Literature

वैदिक प्रार्थना

ॐ इषेत्वोर्जेत्वा वायवस्थोपायवस्थ देवो वः सविता प्रार्पयतु श्रेष्ठ तमाय कर्मण आप्यायध्वमध्निया देवभागमूर्जस्वतीः पयस्वतीः प्रजावती रनमी वा अयक्षमा मावस्तेन ईशतमाघश, सो रुद्रस्य : प वृणक्तु रुवा अस्मिन्गोपतौ स्यात बहीर्यजमानस्य पशून्पाहि || (य. जु. १-१-१)

—हे परमेश्वरा, तुझ्या ब्रह्मतत्त्वाकरितां आणि विवेकाकरितां मी तुझी प्रार्थना करतों. विपुल पर्जन्याकरितां आणि विपुल धान्याकरितां मी तुझ प्रार्थना करतो. सुप्रजा आणि अभ्युदय यांकरितां मी तुझी प्रार्थना करतो. स्वत्वाच्या अधिकाराकरितां आणि उत्कृष्ट सदाचाराकरितां मी तुझी प्रार्थना करतों. तूं सर्वगत आहेस. तुला सर्वांच्या हिताची चिंता आहे. सर्वांना उत्पन्न करणारा परमात्मा माझ्याकडून श्रेष्ठ कर्मेच करवून घेण्यास कारण होबो व सदैव आम्हांला असल्या श्रेष्ठ कर्माच्या ठिकाणच प्रेरणा करो. देवतांच्या प्रीत्यर्थ अनुष्टिल्या जाणाऱ्या कर्माकरितां ज्ञानसाधन असणारी इंद्रिये पाहिजेत, कृषि पाहिजे, दूध इत्यादिकांनी युक्त अशा जीवनोपयोगी गाई पाहिजेत. मनःशांतीला सदाचार आणि ज्ञानविचार पाहिजे. ही सर्वहि देवाच्या अंतर्बाह्य सेवेकरितां, अभ्युदय-निःश्रेयस याकरितां कारण होतात. ही साधनें केव्हांहि कोणत्याहि कारणांनी नष्ट होऊं नयेत. परमात्म्याच्या कृपेनें आमच्या गाई, स्त्रिया या सर्वहि आरोग्यशील असाव्यात. संततिसंवर्धनाकरितां यांच्या ठिकाणीं विपुल दूध असावें. यांच्यावर चोर, लुटारू व दुष्ट भ्रष्टांचा घाला पडूं नये. हे परमेश्वरा, तुझ्या स्वामित्वाखाली आमची प्रजा, गाई, स्त्रिया, आमची बुद्धि आदि सर्व सुरक्षित असावें. तुझ्या कृपेनें हें सर्वहि निश्चल व निर्दोष असें असावें. तूं यजमानांचीं इंद्रिये तशीं शरीरें धष्टपुष्ट कर. सर्व लोक, सर्व गाई, सर्व मुलें आणि इतर सर्व पशु यांचे रक्षण कर. त्यांची संख्या अधिक वाढव.

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये || (ई. श. १५; बृ. ५|१५|१)

हे ब्रह्मरूपी सूर्या, तुझें तें मंगलमय मुख मोहबश करणाऱ्या अशा कनककांतादि चित्ताकर्षक बाह्य वस्तूंनीं, या नामरूपात्मक अखिल विश्वानें, या सुवर्णपात्रानं, तुझ्या सत्यसच्चिदानंदस्वरूपाचे दर्शन होऊं देऊं नये । म्हणून, संपूर्ण झांकले गेले आहे. सत्यस्वरूपी तुझ्या सत्यस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा म्हणून उक्त सत्यधमोचे अनुष्ठान करणाऱ्या मला तुझ्यावरचें हें चित्तवेधक विश्वाचें आबरण काढून टाक. तुझ्या यथार्थ सच्चिदानंदरूपाचें दर्शन मला होऊं दे.

पूषन्नेकर्ष यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन्समूह | तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोहमस्मि ॥ (ईश. १६;बू. ५|१५|१)

आम्हां सर्वांचें रक्षण व पोषण करणाऱ्या, आम्हां सर्वांच्या स्वरूपानें अद्वितीय असणाऱ्या, आम्हां सर्वांचे नियमन करणाऱ्या, आम्हां सर्वांनाहि अंती आपल्यांत विलीन करून घेणाऱ्या व आपल्या अगाध आश्चर्यकारक मायेनें ही सकल संसारसृष्टि निर्माण करणाऱ्या, हे सर्वात्मरूपा, या सर्व प्रजेच्या स्वामित्वाचा अधिकार बाळगून असणाऱ्या हे परमेश्वरा, तुझें हें विचित्र विश्वाचें हें दृश्य दर्शविणाऱ्या संतापजनक बासनाकिरणांचे जाळे एका बाजूला सार; म्हणजे तुझें तें अनंत मंगलकारक, अत्यंत सुखमय चित्स्वरूप मी पाहीन, त्याचा साक्षात्कार मला होईल. तुझ्या त्या आनंदरूपांतच मी समरसून जाईन. जें या सूर्यबिंबांत आहे तें सच्चिदानंदस्वरूपच मी.

