्व व्यवहार हा इंद्रियानीच होतो. कर्म ज्यामुळे घडतें ती ह्रीं इंद्रियच. हींच सर्व कर्माची साधने आहेत. यांच्यामुळेच सारे विषयसुख अनुभविले जातें. बाह्य पदार्थापासून अनुभविल्या जाणाऱ्या साऱ्या विषयसुखाला ही इंद्रियेच मुख्य म्हणून ठरली तरी या इंद्रियापूर्वी यांच्या उत्पत्तीला जे कारण झाले ते यांच्या पूर्वीचेच असणार. पंच विषयांच्या ग्रहणाला या पंच ज्ञानेंद्रियांची उत्पत्ति असल्यामुळे संकल्परूपाने सूक्ष्म पंचविषय या पूर्वी उत्पन्न झालें तेच या इंद्रियाच्या उत्पत्तीला कारण होणार! तेच सूक्ष्म पंचविषय स्थूलरूपानी इंद्रियाकडून अनुभविले जावयास देहाला असणारी इंद्रिय गोलके तयार होऊन पंचविषयात्मक हे दृश्य तयार झाले. ‘संकल्प’ आणि वासना’ हा मनाचा धर्म असल्यामुळे य संकल्परूपाने भासणाऱ्या सूक्ष्म पंच विषयांच्या भासाला मनच या पूर्वीचे म्हणून हेच या सूक्ष्म पंचविषयाला कारणीभूत होते’ माझी वासना’ अथवा ‘ माझे मन’ म्हणण्यात ‘मी’ हे भान यापूर्वी असते. कारणरहित कार्याप्रमाणे ‘मी’ हे भान जर नसेल तर वासनेचे भानहि होणार नाही आणि मनहि पण भासणार नाही. इंद्रियांचा गोलकाद्वारे बाह्यपदार्थाशी विशिष्ट क्रियेच्या योगानें संभोग होऊन त्या त्या पदार्थांपासून त्या त्या इंद्रियांना जो शब्दस्पर्शादि भेदाने सुखानुभव होतो त्या सुखानुभवाला, याला कारण असणाऱ्या या इंद्रियांना या इंद्रियांच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या वासनेला, त्या वासनेत उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म पंच विषयाला, याच्या पूर्वीच्या त्या वासनारूप मनाला जर काही या सर्वा पूर्वीचे असून या सर्वाला कारण झाले असेल तर ते ‘मी’ हे भानच होय. प्रत्येकाच्या अस्तित्वाचे चिन्ह हेच आहे. स्त्री-पु-नपुंसकादि सर्व देहांतून ‘ मी ‘ हे भान सामान्य रूपाने एकच आहे. हे सर्व ‘मी ‘ म्हणूनच म्हणतात, ‘मी’ हे जर सर्वांकडे एकच झाले तर हे विविधत्व ‘ मी या सामान्य भानात नसून यांत भासून येणाऱ्या विविधत्वतेला या विविध देहोपाधीच कारण आहेत. या सर्व देहोपाधी इंद्रिय सुखाच्या वासनेनें उत्पन्न झालेल्या दृश्यांतच मोडतात.’ मी’ या भानालाच हे सर्व गोचर होते या सर्वा पूर्वीचे या सर्वांना कारण असणारे ‘मी’ हे भानच आहे. गोचर होणारें कार्य नष्ट पावले तरी कारणाला धक्का पोहचत नाही. या दृष्टीने सर्व दृश्योपाधी ओसरून गेल्यानंतर यांतून सामान्यपणे व्यापून असणारे ‘ मी ‘ हें एकच शिल्लक राहील, या ठिकाणी दृश्य नसल्यामुळे विविधत्व दिसून येणार नाहीं व भेदहि भासणार नाही. या ठिकाणी सर्वभेदशून्य असें एकच एक ‘मी’ उरेल. हेंच सर्व देहोपाधीतून भासणाऱ्या ‘मी’ या भानाचे सामान्य रूप. विविध देहोपाधीजी बहुविध असल्याप्रमाणे भासणाऱ्या सामान्य ‘मी’ या भानाकडे पाहिले म्हणजे याला ‘ बहुस्या प्रजायेय ।’ बहुविध

