Literature

वैशाख शुद्ध दशमी

जन्मानें प्राप्त झालेल्या त्या त्या वर्णधर्माचे आचरण न केल्यास दुसऱ्याची त्या जागी नेमणूक होणें अपरिहार्यच आहे. नवीन शोधण्यापेक्षा आहे तेच सांभाळणे श्रेयस्कर होय. चारी वर्णापैकी कोणत्यातरी एका वर्णाचे संस्कार आपल्या रक्तांतच भिनले असल्यामुळे सहजपणे ते सांभाळणे शक्य आहे. थोड्या काळांत व थोड्या खर्चाने चातुर्वर्ण्यांची व्यवस्था होत असल्याकारणाने देशहित साधण्यासाठीहि अनुवंशिकतेने आलेले वर्णच उपयोगी पडतील. यावरुन ज्या त्या वर्णांनी आपापली कर्तव्येच पार पाडणे सुखकर व सुलभही आहे.

मानवाचें आयुष्य शंभर वर्षे आहे असे ठरवून त्याची विभागणी चार भागात केली आहे आणि त्या त्या भागाला अनुरुप अशी योग्य कर्तव्ये सांगितली आहेत व हाच आश्रमधर्म पहिल्या २५ वर्षाचा काल ब्रम्हचर्याश्रमाचा. या आश्रमात विद्याव्यासंग व वीर्यरक्षण ही मुख्य कर्तव्ये होत. ब्रम्हचर्याश्रम जितक्या योग्य रितीने आपण पार पाडू शकू तितकी आपण पुढील आश्रमांतील कर्तव्ये सुलभतेने पार पाडू शकूं. शंभर वर्षाचे आयुष्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ब्रम्हचर्याश्रमातील कर्तव्ये काळजीपुर्वक पाळणें आवश्यक आहे पण आजच्या जमान्यातील वातावरण ब्रम्हचर्याश्रमास अनुकूल आहे का ?

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img