Literature

श्रावण शुद्ध सप्तमी

प्रापंचिक जीवनांत तंटे, बखेडे वगळून धर्माला अनुसरून अर्थ संपादणे व कामपूर्ती करणे यास कोठेच
विरोध नाही व ते करू नयेत असेही कोणी म्हटलेले नाही. धर्ममार्गाने संपादिलेल्या धनाचा विनियोग
धर्मकार्यासाठी करण्यास धर्माचा विरोध नाही. त्याचप्रमाणे कामाबद्दलही म्हणता येईल. सत्-प्रजाभिवृध्दी
हाच कामाचा उद्देश. हा महद् उद्देश डावलून स्वेच्छाचार मात्र धर्मास असम्मत आहे. म्हणूनच पतिपत्नींनी
आपल्या धर्माप्रमाणे संसार केला पाहिजे. पतीने पत्नीला वपत्नीने पतीला एकत्व भावनेने सहयोगी झाले
पाहिजे. स्त्री असो वा पुरुष असो वा प्रत्येकाने आपला धर्म विसरून परपुरूष किंवा परस्त्रीशी रत झाल्यास
धर्मनाश होऊन अधर्मचरण घडते. भगवंताचे जे प्रकृती व पुरूष स्वरूप आहे तेच पति-पत्नी होत. स्त्री-पुरुष
भावनेने भिन्नत्व पावून सध्दर्माचरण करणे हेच गृहस्थाश्रमाचे लक्षण व तो गृहस्थाश्रमाचा मुख्य उद्देश.

विषयोपभोगाचा त्याग करणे वाटते तितके सोपे नाही. परात्पर वस्तु, परमात्मस्वरूपाची आराधना व
साधना हे सर्वांना साध्य होण्यासारखे नाही. वाटेल त्याला संन्यासग्रहण करता येणार नाही आणि ते तितके
सोपेही नाही. विषयसुखाची आशा ज्यांची अद्याप शिल्लक आहे अशांना संन्यासाश्रमाचा अधिकार नाही.
अशांनी गृहास्थाश्रमी होऊन भगवद्-आराधना केली पाहिजे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img