Literature

वैशाख वद्य अमावस्या

मनुष्याचे पूर्वजन्मीचे संस्कार व आजच्या कर्माची फळे या सर्वांमुळे मन सुसंस्कृत किंवा असंस्कृत बनते. शुध्दबीज असल्यास वरपीडा ,परस्व- अपहार,परस्त्री-कामुकता इत्यादी गोष्टींबद्दल घृणा उत्पन्न होते. दुर्बीज असून दुष्ट संस्कार झाल्यास कितीही उपदेश केला तरी व सन्मार्गप्रवृत्त होण्यासाठी उपदेश केला तरी त्यांचे मन दुष्ट वासनेचीच इच्छा करण्याव्यतिरिक्त,सद्विचार,सदाचार यांच्याकडे वळणारच नाही. एकंदरीत मन चांगल्या किंवा वाईट गोष्टींकडे प्रवृत्त होण्यासाठी ज्याचे त्याचे पूर्वसंस्कार,आजचे शिक्षण, संसर्ग हीच मुख्यत्वे कारणीभूत असतात. अशी दुरभिरूची बाळगणाऱ्या लोकांना सज्जन, सदाचारी, ह्यांचे दर्शनही सहन होत नाही. त्याचप्रमाणे पुर्वसुसंस्कृत व आताचे सन्मार्गनुसरण
यामुळे परिष्कृत चित्त झालेले लोक दुर्गामी लोकांचे दर्शनही सहन करू शकत नाहीत.

संस्कारानेच मनोवृत्ती घडते. सन्मार्गप्रवृत्तांना संसारातील कष्ट व तापत्रय पाहून भीती वाटत असली तरी प्रापंचिक जीवनांत सुख वाटून समाधान मिळते. त्यांचे मन देवधर्माकडे आकृष्ट होते. झाले गेले विसरुन जाऊ असे म्हणून पुढेही परमात्मचिंतन करून पुढे येणाऱ्या दुःखातून निभाऊन जाऊ असे विचार त्यांच्याठायी उत्पन्न होतात.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img