Literature

वैशाख शुद्ध अष्टमी

हल्ली वेदाध्ययन सोडून बटू इंग्रजी शाळेत जातो. उपनयनानंतर संध्यावंदन पाठ होईपर्यंतहि त्यास वेळ मिळत नाही. इंग्रजी शाळेत जाण्याने ‘ हॅट, बॅट , बूट, कॅट ‘ हे त्यास सहज येऊं शकतात. पण वेद मात्र येत नाहीत. कॅप डोक्यावर असते पण शेंडी असत नाही. लाॅर्ड मँकाले यांनी ‘ हिंदू लोकांचे, वेष, भाषा, वागणूक, संस्कार हे सर्व इतर उपायानी घालविल्याशिवाय त्यांचा धर्माभिमान जाणार नाही. त्यांचा धर्माभिमान, देहाभिमान नष्ट केल्याशिवाय त्यांच्यावर राज्य करतां येणार नाही. ‘ असे म्हटले होते व तेव्हापासून इंग्रजांनी त्याप्रमाणे प्रयत्न केले आणि आज भारतातून इंग्रज गेले असले तरीहि त्यांचे प्रयत्न सफल झाल्याचे आढळून येते. आम्हास आमच्या संस्कृतीचा अभिमान शिल्लक राहिला नाही. उलट पाश्चात्य संस्कृतीच परमपुज्य समजून ती शिरसावंद्य ठरली आहे. डोक्यावर केस ठेवण्याची सर्रास दिसून येणारी गोष्ट त्याचेच प्रतीक होय. आज वर्णधर्म आश्रमधर्म यांवर आमची श्रध्दा नाही. ‘ मी चुकून हिंदू म्हणून जन्मलो ‘ असे आपल्या माजी पंतप्रधानांनी म्हटल्याचे कळते. ते मुसलमानांत वाढले व इंग्लंडात शिकले, त्यामुळे त्यांच्यावर परकीय संस्कृतीचेच दुष्परिणाम झाल्याने त्यांत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अन्नाप्रमाणे बुद्धी प्राप्त होते. यामुळे आजच्या राज्यकर्त्यांचे मन गोवधबंदीनिषेध व निर्बंध करण्यास कसे होणार ?

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img