Literature

श्रावण वद्य त्रयोदशी

' *भिक्षुका नैव भिक्षन्ति बोधयन्ति च* ' ' आई, भिक्षा वाढ ' असे ओरडून भिकारी दारोदारी भिक्षा मागतात.
दाराशी भिकारी आला म्हणून आपण त्रासून जाऊ नये. कारण भिक्षेसाठी आले असले तरी तरी ते एक तत्त्व
समजवून सांगत असतात. ' भिक्षा वाढ ' याचा अर्थ, आम्ही दान न केल्यामुळेच आम्हाला ही परिस्थिती प्राप्त
झाली म्हणून तुम्ही तरी दान करून आमच्या परिस्थितीला येऊ नका ! ' हाच नाही काय ?

सर्वात मोहकर वस्तु कोणती याचा शास्त्राने शोध केला आहे. व्यवहारांत पैशासाठीच भाऊबंदकी सुरू
होते, गुरूशिष्यातही वाद निर्माण होतो. कमी जास्त खर्च केल्यास स्त्री-पुत्रांनाही राग येतो.

' दान ' हे एक महान तप आहे. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ व संन्यास या तीन आश्रमांत दान करणे शक्य नसते.
म्हणून गृहस्थाश्रमीयांसाठी ' दान करणे ' हा तपाचा एक विशेष प्रकार सांगितला आहे. दान घेण्यासाठी
महात्मे आपल्याकडे येतात त्यावेळी कृतज्ञतेने, भक्तीने दान करा ! अन्नदान करा !! मोह आदींच्या
निरसनासाठीच दानधर्माचा विधी सांगितला आहे.

जगांत सर्वकाही चालू असते. आपल्यासाठी, आपल्या उध्दारासाठी परमेश्वरकृपेने हे सर्व चालले आहे.
दानाने ज्ञान व सामर्थ्य देणाऱ्या श्रीगुरूरूपी परमात्म्याची सेवा तुम्ही काया, वाचा, मनाने करून आदर्श जीवन
जगून कृतार्थ व्हा !!

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img