Literature

श्रावण शुद्ध नवमी

ज्यांना परमात्मप्राप्ती होते त्यांना पुनर्जन्म नाही. ' न स पुनरावर्तते | न स पुनरावर्तते | ' असे श्रुतींनी
आश्वासन दिले आहे. जन्म नाही म्हणजे म्हातारपण नाही व मरणही नाही. म्हणून जन्म मरणापासून मुक्त
करणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हेंच आपले ध्येय असले पाहिजे. मृत्युलोकामध्ये प्राप्त झालेला
मानवजन्म हा ऐहिक सुखासाठी किंवा विषय सुखासाठी नाही. हे जीवन म्हणजे संकटकालच. त्यांत सुख
नाहीच यामधील मार्गही मनुष्यास चकविणाराच असतो. येथील ऐहिक सुखाचे सर्व प्रयत्न मुख्य ध्येयाच्या
विरूध्दच आहेत. ते आपल्या हितासाठीच आहेत असे समजून केली जाणारी सर्व कर्तव्ये मुर्खपणाचीच

असतात. याकरिता आपण जागृत राहून जन्ममरणाच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
परमात्मा सुखरूपी नसता तर सुखाची वासनाच निर्माण झाली नसती. पण तो सुखरूपी असल्याने त्याच्या
अल्पांशरूपी अशा या जगांत सुखाची संपुर्ण कल्पना आपणांस आल्यास क्षुद्र विषयाचा त्याग करणे सोपे
होईल. विषयापासून मुक्त होणे हेच आपले जीवन ध्येय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img