अग्ने नय सुपथा राये अस्मान्विश्वानि देव वयुनानि विद्वान् । युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्ति विधेम || (ईश.)

-हे अग्ने, आध्यात्मिक, आधिदैविक व आदिभौतिक अशा सर्वोत्कृष्ट वैभवाच्या अनुभवाकरितां आम्हांला सर्व प्रकारच्या सन्मार्गानेंच तूं घेऊन जा. सर्व प्रकारचे सन्मार्ग, कर्म, उपासना, ज्ञानादि साधनें हैं सर्वहि तूं जाणतोस. आमचा सर्वस्त्रीं नाश करणारी विषयवासनेची सर्व पातकें तूं नष्ट कर. या पापतापांची निवृत्ति झाल्यानंतरच सारस्वरूपभूत असे तुझें तें सच्चिदानंद ब्रह्मरूप प्राप्त करून घेण्यास आम्ही पात्र होऊ. तुझ्या अनंत स्वरूपाची यथार्थ उपासना चालविण्यास असमर्थ असणारे आम्ही ती काय करूं शकूं ! आम्ही सर्वतोपरि तुला शरण येऊन एक मोठा नमस्कार घालतो. केवळ या नमस्कारानेच आम्हीं तुला सर्व उपचार अर्पण करतों; तुझी सेवा पूर्ण करतो. या शरणागतीनेच तूं प्रसन्न हो. अनंतरूपी, अपार महिमाशाली, स्वतःपूर्ण, आनंदघनरूपी असणाऱ्या तुझी या एका नमनाखेरीज दुसरी कोणती सेवा करणे आम्हांस शक्य आहे ?

त्वमग्ने यज्ञानां होता । विश्वेषां हितः । देवेभिर्मानुषे जने ॥ (साम. १११।१।२)

 –हें अग्नि, तूं आमचे सर्व प्रकारचे यज्ञ पूर्ण करणारा आहेस त्याचप्रमाणें तूं इंद्रादि देवतांकडून पर्जन्य व धनधान्य इत्यादिकांची समृद्धि करून तूं आमचें व अखिल विश्वानेंच हित साधणारा आहेस. आत्मज्ञान देऊन तूं स्वतः सर्वांचाच उद्धार करणारा आहेस.

भद्रं कर्णेभिः श्रृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरंगै स्तुष्टु वा सस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः । स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥ ( यजु. आरण्य. १-१-१)

—हे देवदेवतांनो, आम्हीं तुम्हां सर्वांच्या कृपेनें आमच्या कानांनी सदाच पवित्र, शांतिप्रद आणि अचल सुख देणारे असे कर्णमधुर मंगल शब्द ऐकावेत. यज्ञ करणाऱ्यावर आपली कृपा करून त्यांना या संसारसमुद्रांतून तारणाऱ्या देवतांनो, आमच्या डोळ्यांनी आम्हीं नेहमीं मंगलकारक शुद्ध सात्त्विक दृश्यच पाहावें—तें दिव्य परमात्मरूपच न्याहाळावे. तुमच्या कृपेने आम्हीं अकुंठित इंद्रियशक्तीनें व संपूर्ण आरोग्यानें सुसंपन्न होऊन, त्या तसल्या दृढ कायेनें देवाचें हित साधावें, देवाच्या सेवेत आयुष्य घालवावे, तुमच्या स्तुतिस्तवनांत मन गोवावें. तुमच्या हिताच्या जीवनाची प्राप्ति आम्हांस व्हावी. इंद्र वृष्ट्यादिकांनीं आमचें क्षेम करो. सूर्य जीवनदानानें आमचे क्षेम करो. गरुड सर्व विषारी प्राण्यांपासून आमचे क्षेम करो. बृहस्पति आम्हांला संतति, संपत्ति (देवो) व आत्मज्ञानानें आमचे क्षेम करो.

सह नाववतु । सह नौभुनक्तु । सह वीर्य करवावहि । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥ (तै.)

आम्हां गुरुशिष्यांचि परमेश्वर रक्षण करो, अन्नपानादिकांनी आम्हां उभयतांचे पोषण करो. उभयतांनी मिळून मोठ्या मोठ्या पराक्रमाची प्रभावी महत्कार्य अनेक करावीत. ब्रह्मवर्चस्त्राने युक्त असणारे आमचे सर्व अध्ययन बेल्हाहि मलीन न होतां प्रगट तेजस्त्री राहावें. आम्हां गुरुशिष्यांत कोणत्याहि दृष्टीने वैमनस्य व मनस्ताप कधीहि उत्पन्न होऊ नये.

