Literature

वैशाख वद्य नवमी

एखादा सामर्थ्यवान मनुष्य म्हणजेच ‘दादा’ आपल्या कच्छपी पाच दहा माणसे ठेवतो. ती त्याच्या कच्छपी लागली नाहीत तर तो त्याचा काटा काढतो, त्रास देतो,कोर्टकचेऱ्यांचे हेलपाटे मारावयास भाग पाडतो.त्यामुळे लोक त्याला घाबरतात. असे असतांना अनंत शक्तीयुक्त अशा सूर्य, चंद्र, वायू ,अग्नी,यम यांनी काय केले असते? त्यांना काय करणे अशक्य होते? पण या सर्वांना ताब्यात ठेवून हे सृष्टीरूपीराज्य सुखरूपपणे चालवित असतो. त्यांचे शासन नसते तर गवताची काडी पाण्यात बुडाली असती व दगड पाण्यावर तरंगले असते. भूमीपेक्षा पाणी जास्त असताना भूमी पाण्यात बुडू शकली नाही? भूमीला उचलून धरणारी शक्ती कोणती?

मानवी देह हा रबराच्या पिशवीसारखा असून त्याला नऊ छिद्रे आहेत. रबरी पिशवीमधील हवा एका सूक्ष्म छिद्रातून ‘फूस’ असा आवाज करून निघून जाते. मग नऊ छिद्रानी युक्त अशा मानवरूपी पिशवीतील हवा रबरी पिशवीतील हवेप्रमाणे कां निघून जात नाही? हे कोणत्या शक्तीमुळे? याचा थोडासा विचार करून पहा! या सर्व गोष्टी अघटित घटना सामर्थ्यवान असलेल्या परमात्म्यामुळेच चालू आहेत असे असल्यामुळे त्याचे अस्तित्व आहे काय? असा प्रश्न करणारे व त्याचे अस्तित्व अमान्य करणारे किती अविवेकी होत?

श्री प.पू सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img