Literature

वैशाख वद्य त्रयोदशी

आपली सनातन आर्य संस्कृतीच श्रेष्ठ आहे. आपला सनातन धर्मच सर्व धर्माचा मूलाधार होय. विश्वाच्या कल्याणासाठी किंवा उद्धारासाठी सनातन धर्मच मुलभूत व आधारभूत होय. अशी ही सनातन आर्यसंस्कृती तिच्यातील अध्यात्मिक जीवनाचे पावित्र्य आपण न जाणल्यामुळे आपली अवनती झाली आहे व त्यामुळेच सत्यधर्माचा व उच्च संस्कृतीचा अभाव आढळून येतो. म्हणून या सनातन संस्कृतीचा उद्धार व्हावा असे मला वाटते.

हे जग जेथून निर्माण झाले ते समजून घेणे यांतच आपल्या जीवनाचे साफल्य आहे. आपल्या ध्येयाच्या दृष्टीने विचार केल्यास जगाला काहीच किंमत नाही. जग दिसते ते आनंदाच्या अज्ञानामुळेच. ते अज्ञान नष्ट करणे आवश्यक आहे. दगड,लाकूड याप्रमाणे निश्चल निष्टायुक्त होऊन निर्विकल्पस्थिती मिळवणारा जो कोणी असेल त्याने सत्य जाणले असे ठरते. म्हणूनच अशा कार्यासाठी तपोबलाची आवश्यकता असते. परमात्मानेही सुरवातीस तप करूनच जगनिर्मिती केली. त्याने आत्मनिष्ठेने जगसृष्टी उत्पन्न केली. या आत्मनिष्ठेलाच ‘ तप’ म्हणता येईल.

एकांतामुळे मन जितके एकाग्र होईल,त्याप्रमाणांत दैवी सामर्थ्य उत्पन्न होते. एकांतात म्हणजेच ब्रम्हनिष्ठेत राहून, तप करून मनाच्या एकाग्रतेने सामर्थ्य प्राप्त होऊन, बलप्राप्ती होऊन त्याद्वारे लोकांना काहीतरी मदत करण्यास सहाय्यभूत होणे शक्य आहे.

श्री प.प. सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img