Literature

वैशाख वद्य चतुर्दशी

कांही लोक मृत्युलोक दु:खमय आहे असे म्हणतात. काही लोक तो सुखदु:खसंमिश्र आहे असे म्हणतात. तर काही लोक तो सुखाचा आहे असे म्हणतात. सुखाचा संसार म्हणणारा वर्ग मात्र अगदीच थोडा आहे. काही असले तरी दु:ख नाहीसे झाले पाहिजे असे म्हणणारे लोकच जास्त आढळतात. दु:ख-निवारण व सुखप्राप्ती ही एकमेकांशी निगडीत आहेत.

दु:ख म्हणजे काय व सुख म्हणजे काय ? असे विचारले तर ‘ नको असलेले प्राप्त होणे म्हणजे दु:ख तसेच हवे असलेले न मिळणे हेही दुःखच ‘ हवे असलेले मिळाले ते सुख व नको असल्याचे निवारण हेही सुखच. अर्थात ‘ हवे, नकोच ‘ या कल्पनाच सुखदु:खाचे मुलाधार होत. मनाच्या भावनाच सुखदुःखाला कारणीभूत होत.

अनुकूलता व प्रतिकूलता त्या त्या वस्तुवर किंवा घटनेवर अवलंबून नसून त्या मनाच्याच भावना होत. मनुष्याच्या मनावरील संस्कार व विवेकीपणा याला अनुसरून अनुकूल वा प्रतिकूल भावना निर्माण होतात. लहान मुलांना शाळेत जाणे आवडत नसते, खेळणे हाच त्यांच्या आनंदाचा विषय. अशावेळी त्यांच्या आईवडिलांनी ‘ तू शाळेत जाऊ नकोस, खेळतच रहा ! ‘ असे म्हटले तर त्यांना आनंद होतो. तेच मूल थोडे मोठे झाले म्हटले तर त्यांना आनंद होतो. तेच मूल थोडे मोठे झाले म्हणजे चेंडू, भोवरा इत्यादी खेळांत त्याला आनंद वाटतो व तेथूनच त्याच्यामध्ये विषयसुखाची लालसा उत्पन्न होते.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img