Literature

वैशाख वद्य चतुर्थी

मधमाशा कोणतेही साधन नसतांनाही आपले पोळे तयार करतात, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या संकल्पाप्रमाणेच ही दृश्यमान सृष्टी म्हणजेच विविध वैचित्र्यानें युक्त असे हे जग निर्मिले. परमात्म्याने प्रथम संकल्प केला, तो अशाप्रकारे असावा अशी त्याने इच्छा केली. इच्छा म्हणजेच काम होय व कामास योग्य कार्य तीच सृष्टीनिर्मिती. इच्छेशिवाय कोणतेच कार्य होत नाही. जे जी जी कामे करतात ती ती सर्व त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणेच घडत असतात. ‘ सड्•कल्पमूलो वै कामः | ‘ संकल्पाशिवाय इच्छा उत्पन्न होत नाही.

कोणतेही कार्य करावयाचे असल्यास मूळ संकल्पाच्या प्रेरणेस कोणाची तरी आवश्यकता असतेच की नाही ? वैचित्र्याने आणि विविधतेने नटलेल्या या सृष्टीच्या निर्मीतीसाठी संकल्प, काम यांना प्रेरक अशी व्यक्ति असणे आवश्यक आहे. असे असल्याने तो मूलभूत परमात्माच ती व्यक्ती होय. यावरून परमेश्वर आहे का हा प्रश्न उद्भवतो कां ? आतांपावेतो विववरणात्मक दिलेली सर्व स्पष्टीकरणे परमात्मा आहेच हे सिध्द करीत नाहींत काय ?

अशा तऱ्हेने आपल्या श्रुतिस्मृतींच्या आधारे विचार केल्यास परमेश्वर आहेच. त्यानेच सृष्टी निर्मीली, त्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय आदि कार्ये परमात्मस्वरूप शक्तीच्या आधीन आहेत असेच स्पष्ट होते.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img