Literature

श्रीराम भद्रस्तोत्रम्‌ (उपनिषद्‌पठणाचे फळ)

(शार्दूलविक्रीडितवृत्तम्‌)

श्रीमद्रामपदारविन्दमधु ये भृङगाः सरागा अमी
सेवन्ते सनकाः शुकादिमुनयस्तेषां न काचित्‌स्पृहा।
श्रीमद्रामपदारविन्दमधुनो जानन्ति वै ते रसं
तत्स्वादात्परसौख्यदा भवति या सा स्यात्‌स्थितिर्नः सदा ।।1।।
हे श्रीरामप्रभुंच्या पदकमलांवरील मधु म्हणजे मध हे अतिशय पे्रमवेगाने प्राशन करितात, ते शुकदेव आदि मुनि त्यांना दूसरी कोठलीच इच्छा राहयली नाहीं. अर्थात्‌ ते त्या मधुसेवनाने संतृप्त झाले आहेत. ते त्या रामपदारविंदाचे मधुसेवनाने त्यांत जे सौख्य आहे तसे अन्यत्र नाही, असे सदा म्हणजे नेहमी साठीच समजतात. ।।1।।

ईशावास्यमिदं जगत्‌भवति भो जीवाः सुखान्वेषकाः
नास्त्यस्मिन्‌ सुखलेश इत्युत इह बूते श्रुतिर्मा गृधः।
भुञजीथा इतरां च रामपदवीं त्यक्तेन तेनाधुना
मोहो नास्ति न शोक इत्यपि भवेदेकात्मतादर्शने।।2।।
अरे भोळया जीवांनो सुखाचा पाठलाग करीत तुम्ही या ईश्वर व्याप्त जगांत (दिशाहीन होवून धावत सुटले आहात हा सारभूत अर्थ) विचरण करीत आहात. आमची श्रुतिमाता आम्हाला हात उंचाऊन सांगते आहे की ह्‌यांत सुखाचा लवलेशही नाही आणि तुम्ही त्यांत अडकून पडूं नका. तुम्ही त्या सर्व भोगसाधने आणि सुख ह्‌याचा उपयोग परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त करवून घेण्यासाठीच करा. स्वतः त्याची आसक्ति धरु नका. स्वतःसाठी सुखसाधने आहेत असे समजू नका आणि जर तुम्हाला ह्‌या प्रमाणे एकात्मतेचे दर्शन झाले म्हणजे परमेश्वर हा एकच कर्ता करविता आहे, आपण मात्र निमित्तमात्र आहोत, ही दृढभावना झाली तर मोह आणि शोक उत्पन्न होणार नाहीत. ।।2।।

शिष्यः पृच्छति केन खानि च मनः प्राणा गुरो चेशिताः
यच्छ्रोत्रं श्रवणस्य वाक्च वचसश्चित्तस्य चेतोपि तत्‌।
चक्षुर्गच्छति नो मनो न च वचो यत्रास्ति तत्को वदेत्‌
एतत्ते प्रभुरामरुपमगुणं यक्षात्मकं सर्वभृत्‌ ।।3।।
केन उपनिषदांत शिष्याने गुरुला विचारले की ”कश्याच्या सत्तास्फूर्तिनें प्रभुत्वाने हे मन, प्राण हलतात कार्य करतात ? डोळे, कान, नाक, श्वास घेणे, वाचणे, बोलणे, चित्ताने चेतविले जाणे हे कार्य होते ?” ही सर्व इंद्रिये प्रभूरामाच्या अदृष्य शक्तिनेच यक्ष कार्य करतो तसे आहे. त्यामुळेच ती इंद्रिये काम करितात. ।।3।।

श्रेयः प्रेय इति द्वयं खलु तयोस्तच्छ्रेय एवाभयं
धीरो यस्तु विरक्तचित्तविलयसन्धन्यः कृती चात्मवित्‌।
सूर्याचन्द्रमसौ न यत्र हुतभुग्‌ रामस्य तस्मिन्‌ पदे
शुद्धे शुद्धजलं यथा भवति सः स्वात्मैव वक्ति श्रुतिः।।4।।
श्रेय आणि प्रेय ह्‌या दोहोत श्रेय हे अभयकारी आहे. त्यांत दुःखान्त असा परिणाम नाही. त्यांत धीर पुरुष हे निर्मोही होऊन (विरक्त चित्त) आत्मस्वरुपाशी रमण करुन धन्य होतात. श्रीरामाच्या त्या पदास रामस्वरुपी ध्यान लावल्यावर सूर्य किंवा चंद्र हे प्रकाशित करीत नाही तर ज्या प्रमाणे शुध्द जल हे स्वभावतःच निर्मल असते, तसे ते श्रीरामपद स्वयंप्रकाशाने झळकत असते, असे श्रुतिवचन आहे. ।।4।।