व्हावे हा सकल्प झाल्याशिवाय हे असे विविधत्व भासून आले नाहीं हे कळून येते. हेच सत्यादधि महानात्मा । बुद्धेरात्मा महान् परः । ‘ या श्रुतीच्या अशा सांगण्यावरून स्पष्ट होते हैं सर्वाद्य ‘ मी ‘च या प्रत्येक देहांतून दिसून येणाऱ्या ‘ मी ‘ मी या भानाचे लयोत्पत्तिस्थान असून या सर्वांचा अंतर्भाव ते आपल्यात करीत असल्यामुळे व हेच सर्वातून व्यापून असल्यामुळे ठिणग्यांचा आश्रयभूत अग्नि जसा सर्व ठिणग्यांतून व्यापून असून या सर्वां पेक्षां पूर्वीचा म्हणून कारणरूपाने याहून श्रेष्ठ आणि मोठा ठरतो, त्याप्रमाणेच सर्वाद्य ‘मी’ हे भान या सर्व देहाकारांनी भासणाऱ्या ‘मी’ हुन श्रेष्ठ आणि महान ठरते. देहोपाधीने भासणारें मीपणाचे सारें विविधत्व यांतच वसत असलेले बघून डाळींबाची उपमेकरितां आठवण होते. अनेक विया जशा एका डाळींबातून साठविलेल्या असतात. डाळिंब या एका नांवांत जसा सर्व बियांचा अंतर्भाव होतो त्याप्रमाणेच ‘बहु व्हावे’ या संकल्पाच्या पूर्वीच्या सर्वाद्य ‘मी’ या भानांत संकल्पित असे विविध देहोपाधीने भासणारें अनेकत्व यातून साठविले गेले असून ‘हिरण्यगर्भ’ या एका नांवांत या सर्व ‘मी’ ‘मी’ या भावनांचा अंतर्भाव होतो. ‘सर्वाहंमानी हिरण्यगर्भः’ (नृ.) याला ही स्मृति प्रमाण आहे. संबंध वृक्ष विस्ताराला कोंब हा जसा प्रथम, त्याप्रमाणे ‘बहु व्हावे’ या संकल्परूपाने हा हिरण्यगर्भ जगांत भासणाच्या ‘मी’ ‘मी’ या विविध भानाचे प्रथम स्वरूप होय. हाच जगाचा स्वामी.

‘हिरण्यगर्म समवर्तंतांग्र भूतस्य जातः पतिरेक आसीत् ‘ (ऋ) महदक्ष: प्रथमजम् (बृ.) यालाच महानाम्ना’ ‘ असे दुसरे नांव असून समष्ट्यात्मक अहंभावाची जी यांची उपाधी तीस ‘ महत् ‘ हें नांव आहे. याचीच व्याप्ति ‘मी’ या सामान्य अनुभवाने मण्यांतून असणाऱ्या सर्व देहातून दिसून येत अ ‘सूत्रात्मा’ असेहि याला नांव देतात. ‘कारणगुणा हि कार्यगुणानारभन्ते ।’ कार्यातून दिसून येणाऱ्या गुणधर्माचे मूळ त्यांच्या कारणांतून असणाऱ्या गुणधर्मातिच असते कारण हे केव्हांहि कार्यानुमेयच तेव्हां कार्यावरूनच त्याच्या कार णाचा परिचय करून घ्यावा लागतो. ‘यथा बीजस्तथाङ्कुरः । हा बीजांकूर न्यायसुद्धा हाच भाव दाखविणारा आहे. सर्व देहात असणारी ‘मी’ ही भावना सर्वाद्य हिरण्यगर्भाचीच असे ठरलें की मुळांतल्या परिचयाला या ‘मी’च्या निरीक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. जगांत दिसून येणान्या मीपणांतूनच स्त्री आणि पुरुष असे भेद दिसून येतात. यावरून मुळांत जे समष्ट्यात्मक ‘मी, म्हणजे हिरण्यगर्भाचे स्वरूप