नौ यशः सह नौ ब्रह्मवर्चसम् । (तै. शांति)

—आमची सर्व कार्ये परिशुद्ध असावीत. कोणत्याहि कार्यात आम्हां गुरुशिष्यांना एकदमच यश प्राप्त व्हावे. अखिल कर्तव्यपूर्तीनं आम्हांत एकदमच ब्रह्मवर्चस्व उत्पन्न व्हावे.

आप्यायन्तु ममांगानि । बाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रि याणि च सर्वाणि सर्वे ब्रह्मोपनिषदम् । माहं ब्रह्म निराकुर्याम् मा मा ब्रह्म निराकरोदनिराकरणमस्त्वनिराकरणं मे अस्तु । तदात्मनि निरते य उप निषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॥ (छां. शान्ति )

– माझें शरीरबल, माझें मनोबल, माझे करचरणादि समस्त अवयव, बाक, चक्षु, श्रवणादि सारी इंद्रियें, पंचप्राण त्या ब्रह्मतत्त्वांतच बुडून राहात्रेत. माझें सारेंच जीवन परिशुद्ध तत्त्वमय व्हावें. ब्रह्मप्राप्तीचे साधन हातून घडण्याकरितां व त्या ब्रह्मतत्त्वाचा साक्षात्कार होण्याकरितां, आवश्यक असे सर्व सामर्थ्य माझ्या मनइंद्रियांना प्राप्त होवो. सर्व उपनिषदांत ज्याचे प्रतिपादन केलें आहे तें ब्रह्मच हे सर्व आहे असा माझा सदैव निश्चय असो. मी त्या ब्रह्मस्वरूपा निराकरण करूं नये व त्या स्वरूपानेंहि माझें निराकरण करूं नये. अशा या अनिराकरणाचे भाग्य मला लाभो. अशा या अनिराकरणाचा लाभ मला होवो. त्या ब्रह्मात्मैक्याच्या अभ्यासांत मी नित्य असतां उपनिषदांत वर्णिलेली सारी ब्रह्मलक्षणे माझ्यांत उमटावींत. सर्वे खल्विदं ब्रह्म । (हां. १३ । १ ) अहं ब्रह्मास्मि । ( बृ. ४. ४) श्रुति, हें सर्वहि ब्रह्मच म्हणून सांगत असतां मी सुद्धां ब्रह्मच आहे हे ओघानेंच सिद्ध होते. श्रुतिहि पण तसेंच सांगते. मी ब्रह्म असा कसा असेन म्हणून नसत्या उपाधीच्या अध्यासानें, नुसता संशय ठेवून माझ्याकडून केव्हांहि ब्रह्मस्वरूपाचे निराकरण नहोत्रो. ब्रह्मसाक्षात्कार होण्यापूर्वीच संशय निर्माण होत असल्यामुळे तोंपर्यंत आपला साक्षात्कार होण्यास अपात्र स्थितीत मला ठेवणे म्हणजेच माझें निराकरण करणे होय. ते ब्रह्म माझें असे निराकरण न करो. तें ब्रह्म मला साक्षात्कारास अयोग्य म्हणून कधींहि न मानो. ते ब्रह्म आपल्या साक्षात्काराच्या योगानें शक्य तितक्या लौकर मला पावन करो. त्याचे मला विस्मरण होऊं नये । की माझें त्याला विस्मरण होऊं नये.

भद्रं नो अपि वातय मनः • ( अथवे. शांति ) आमच्या धारावाही मनाला विषयाकडून सोडवून सच्चिदानंदस्वरूपाकडे प्रवाहित कर, अशी वेदांत प्रार्थना आहे. आतांपर्यंत दिलेल्या कांहीं वेदवचनांवरून वेदाचे हृदय प्रगट होईल, आर्यांच्या मनोभूमिकेचे दिग्दर्शन होईल, आर्य संस्कृतीचे लक्षण समजून येईल. यांतून होणाऱ्या ओझरत्या दर्शनानेंहि आर्य संस्कृतीचे महत्त्व मनांत त्रिंबेल आणि तिचा मनाला वेध लागेल. आदरणीय अनुकरणीय अशा या आर्य संस्कृतचिं श्रेष्ठत्व लक्षांत घेऊनच भारतीयांनी वागले पाहिजे. प्रथम भारतत्रासियांच्या हृदयांत हा दिव्य संस्कृतीचा वृक्ष रूढमूल झाला पाहिजे, त्यानंतर तो चोहोंकडे फोफावला पाहिजे. ‘ अतिपरिचयादवज्ञा’ असें कांही झालें नाहींना म्हणून भारतीयांनी आपल्या मनाची परीक्षा करावी. राज्य चालविणाऱ्यांनीं स्वपरहिताकरितां या विश्वमौलीभूत आर्य संस्कृतीच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून वागले पाहिजे.

home-last-sec-img