तं वेद्यं पुरुषं हि वेद न परं वेद्यं न तन्मृत्युभिः
योऽस्यामेवतनौ विभाति सततं शुभ्रो भवत्यक्षरः ।
यज्ज्ञात्वा मुदमश्रुतेऽत्र सकलं भद्रं च सर्वज्ञताम्‌
तच्छ्रीरामपदस्वरुपममलं ज्ञेयं च गेयं पुनः ।।5।।
त्या महान्‌ श्रीरामतत्वाला (पुरुष) वेद आणि मृत्यु सुध्दा ज्ञात करुं शकत नाहीत. तो (पुरुष) ह्‌याच आपल्या मानव शरीरांत सतत्‌ निर्मळ (शुभ्र) अक्षर अविनाशी असे आत्मतत्व रुपाने अक्षररुपे विराजित असतो. ज्यास जाणल्यावर हे सर्वच लोक आनंदविभोर होवून सर्वज्ञतेची संतुष्टी प्राप्त करतात. म्हणून ते निर्मळ सर्व विकारहीन असे श्रीरामपद आम्ही समजून घेवून त्याचे गुणगान केले पाहिजे. ।।5।।

यद्‌ज्ञानाद्विदितं जगत्तदविकृद्धामस्वरुपं स्वयम्‌
विज्ञाय स्वगुरोर्मुखात्परमितो भिन्नं न वेत्ति क्वचित्‌।
सिन्धुं प्राप्य यथा न मुञचति नदी विद्वान परं विन्दते
यो वै तत्परमं च वेद सततं ब्रह्मैव स ब्रह्मवित्‌ ।।6।।
ज्याला समजून घेतल्यावर (रामपद महत्वाला) ह्‌या जगाच्या मूळ अविकृत रुपालाच जाणून घेतल्या सारखे होते. स्वगुरुच्या मुखांतून ज्याला समजून घेतल्यावर दूसरे कांही वेगळे तत्व जाणवतच नाही. ज्या प्रमाणे नदी समुद्राला जाऊन मिळाल्यावर तिचे पाणी त्या पाण्याशी एकरुप होवून अद्वितीय होते, तसेच त्या प्रभुरामाला ज्ञात केल्यावर तो साधक ब्रह्मरुपच होतो. तो प्रभुरामचंद्रापासून वेगळा रहात नाही. त्याशीच एकरुप होतो. ।।6।।

ओंङकारं व्यभजचश्रुतिर्वदति तदभुतं भविष्यद्गवत्‌
जीवेशौ च विभावयत्यपि पुनर्ब्रूते तयोरेकताम्‌।
यद्‌ज्ञात्वा नितरामभिन्नपदवीं प्राप्नोत्यमात्रां शिवाम्‌
शुद्ध ं तुयर्ि मदं स्फुटं ं परिमिति श्रीरामभद्रोव्ययः ।।7।।
आेंकार स्वरुपाचे ध्यान करता—करता त्या साधकास आपले जीव आणि शिव ह्‌यातील एकरुपत्व विदित होते. त्या (आत्मतत्वाचे) भूत, भविष्य हयांतील पण अक्षयतत्व ज्ञात होते. असे श्रूतिमाता सांगते. (श्रुति वेदांतील ज्ञान) त्यास जाणल्यामुळे साधक अद्वैत पदावर आरुढ होवून परम मंगल असे आनंदघन रुप प्राप्त करतो. हेच ते शुध्द मंगल अद्वय असे श्रीराम प्रभुचे पद होय. ।।7।।

संसारस्य च रेरिवा मम तु या कीर्तिर्गिरेरुन्नता
यतुर्ध्व जगतोऽस्य मूलमिति तद्‌ ब्रह्मात्ममद्रूपकम्‌।
यज्ज्ञात्वा स्वमृतं परं विभुरहं ब्रूते त्रिशङकुर्यतः
तच्छ्रीरामप्रदारविन्दभजने किं वा भवेद्दुर्घटम्‌ ।।8।।
ह्‌या सर्व जगताच्या मुळाशी माझे ब्रह्मरुप असे आत्मतत्वच आहे. हे ज्ञान ज्या वाणीमध्ये ओतप्रोत भरलेले आहे ती वाणी म्हणजे वेदवाणी ही आपली कीर्ति सर्वत्र पसरवून शोभायमान झाली आहे. आणि हेच ज्ञान ह्‌या संसाराला प्रेरित करुन पुढे पुढे वाटचाल करवून नेत आहे. इक्ष्वांकुवंशीय पितामह त्रिशंकु हयांची पण ही कीर्ति आत्मरुपाने अनन्ततत्व प्रदर्शित करुन ते अनन्ततत्व स्वयंप्रकाशी असे झळकत असल्याचे निर्देशित करते. आणि त्या श्रीरामप्रभुच्या पदकमलांचे कीर्तन (गुणगान) करणे ही काय मोठी कठीण गोष्ट आहे.? अर्थात तीच सर्वांत सहज स्वीकृत करण्या सारखी सोपी गोष्ट आहे. ।।8।।