त्यातच हा भेद दिसून आला असला पाहिजे. कोंबाला दोन पाने जशो फुटतात त्याप्रमाणे जगदरूपी वृक्षाचे आदि असणाऱ्या अंकुशरूपी हिरण्यगर्भ स्वरूपाच्या ठिकाणी एका युग्माची उत्पत्ति झाली. तें युग्म म्हणजेच प्रकृति-पुरुष हेच या जगाचे जननी जनक, यांचाच हा सारा हा विस्तार हेच या साऱ्या जगांतून व्यापून आहेत. जगांतून व्यापून असणाऱ्या यांच्या स्वरूपाला दुसरे नांव कायम असून पहिल्या नांवांत त्याच अर्थाचा दुसरा शब्द योजिला जातो, तो म्हणजे स्त्री सारांश प्रकृति-पुरूष म्हणजेच स्त्री पुरुष, नर-मादी वगैरे जितके म्हणून पू-स्त्री वाचक शब्द ते सारे याचेच पर्याय आहेत हे ओघानें सहज कळून येईल. या स्त्री पुरुषात्मक दिसून येणाऱ्या ‘मी’ चे थोडेसे परि शीलन करूं. यावरून मुळाची ओळख पटते की काय तें पाहूं. मूळ प्रकृति पुरुषांतून व या स्त्री-पुरुषांतून कोठें भेद दिसतो व त्याचे कारण काय ? मूळात याची उत्पत्ति कशी झाली ? याच्या पूर्वीचे नावाचे स्वरूप कोणचे ? त्याला तरी काय कारण झाले ? सर्वांचे मूळ कोणचें ? कोणचे आम्हाला निरतिशय सुखाच्या प्राप्तीकरतां निवडावयास पाहिजे ? त्याची प्राप्ती व्हावयाची ती भिन्नपणे का अभिन्नपणे ? इत्यादि सर्व विषयाचे विवरण थोडेसे ठोकळ मानाने करू !

पुरुष हा प्रथम एकटाच असतो. पुढे तो वयांत येतो म्हणजे प्रजोत्पादनास योग्य होतो. पुरुषाच्या रेतापासूनच त्याची सर्व प्रजा होत असल्यामुळे देहाचे मूळ जे रेत त्या आपल्या स्वरूपाने ‘देहच मी’ म्हणून मानणारा हा जीव प्रजोत्पादनाच्याद्वारे ‘ आपण बहु व्हावे ‘ अशी इच्छा करतो व ही आपल्या बहुत्वाची इच्छा पूर्ण व्हावयास अनुकूल असणारी कोणी एक शक्ति तो अपेक्षु लागतो. तीच स्त्री. एथें बहुत्वाचा संकल्प हाच ‘काम, ती इच्छा कृतींत उतरणे म्हणजे संभोग’ हा असतांच दुसरा जन्म म्हणजे याची ‘ संतती’ आत्मा वै पुत्र नामासि ।

शक्ति ही शक्तिमंतापासून अभिन्न असते या दृष्टीने स्त्री शक्ति पुरुषास अभिन्न असावयास पाहिजे. ‘ दक्षिणवायडू नभागी स्त्री पुरुषसंज्ञितौ ।’ स्त्री ही पुरुषदेहाचा वामभाग म्हणून पत्नीस वामा किंवा वामांगी म्हणतात. आपले वामांग आणि दक्षिणांग या भागानी एक पुरुषच दोन रूपानी नटतो असे उघड होते. वाम भागाने अभिन्न असणारी शक्ति तो पुढे प्रजोत्पादनार्थ भिन्नपणे कल्पितो व तीच स्त्रीरूपानें प्रगटते. एकत्वात प्रजोत्पादन संभवत नसल्यामुळे प्रजोत्पादनार्थ अवश्य असणारी ‘ वामांगवर्तिनी आपली शक्ति तो भिन्न कल्पितो. हा स्वतः म्हणजेच प्रजा. तेव्हां प्रजोत्पादनार्थ अथवा आपल्या बहुभवनार्थ भिन्न पडलेल्या शक्तीशी याला एक व्हावे लागते. दोघांचे ऐक्य म्हणजेच गर्भधारण रजो रेताचा संयोग म्हणजेच प्रजा. रेतोधिक्याने