Literature

वैशाख शुद्ध पंचमी

पूर्वजन्मात केलेल्या कर्मामुळेच हा जन्म प्राप्त होतो. ब्राह्मण किंवा शुद्र कुलांत जन्मणे हें ह्या जन्मातील इच्छेमुळे होत नाही तर ते पूर्व जन्मातील कर्माचे फळच होय. म्हणूनच जन्मापासून वर्ण व्यवस्था योग्य ठरते, जन्मापासूनच ब्राह्मण, शुद्र इत्यादि ओळखले जातात. जन्मानें ब्राह्मण असणारा कर्माने शुद्र असूं शकतो. पूर्व जन्मास त्याच्याकडून ब्राम्हण शरीर धाररेस योग्य असें आचरण आकस्मिकरित्या घडले असले पाहिजे. कर्माने ब्राह्मण पण जन्मानें शुद्र या विषमपणासहि वरील कारणच कारणीभूत असतें. ब्राह्मण जन्मास योग्य अशी कर्मे त्याच्याकडून पूर्वजन्मांत झाली नाहींत हेंच तें कारण होय. ब्राह्मणाची कर्मे संगतीमुळे बिघडली असल्यास ती नीट करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजारी झालेल्यास योग्य उपचार करून आपण बरें करून घेतोंच कीं नाही ! त्याचप्रमाणें ब्राह्मणादि चातुर्वर्ण्यांना ते कर्मापासून च्युत झाले असल्यास, योग्य शिक्षण, उपाय ह्या द्वारां योग्य मार्गावर आणले पाहिजे.

‘ चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: | ‘ असें श्रीकृष्ण भगवानानी सांगितले आहे. त्यावरून वर्णव्यवस्था जन्मापासूनच आहे हें स्पष्ट होतें. अर्जुन क्षत्रीय. क्षत्रीयाचा धर्म युध्द करणें म्हणूनच श्रीकृष्णानीं अर्जुनास आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img