Literature

श्रावण शुद्ध षष्ठी

एखाद्या सावकारास यदा कदाचित दान करण्याची बुद्धी झाली तर तो आपले भांडवल निश्चितपणे
राखून ठेवून जादा असलेल्या पैशातून दान करील. पण भगवंत तसा कंजूष नाही. तो आपल्या भक्तांना
स्वस्वरूपही देऊन टाकतो, आपल्या स्वरूपांत आपल्या भक्तांना सामावून घेतो म्हणजेच तो आणि त्याचा
भक्त यामध्ये निराळेपण रहात नाही. जणू काय तो भक्तरूपच होतो.

भगवत् प्राप्ती ही महानंददायक आहे. तो आनंद प्राप्त करून घेणे फक्त मानवासच साध्य होते. इतर
प्राणिमात्रांस व्रत, आराधना, पुजा, धर्म-कर्म हे काहीच करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना ते दुर्लभ आहे. दुर्लभ
असा मानवजन्म मिळवून त्याची सार्थकता करून घेण्याची महत्वकांक्षा बाळगून पवित्र कर्माचरण करणे
योग्य होय. प्रवृत्ति किंवा निवृत्ती मार्गाने भगवंताची आराधना करून त्याचे कृपापात्र होऊन जगणे हा
मानवजन्माच्या सार्थकतेचा मार्ग होय. तो चुकल्यास अधोगतीच.

भगवद् आराधना हे मानवाचे अत्यावश्यक कर्तव्य असून तो जीवनसार्थकतेचा राजमार्ग आहे हे
त्रिकालबाधित सत्य आहे. भगवान सर्वव्यापी असल्याने आपल्या आराधनेची तो योग्य दखल घेतो.
वर्णाश्रम धर्मपालन हेच भगवद् आराधनेचे एक व्यवस्थित रूप होय. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, क्षुद्र यांनी सर्व
आपापल्या वर्णास योग्य अशी कर्मे करून सदाचारशील होऊन वागले पाहिजे. स्त्री-पुरूषांनी आपापली
कर्तव्ये चोखपणे बजाविली पाहिजेत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img