Literature

शिखेचे महत्त्व

अलीकडे सरकारी खाव्यांतून ब्राह्मण युवकांचे उच्चाटण होऊं लागलें आहे व ब्राह्मण युवकांतून शेंडी व जानव्याचे उच्चाटण होऊं लागलें आहे. तत्त्व कळलें म्हणजे महत्त्वहि पटतें.

विना यज्ञोपवीतेन भुंक्ते तु ब्राह्मणो याद । स्नानं कृत्वा जपं कुर्वन्नुपवासेन शुध्यति ॥ २३ ॥ ( लघुहारीत स्मृति ) शिखां छिदंन्ति ये केचिद्वैराग्याद्वैरतोऽपि वा। पुनः संस्कारमर्हन्ति त्रयो वर्णा द्विजातयः॥१८॥ मोहाच्छिन्दन्ति ये केचिद् द्विजातीनां शिखां नराः । चरेथुस्ते दुरात्मानः प्राजापत्यं विशुद्धये ॥ १९ ॥ बिना यज्ञोपवीतेन द्विजातिर्यग्रुपस्पृशेत् । प्राजापत्यं प्रकुर्वीत निष्कृतिर्नान्यथा भवेत् ॥ २१ ॥ — ब्राह्मण जानव्या शिवाय जेवला तर पुन्हां स्नान करून जानवें घालावें. सबंध दिवस उपवास करून बाराशे तरी जप करावा. त्यानें तो शुद्ध होतो. शेंडी जर वैराने अथवा अपक्क वैराग्याने काढून टाकली तर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना पुन्हां उपन यन संस्कार करावा लागतो. विचार न करतां मूर्खपणानें ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या शिखा जे दुष्ट काढून टाकतात त्यांची प्राजापत्य नांवाचे प्रायश्चित्त करूनच शुद्ध होते. शिखासूत्र नसल्यास असे प्रायश्चित्त घ्यावे लागते. ज्ञानमेव शिखा नान्या । आत्मज्ञानप्रधान आर्य संस्कृतीचे आम्ही आहों ही जाणीव स्वतः ठेवण्याकरितां व दुसऱ्यालाहि ती जाणीव देण्याकरितां आर्य संस्कृतीचे तें एक चिन्ह म्हणून आहे. वन्हेर्द्वयोर्चालकीलावर्चिहॅतिः शिखा स्त्रियाम् । ( अमर ) शिखा हा शब्द अग्नि या अर्थाचा आहे. अग्निदेवो द्विजातीनाम् । द्विजातींना अग्नीची उपासना असते. या दृष्टीनेंहि त्याची खूण म्हणून शिखा बाळगण्याची द्विजातींतून पद्धत आहे. अग्ने नय सुपथा राये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान् । युधोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्त विधेम ॥ ( यजु. वाजसनेय संहिता) हैं या मंत्राने स्पष्ट होते. ब्राह्मणोस्य मुखमासीत् । मुखा दग्निरजायत् । ( पुरुषसूक्त) मुख हे स्थान अग्नीचें आहे. परमात्म्याच्या मुखापासूनच अग्नीची उत्पत्ति झाली. त्या परमा त्म्याच्या मुखापासून आपली उत्पत्ति आहे ही जाणीव स्वपरांना होत असण्या करितां त्याचें हें शिखारूपानें बाह्य चिन्ह धारण केले जाते. अग्नि स्वप्रकाश अंसून परप्रकाशक आहे. बाह्मणहि ब्रह्मज्ञानानें स्वप्रकाश असून उपदेशादि द्वारे परप्रकाशकहि आहे. हे वर्णानां ब्राह्मणो गुरुः |; अस्मिन् देशे प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः । स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन पृथिव्यां सर्वमानवाः ॥ इत्यादि वाक्यांवरून स्पष्ट होतें. तेव्हां या अशा विशिष्ट लक्षणाच्या विशिष्ट जातीची खूण म्हणून ही शिखा बाळगली जाते. ‘एप चिदग्निः‘ शब्दांत अग्नि हा चिद्रूप ब्रह्मच आहे हे सिद्ध होते.

ब्रह्मनाह्मण आत्मना । — चिद्रूप ब्रह्मस्वरूपाचें ब्राह्मण हे एक प्रतीक आहे. या दृष्टीने असल्या शिखेचे धारण ब्राह्मणाकडून होते. अग्निसारखांच पवित्र वस्तुद्योतकहि ही शिखा असावी. आपल्याला त्याचा संपर्क न लावून घेतां दुसऱ्याचे कष्मल काढून टाकण्याचा अग्नीचा गुण ब्राह्मणा जवळ असल्यामुळे तदर्शक ही शिखा आहे असे मानावें. एकजातीय कल्पादग्निब्राह्मणयोः । – अग्नि व ब्राह्मण या दोघांची एकच जात आहे याचे निदर्शक अशी ही शिखा आहे. अग्निस्थानीय उत्तमोगरूप मुखापासून ब्राह्म णाचा जन्म झाला आहे. त्यामुळे हे सर्वांत मुख्य आहेत, असा शिखा धारणे पासून अर्थ निघतो. यो अग्निः स द्विजो विप्रमैत्रदर्शिभिरुच्यते ॥ (मनु. ३।३१२ ) वैश्वानरः प्रविशत्यतिथिर्ब्राह्मणो गृहान् । ( कठ उ. ११११७) इत्यादि प्रमाणांनी अग्नि व ब्राह्मण यांत फरक नाही अशी अभेदस्थिति दाख विणारे हे चिन्ह आहे. अशा अनेक प्रकारें या शिखेविषयी सांगता येईल. अशी ही महत्त्वपूर्ण शिखा काढून टाकल्यास त्याचा अर्थ काय होईल ! कोणती भूमिका सूचित होईल ! केशान शीर्षन यशसे श्रियै शिखा। (यजुः बाज सनेय सं १९९२ ) आणि ते केवळ डोक्यावरील केस नव्हेत तर यश, कीर्ति, प्रताप, महिमा आणि वैभवाचा कळसच ती शिखा होय. सदोपवीतिना भाव्यं सदा बद्धशिखेन च । विशिखो व्युपवीतश्च यत्करोति न तत्कृतम् ॥ ( गोभिल स्मृ. ४) सदैव जानव्यानिशी असावें, शेंडी बांधलेलांच असावी. शेंडी आणि जानवें नसलेल्याने कांही केले तरी तें सर्व न केल्यासारखेच होतें, असें स्मृतिकार सांगतात. आतां थोडा यज्ञोपवीत म्हणजे जानवें यावर विचार करूं.

home-last-sec-img