Literature

वैशाख वद्य प्रतिपदा

सुरवातीस परमात्मा एकमेवच होता. त्याने दुसऱ्याची अपेक्षा केली. पण तो अद्वितीय असल्याने तेथे दुसरे काहींही असणे अशक्य होते. म्हणूनच त्याने आपलेच दोन भाग, स्त्री व पुरुष असे कल्पून पति – पत्नी अशी भावना उत्पन्न केली. सत् रूप परमात्म्याने अशाप्रकारे साकार रूप धारण करणे हें जगत् संकल्पानुसार योग्यच होते. या संकल्पाशिवाय कुठल्याही प्रकारची सृष्टी निर्माण होण्याची शक्यता नव्हती.

सृष्टीपूर्वी परमात्मा एकमेवच होता. त्याने आपल्या सभोवती पाहिल्यावर सर्व ठिकाणी आपणच सत् रूप आहोत,आपल्यापेक्षा वेगळे असे कांहीही न दिसल्याने ‘ सोऽहम् ‘ दुसरे जें काही आहे ते मीच असून माझ्या वेगळे असें काहीही नाही असे म्हटल्याबरोबर निराकार अशा परमात्मस्वरूपात ‘ मी पणा ‘ उत्पन्न झाला. तेथे दुसरे कांहीही नसल्याने ते कसें निर्माणकरणार

? दुसरे कांहीही नसल्याने निर्मिती कशी होणार ? यासाठी निराकार असलेल्या परमात्म्याने आपल्या संकल्पशक्तीने हे सर्व लोक, लोकपाल यांची निर्मिती केली. पण तो स्वतः मात्र पूर्वस्थितीतच राहून जगद्रूपाने उत्पन्न झाला. हीच त्याची अद्भूत शक्ती होय. जगनिर्मितीसाठी शक्ती हवीच. शक्तिशिवाय कोणतेही काम होणार नाही. आधी शक्ती व नंतर कार्य. कार्यक्षमता म्हणजे शक्तीच.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img