Literature

श्रावण शुद्ध द्वादशी

*' भद्रं नो अपिवातय मनः | ' माझे मन मांगल्याकडे ने ! '*

*' तन्मे मनः शिवड्•कल्पमस्तु | ' ' माझे मन मांगल्याचा संकल्प करण्यायोग्य होवो. '*

*' तं ह देवमात्मबुध्दिप्रकाशं मुमुक्षूर्वै शरणमहं प्रपद्ये | '*

' देहातील आपुलकीची भावना नष्ट करून आत्मबुध्दीचा प्रकाश करणाऱ्या परमात्म्यास मुमुक्षू असलेला
मी कधीही विसरणार नाही. ' अशा अनन्यवृत्तींनी श्रुतीनी प्रार्थना केल्याचे आढळते. '
*' शिष्यस्तेहं शाधि मा त्वां प्रपन्नम् | '* ही अर्जुनाने केलेली प्रार्थना सर्व गिताभक्तांना माहित आहे.
अशाप्रकारे परमात्म्याची मनःपुर्वक प्रार्थना करणे म्हणजेच परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त करून घेणे होय.
आपणांस असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी समर्थांच्या सहाय्याची आवश्यकता न्यायय्यच
होय. श्रीकृष्ण भगवान सर्वसमर्थच होते. त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार संपुर्ण जग चालते.

*' भूतस्य जातः पतिरेक आसीत् | '* सर्व सजीवांचा व देवतांचा तोच मुख्य होय. त्याचे अंशरूपी असलेले हे
जग त्यांतच विलीन होणार आहे. या क्षणभंगुर जगांतील अविनाशी अशा परमात्म्यास शरण जाण्याची
बुद्धी असणे हीच योग्य दृष्टी होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img