पुरुष व रजोधित्यान स्त्री. रेतरजारुपी देहांचा संयोग म्हणजे ऐक्य आणि या ऐक्याचेद्योतकच या स्त्री पुरुषांची स्त्रीपुरुषात्मक संतती. स्त्रीपुरुषांत व यांच्या स्त्रीपुरुषात्मक संततीत ‘मी’ हें येथून तेथून एकच. या वरून एक ‘मी’च आपल्याला देहरूपाने मानून आई-बाप म्हणजे स्त्री-पुरूष होऊन मुलामुलींच्या संततीने आपणच बहुविध झालेले असते, असे म्हणण्यास हरकत नाही. आपल्या एकत्याच्या पूर्व स्मृतीने स्त्रीपुरुषांचा संयोग होतो. या संयोगाचो स्मृति परस्परांना परस्परांच्या भिन्नपणांतहि असावी म्हणून प्रजा, भिन्नपणाने भास णाऱ्या परस्पर देहांचें अखंड ऐक्य संभवत नसल्यामुळे त्या संयो गजन्य ऐक्य सुखाचे भान हीं स्त्री पुरुष संतती द्वारा आणून घेतात, मूल अंगावर खेळ लागले म्हणजे ते यांना संयोगसुखाची आठवण करून देते. एकूण ‘मी ‘ हे पूर्वीचे होते, त्याला आपण बहू व्हावे अशा इच्छेनें अनेक व्हावयास कारण अशी ही स्त्रीपुरुषात्मक शरीरे प्राप्त झाली. कृतसंकल्पोदय म्हणजेच काम तो संकल्प तडीस नेण्याचा म्हणजेच संभोगाची क्रिया. शक्ति आणि शक्तिमंताचे ऐक्य आणि एकत्व दाखविणारेच कार्य. तेव्हा स्वैक्यरूप प्रजा निर्मावयास झालेलें परस्परांचे परस्परांशी निजैक्य म्हणजेच संयोग व त्याचे फलित कार्य म्हणजेच तद्रूपी त्यांची संतती.जगांत दिसून येणाऱ्या ‘मी’चे परिशीलन आपण केले. आता पुढे यावरून मुलाची ओळख कशी काय पटते तें पाहूं ! कार्य हे शक्तियोगानेच होतें व कार्यामुळेच मुळांतल्या शक्तीचाबोध होतो. या शक्तीलाच ‘प्रकृति’ असे नांव आहे. ‘बहुस्यां प्रजायेय’ या संकल्पाच्या पूर्तीसाठींच प्रकृती मूर्तस्वरूपाचीं होते बहुत्व म्हणजेच प्रजा. शक्तीशिवाय म्हणजे या प्रकृतीशिवाय बहुभवन कसें होणार ? शक्तीची व्यक्तता म्हणजे भिन्नता आणि समरसता म्हणजे एकत्व आपल्याशी अभिन्न असणारी शक्ति कार्यपरत्वें भिन्न कल्पून ती द्वारे हा आदिपुरुष आपल्या बहुभवनाचा संकल्प तडीस नेतो असे हे स्पष्ट होते. विश्वोत्पत्तीच्या पूर्वी आदिपुरुष एकच होता. त्याने आपणाशीच मी कोण म्हणून विचार केला. त्यावेळेस आपल्याहून दुसरे असे काहीच त्याला आढळून आले नाही. तो अद्वितीय असणारी वस्तूच मी आहे. सोऽहमस्मि असे त्याने तेव्हा म्हटले. त्यावेळेपासून तो म्हणजेमीया नांवाचा झाला. हेच प्राणिमात्रांचे मूळरूप. कोण ? ‘ म्हणून विचारले असता प्रत्येकजणमीअसे प्रथम म्हणतो नंतर दुसरे ठेवलेले नाव सांगतो, हे त्याला प्रमाण वगैरे मागेच आत्मा वा इदमग्र आसीत् या बृहदारण्यकाच्या वाक्याधाराने दाखविलें आहे. आतां मुळांतून ही उतरंड पुढे स्त्री पुरुषांच्या स्वरूपानें या जीवापर्यंत कशी आली हे आपण पहावयास निघालो आहोत.

home-last-sec-img