Literature

वैशाख शुद्ध पौर्णिमा

‘ परमेश्वर आहे काय ? ‘ असा जे प्रश्न करतात त्यांना ‘ तुम्हास वडील आहेत काय ? ‘ असा प्रतिप्रश्न करावा लागेल. आपणा सर्वांना वडील आहेत हे निश्चित. त्याप्रमाणेच परमेश्वर आहे हेही तितकेच सत्य व स्पष्ट आहे.

आपला धर्म वैदिक धर्म आहे. त्याला श्रुतिस्मृतीच आधारभूत होत. त्या अनुषंगानेच प्रथम हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करूं या. त्यानंतर ज्यांचा श्रुतिस्मृतिवर विश्वास नाही अशांचे प्रश्न युक्ति प्रयुक्तीने सोडवू.

‘ त्वं नः पिता त्वं नो माता | ‘ असें म्हटले आहे. म्हणजेच परमात्मा हाच आपले आई व वडील होय. व्यावहारिकदृष्ट्या आई व वडील हे भिन्न भिन्न आहेत. पण परमार्थदृष्ट्या आई-वडील एकच म्हणजे तो परमात्मच !

सृष्टीच्या अगोदर तिन्ही काल, दशदिशा, पंचमहाभूते ही कांहीही नव्हती. एकमेव सत् रूप परमात्माच त्यावेळी प्रकाशमान होता. त्यांच्यापासून ही सृष्टी निर्मिली गेली. सर्व दिशाही त्यापासूनच उत्पन्न झाल्या. सुरवातीस तो स्वतःच प्रगट झाला. आता गर्भात असणारा व नंतर जन्मास येणारा तोच होय. सर्वांच्या आत्म्यात तोच भरला आहे. सृष्टीतल्या नाना प्रकारच्या दिसणा-या वस्तुतही तोच भरलेला आहे. आपणा सर्वांचा मायबापही तोच आहे. त्यांचे अस्तित्व नसलेली कोणतीही वस्तु ह्या जगात नसल्यामुळे तोच आपला मायबाप होय.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img