Literature

वैशाख वद्य तृतीया

‘शब्दोच्चार करून दाखविले जाणारे भाव हे सर्व पूर्वी अदृश्य रूपातच होते.व माझ्या संकल्पानेच ते व्यक्त होऊन तुम्हांस ऐकूं येऊ लागले. माझ्या प्रभावानें ते पुन्हा सर्व अदृश्य झाले’ असे भगवंतांनी म्हटले आहे. तात्पर्य परमात्म्याच्या संकल्पाने सृष्टीस व्यक्तरूप प्राप्त होते. व शेवटी ती त्याच परमात्म्यात एकत्व पावून अदृश्य होते.

जग निर्मिले पाहिजे असा परमात्म्याने संकल्प केला व या संकल्पमात्रानेच जगाची निर्मिती झाली,एवढेच तयाचे तप ‘ इच्छा मात्रं प्रभो: सृष्टि: |’ इच्छेनेच सृष्टीनिर्मिती झाली. दुसऱ्या एका ठिकाणी परमात्म्याने सृष्टीकडे पाहिले व कल्पना केल्याबरोबर सृष्टीची निर्मिती झाली असे म्हटले आहे एकंदरीत परमात्म्याच्या संकल्पानेच सृष्टी निर्माण झाली ही गोष्ट सत्य आहे.

कोणत्याही वस्तूच्या निर्मितीला संकल्पाबरोबर साधनांचीही आवश्यकता आहे. गणेशमुर्ती तयार करण्यासाठी संकल्पाबरोबर चिकणमातीची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे सृष्टीनिर्मितीसाठी साधनांची आवश्यकता आहे का ? परंतु परमात्म्याच्या संकल्पास अन्य साधनांची जरूरी नसते. त्याचा संकल्पच साधनरूप होय. कारण तो सर्वसमर्थ आहे. त्याच्या संकल्प मात्रानेंच सृष्टीनिर्मितीस आवश्यक असलेली साधने आपोआपच निर्माण झाली.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img