Literature

वैशाख वद्य एकादशी

कर्ता व कारण याशिवाय कोणतेही कार्य होत नसते. त्याच प्रमाणे सृष्टिक्तर्या परमेश्वराशिवाय सृष्टी निर्माण होणार नाही. कर्त्या परमेश्वरामुळेच संकल्प-सृष्टिकार्य चालू आहे.

‘सोऽहमिस्मीत्यग्रे व्यहंस्ततोऽहं नामाभवत् |’ सर्व प्रथम मीपणाची जाणीव झाली. त्यानंतर सकल्पोतपत्ती झाली. तिच्यामुळे शक्तीचे स्फुरण झाले व नंतर मन,इंद्रिये, देवता सर्व जग हे सर्व उत्पन्न झाले.

सृष्टीपूर्वी मीपणाची जाणीव झाली नसती तर जगाच्या अस्तित्वास बाध आला असता. ‘ तू कोण? ‘ या प्रश्नास ‘ मी असे उत्तर न मिळाल्यास माझे मन, माझा देह ह्या सर्वांची जाणीवच झाली नसती. बाह्य दृश्याने मीपणाची जाणीव होणे शक्य नाही. मीपणाच्या जाणीवेमुळे बाह्यवस्तुंचे व दृश्याचे ज्ञान होते.

‘एकोऽहं बहुस्याम् ‘ मी एकटाच निरनिराळ्या रूपांत आहे. हा ह्या सर्व बाह्य वस्तुंना आधारभूत असा मीपणाच होय. मीपणाची जाणीव नसती तर या सर्व गोष्टींची जाणीवही झाली नसती. ही मीपणाची जाणीवच सर्व जगतांत,सर्व प्राणीमात्रांत,सर्व मानवदेहांत भरलेली असल्यामुळे परमात्माच,सर्वाश्रय,सर्वव्यापारी,
सर्वाधार,सर्वसमर्थ असा असून सर्वत्र स्वयंसिद्ध आहे.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img