Literature

वेद शब्दाचा अर्थ

‘वेद’ या शब्दांत विद् धातु आहे. विद् = जाणणे, त्या विषयाचे ज्ञान करून घेणें. या अर्थी विद् धातु प्रसिद्ध आहे. सृष्टीचा उत्पत्तिस्थितिय याविषयी व विविध ऐहिक आणि पारलौकिक साधनांविषयी असे तूं जाण, हृदयांत स्फुरविले व सहज स्फूर्तीने जे त्याच्या तोंडांतून बाहेर पडले, तेच हे वेद. हा एक निष्कर्ष या मंत्रांतून निघतो; व दुसरा म्हणजे मोक्षास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीतीनें एक परमात्माच कारणीभूत होतो. मोक्षाची इच्छा असणाऱ्या एका परमात्म्यासच शरण जावें. मोक्षाला परमात्म शरणागतीच एक प्रधान साधन आहे. इत्यादि निष्कर्ष सामान्यतः या मंत्रावरून निघतो. परमात्म्याकडून अंतःकरणांत स्कुरल्या गेलेल्या वेदांना प्रथम ब्रह्मदेवाने पाहिले, त्यामुळे तो.. प्रथम वेदद्रष्टा झाला. त्यानंतर परमात्म्याच्या अनुग्रहानें तपत्र्यांच्या शुद्धांत: करणांत या वेदमंत्रांचे स्फुरण झाले व ते या तपत्र्यांनी या परम पवित्र ऋषीनी पाहिले, त्यांना हा एक वेदसाक्षात्कारच झाला. अशा वेदांचा साक्षात्कार झालेल्या वेदकालीन ऋषींना, ‘मंत्रद्रष्टारः— मंत्र म्हणून म्हटले जाते. आत्मज्ञान होऊन परमात्म्याच्या कृपेनें तदैक्य संपादिलेल्या, वेदकालीन ऋषींना हे मंत्र स्फुरले. या दृष्टीने हे सर्व वेदमंत्र परमात्मप्रणीत आहेत, ती मानवकृती नव्हे हें स्पष्ट होते. या अर्थाने वेदांना व वेदमंत्रांना अपौरुषेय म्हणून संबोधिले जाते.

श्रुतिस्तु वेद आम्नायः । वेदाला ‘श्रुति’ असें दुसरें नांव आहे. वेदे श्रवसि च श्रुतिः । ( अमर) श्रुति म्हणजे परमात्म अनुग्रहाने अंतरंगांत स्फुरून, अनाहत ध्वनीप्रमाणे आंतूनच ऐकू आलेले अथवा गुरुमुखानें ऐकून कंठगत करीत आलेल्या परिपाठांतलें; एकंदरीत ऐकून अवगत होणारे असा वेद शब्दाचा अर्थ होतो. आजहि गुरुमुखांतून श्रवण करूनच वेदाध्ययन करण्याची जी पद्धत आहे, तीहि मुळाची आठवण करून देते. ऐकून कंठगत करण्याची ही पद्धत, ऐकून कंठगत झाल्याची पूर्वस्मृति जागृत ठेवण्याकरितांच आहे. मूळांत ऐकून आल्यामुळे त्यांचा अभ्यासक्रमहि तसाच असणें, ‘विधि त्वेन ‘हि पण क्रमप्राप्त आहे. गुरुमुखावांचून केलेले वेदाध्ययन ग्राह्यहि ठरत नाहीं; व तें वीर्यवत्तरहि होत नाही. अंतरंगांत स्फुरलेला वेद अंतःश्रवणा ऐकून, अंतचक्षूंनी पाहून मुखानें बाह्य प्रवाहित झाला. ब्रह्मदेवाची वाणांच अशा वेदोच्चारानें व्यक्त झाली. वाग्विवृत्ताश्च वेदाः । ( मुंडक उपनिषद २ खं. १।४ ) वाग्विवृत्ता उद्घाटिताः प्रसिद्धा वेदा यस्य । वेदोचारानेंच ब्रह्म देवाची वाणी प्रगट झाली. अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा

—हें परमात्मदत्त ज्ञान, हा वेद, ही ब्रह्मदेवाची वाणी, अनादि परमात्म्या ब्रह्मदेवाला स्फुरलेली असल्यामुळे, परमात्म्याचीहि ती वाणीच होत असल्यामुळे परमात्म्याशी अभिन्न असणारी परमात्म्याप्रमाणेच तीहि पण अनादि आहे. असे वेदासंबंधी असणाऱ्या ‘अनादि’ या शब्दाने स्पष्ट होते. आपल्या अंतःकरणांत स्फुरलेले वेदमंत्र प्रथम ब्रह्मदेवानें ऐकले व अध्यापनाच्या द्वारे ऋषिमुनी इत्यादि. कांतून ते स्वमुखानें प्रसृत केले. त्यानंतर ऋषींनी जे ऐकले, ते त्यांनीहि आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलें. अशा रीतीनें ऐकून पाठ करीत आलेला हा संप्रदाय, वेदाला असणाऱ्या ‘श्रुति ‘ या नांवानें स्पष्ट होतो. पवित्र पावन अंतःकरणाच्या अनन्य भक्तीच्या वेदकालीन कांहीं ऋषिमुनींना देखील, परमात्मकृपेनें ज थोडें फार वेदमंत्रांचे स्फुरण झाले, तेंहि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले. असा हा गुरुमुखाचा संप्रदाय प्रचारांत आला. परमात्मसत्तेनें ब्रह्मदेवाच्या आणि ऋषिमुनींच्या अंतःकरणांत स्फुरलेले वेद कोणाचीहि वैयक्तिक कृती नसल्यामुळे, यांना अपौरुषेय म्हटले जातें; वेद परमात्मप्रणीत आहेत असे म्हटले जाते. परमात्मकृपेनें आपोआप स्फुरलेल्यांना अपौरुषेय, परमात्मसृष्ट, दैवी, ईश्वरदत्त म्हणून म्हणण्याशिवाय गत्यंतर नाहीं.

home-last-sec-img