Literature

वेदापासून सृष्टि

सर्वेषां स तु नामानि कर्माणि च पृथक् पृथक् । 

वेदशब्देभ्य एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे ॥ (मनु० १|२१)

वेदाच्या आधारें ब्रह्मदेवानें सर्व लोकांची व्यवस्था केली. पूर्वीचें कर्म फल व संस्कार बघून त्यांना त्यांना तें तें कर्म विभागले. त्या त्या सृष्ट पदार्थांना तें तें नांव दिले. त्या त्या जीवांना त्या त्या कर्माप्रमाणे त्या त्या योनीत जन्माला घातलें. देव, दानव, मानब, पशु, पक्षी आदि चेतन सृष्टि, पूर्वकल्पा “च्या कर्माप्रमाणे निर्माण केली. सकल प्राणिपदार्यांना निर्माण करून त्यांना वेदाधारानें नांवे ठेवली; व त्यांत त्या त्या गुणधर्मांची कल्पना केली. देवांतून इंद्र, बृहस्पति आदि नांव ठेवले. त्यांना त्यांना ती ती कर्मे दिली. मनुष्यति ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशीं नांव ठेवलीं; व त्या त्याप्रमाणे त्यांना त्यांना कर्माचा विभाग करून दिला.

चातुर्वर्ण्य त्रयो लोकाश्चत्वारश्चाश्रमाः प्रथक् । भूतं भव्यं भविष्यं च सर्व वेदात्प्रासिध्यति ।। (म.स्मृ. १२-९७)

ब्राह्मणक्षत्रियादि पृथक चार वर्ण, ब्रह्मचर्यादि प्रथक चार आश्रम, स्वर्ग, मृत्यु, पाताल, वर्तमान, भूत, भविष्य, सर्वहि वेदामुळे निर्माण झाले. अशा या अर्याचा दुसरा एक श्लोक मनुस्मृतींतच आला आहे. शब्द इति चेन्नातः प्रभवात् प्रत्यक्षानुमानाभ्यां ॥ या ब्रह्मसूत्रांत वेदापासूनच सृष्टिं झाली, असें व्यास महर्षीनींहि सांगितले आहे. इथे ‘ वेद वदोन मार्गी लाविले’ या समय च्या ओवीचें वाचकांना स्मरण झाल्याशिवाय राहाणार नाही.

home-last-sec-img