Literature

वैशाख शुद्ध चतुर्थी

भक्तिमार्गातील मनुष्यास स्नान, संध्या, पूजा यांत समाधान वाटते. पण देहाभिमानी मनुष्यास आपली शेती- भाती,उद्योग यांत समाधान वाटतें. एकाच कुटुंबात असणा-या निरनिराळ्या
चौघा भावांना त्यांचे त्यांचे अधिकार व गुण यांना अनुसरुन भिन्न भिन्न कामें देणेंच योग्य ठरेल. आपण आपापसातील फरक लक्षांत न आणता समान विश्वासाने आपापली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.तो श्रेष्ठ कां व मी कनिष्ठ कां ? असा भेदाभेद असणें ही सामुदायिक जीवनांतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वकुटूंबातहि वर्गमुलक श्रमविभाग चालत आले आहेत.

ब्राम्हण हा मुखापासून उत्पन्न झाला आहे. म्हणून जन्मतःच त्याची वेदाध्ययन,स्वाध्याय,प्रवचने हीं कर्तव्यकर्मे होत. मुखापासून जन्मल्यानें मुख जी कार्ये करते ती त्याची नैसर्गिक कार्ये होत. ह्याच प्रकारे बाहूपासून क्षत्रीय निर्माण झाले. रक्षण करण्याचे कार्य हाताचेंच असल्याने संरक्षण कार्य हे क्षत्रियांचे सहजकार्य होय. ब्राम्हणामध्ये शापाचेच सामर्थ्य असते. तर क्षत्रियांत बाहूबळ असते. अशाप्रकारे संयुक्तिकरित्या विचार केल्यास सर्व वर्णाचे सत्यत्व आपल्या ध्यानी सहज येईल. एका इंद्रियाचें काम दूस-या इंद्रियास करतां येत नाही. त्याचप्रमाणे एका जनसमुहास आनुवंशिकरित्या प्राप्त झालेले विशिष्ट संस्कार इतरांना प्राप्त होणार नाहीत. असें असल्याने ब्राह्मणादिवर्ण जन्मतःच प्राप्त होतात.

श्री प.प. भगवान सद्गुरू श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img