Literature

श्रीरामाचा दयागुण व ब्राह्मणप्रेम

ब्रवीमि सत्येन न तेऽस्ति यंत्रणा धनं हि यद्यन्मम चिप्रकारणात् । 

भवत्सु सम्यक् प्रतिपादनेन मयार्जितं चैव यशस्करं भवेत् ॥( वा. रा. ३)

राम हा सदोदित सत्यच बोलतो. सरेंच सांगावयाचे म्हणजे माझी जितकी म्हणून संपत्ति आहे तितकी ती सर्व आपल्यासारख्या सत्पात्र ब्राह्मणा करितांच आहे, यात तिळमात्र संशय नाही. आपल्यासारख्या सत्पात्र ब्राह्मणांना माझी संपत्ति प्राप्त झाली तर मी मिळविलेल्या या संपत्तीचे खरें सार्थक झालें असे मी समजतो. उंछ वृत्तीने जीवन व्यतीत करणाऱ्या त्रिजट नामक ब्राह्मणाशी बोलतांना श्रीरामांनी काढलेले हे उद्गार आहेत. यांत दानशी क्षत्रियांचा अथवा अन्य धनिकांचा व निस्पृह ब्राह्मणांचा आदर्श व्यक्त होते आर्य संस्कृतीत असणारे ब्राह्मणाचे स्थान समजून येते. रामराज्यांत पा ब्राह्मणांचा गौरव असाच योग्य प्रकारे होणे अत्यवश्य आहे असे श्रीरामाच या तोंडच्या शब्दामुळे स्पष्ट कळून चुकते.

home-last-sec-img