Literature

श्रावण वद्य सप्तमी

या ब्रह्मांडात सद्गुरूखेरीज इतर कोणीही आपला हितचिंतक नाही. तत्त्व समजवून सांगणारा गुरूच व
सद्गुरूच्या सान्निध्याने आणि मार्गदर्शनाने हा संसारसागर पार होणे हे आपले कर्तव्य. आपल्या हितासाठी
चिरसुखाची इच्छा धरून त्याप्रित्यर्थ प्रयत्न न केल्यास देवानुग्रह दुर्लभच. *' मनुष्यत्वं मुमुक्षूत्वं महापुरूष संश्रयः
'* अशा तीन गोष्टी दुर्लभ आहेत केवळ मनुष्य जन्म झाला म्हणून कोणीही मुक्त होत नाही. उलट पशुवृत्तीने
आयुष्य घालविल्यास तो दुःखपरंपरेच्या गर्तेतच सापडतो. ज्याला विषयसुख क्षणभंगुर वाटते, खऱ्या सुखाची
कल्पना असून विषयसुख नरकाचा मार्ग वाटतो, अशा मनुष्याने योग्य असे धर्माचरण करून याच जन्मी
जीवनसाफल्य प्राप्त करून घेतल्यास त्यास पुनर्जन्माची शिदोरी प्राप्त होत नाही. याच जन्मी, याच देही
परमात्म्याची कृपा संपादन करून त्या सुखांत विलीन होऊन जीवनमुक्त व्हावे असे ध्येय संपादन करणे हेच
मनुष्यजन्माचे इतिकर्तव्य होय. या उलट वागणे म्हणजे पशुवृत्ती किंवा राक्षसीवृत्तीच. यादृष्टीने विचार केल्यास
मानवी जीवनसाफल्य म्हणजे निर्विषयसुखप्राप्तीच होय. त्याकरता जन्म घेतल्यापासून मृत्यू प्राप्त होईपावेतो
आपल्या शक्तीनुसार प्रयत्नशील असले पाहिजे. सर्व जन्म घालविला तरीही विषयसुखाने मनुष्य सुखी होतो
असे कोणीही सांगू शकत नाही. खारट पाणी प्याल्यामुळे तहान भागल्याचे कोणी अनुभविले आहे काय ?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img