आनंदात्समुदीर्य यान्बहुविधान्बाह्यान्परां श्वापरान्‌।
सत्यं ज्ञानमनन्तमक्षरमहं यो वेद निष्कामतः।
सर्वान्‌ सोऽश्रुत इत्यपि श्रुतिरहो बूते परं विन्दते
तत्‌ श्री रामपदं भजध्वमधुना ब्रह्मैव यन्निभयम्‌।।9।।
ह्‌या बाह्‌य भोैतिक समृध्दिच्या आनंदांत डुबक्या लावल्यावरसुध्दां त्या नंतर आम्हाला तितकी संतुष्टी किंवा शांति मिळत नाहीं. (उदा. गौतम बुध्द, श्रीराम आदि राजपुत्रांच्या जीवनावरुन हे सिध्द झाले आहे.) परंतु तीच संतुष्टी जास्त आणि टिकाऊ प्रमाणांत निष्कामभावनेने ते ब्रह्मतत्वाचे ज्ञान संपादन केल्यावर प्राप्त होते. हे श्रुतिमाऊलीने दाखवून दिले आहे. जे निर्भय असे ब्रह्म आहे. अर्थात ज्यांत कोठल्याही दुःखविकारांच्या स्पर्शाची भीति नाही अश्या
ब्रह्मपदास म्हणजे प्रभुरामचन्द्राचे पदास भजावे. ।।9।।

यत्सृिृ ष्टस्थितिपालनं विदलनं धृत्वापि साक्षी स्वयं
अन्नं प्राणमनोमतिभ्य इति तच्चानन्दकोशागतिम।
यन्मायारहितं चकास्ति सततं कार्यं न यस्मिन्‌ क्वचित्‌
तच्छ्री रामपदं भजामि नितरामानन्दमात्रं शिवम्‌।।10।।
जे तत्व स्वतःच्या अधिकाराने सृष्टी संचालन करते, म्हणजे जगाची उत्पत्ति, स्थिति (पालन) संहार तिन्ही कार्यास कारणीभूत असते, आनंद, प्राण, मति, मन आणि अन्न ह्‌यांत व्याप्त राहून त्यांस ही संचालित करिते आणि स्वतः माया रहित राहून निर्लिप्तपणे स्वयंप्रकाशी विराजते त्या प्रभुराम पदाचे ठिकाणी आहे, त्याचे मी सतत चिंतन करतो. ते प्रभुचरणपद हे अत्यंत आनंद—मंगलदायक आहे. ।।10।।

येनेदं मन इंन्द्रियाणि च तथा प्राणा जगज्जायते
जन्मादिष्वपि जाग्रदादिषु तथा यज्ज्ञापकं विस्फुटम्‌।
यस्मिन्सर्वजगत्प्रतिष्ठितमिदं रज्वां यथ हि भ्रमः
प्रज्ञानं प्रभुरामरुपमचलं तच्चिन्तये सिद्धये ।।11।।
अर्थ—— ज्यापासून हे मन इन्द्रियें तथा प्राण निर्माण होतात, जग उत्पन्न होते, जे तत्व जन्म घेण्याच्या आधीपासूनच अस्तित्वांत असते (म्हणजे आई च्या गर्भांत अचानक उत्पन्न होते) जाग्रत स्वप्न सुषुप्ति ह्‌या तिन्हीं काळांत जे द्रष्टा म्हणून उपस्थित असते, तसेच ह्‌या जगतांत जो सर्प रज्जु न्यायाने आभासित होतो, तो अहं भाव त्याला अहंकार म्हणतात, ते एक आत्मतत्व म्हणजे ब्रह्मतत्वाचाच एक अंश आहे हेच ते प्रभुरामचन्द्राचे पद चिंतन आहे. ह्‌याचे ज्ञान व्हावे म्हणून मी श्रीरामप्रभुंचे चिंतन करतो. ।।11।।

यो भूमा सुखमद्वितीयमधुना जानीहि तत्वं बृहत्‌
तच्छ्रीरामपदात्मरुपमिति यत्सूक्ष्माच्च सूक्ष्मं परम्‌।
श्रद्धत्स्वेति पुनश्च तत्वमसि भे्राबू्रते श्रुतिर्नैकधा
ज्ञात्वा स्वल्पमिदं हि मर्त्यमिह यत्सत्यं भजे तत्पदम्‌।।12।।
अर्थ—— तो ब्रह्मरुप ”भूमा” आहे, हे आत्मतत्व तूं जाण (समजून घे) ते श्रीरामरुप म्हणजे ब्रह्मात्म रुप असून सूक्ष्मांत सूक्ष्म अश्या रुपांत पण ते प्रकट झालेले असते आणि श्रुति हे तत्व अनेकदा सांगत आहे कीं ”तत्‌ त्वं असि” तूं तेच ब्रह्मतत्व आहेस, जे स्वल्प आहे. जे जड आहे ते मर्त्य आहे. आणि त्यांतील जे अविनाशी तत्व आहे त्यांचे तूं चिंतन कर. ।।12।।

ब्रह्माग्रे यदवेदहं पुनरिदं तत्सर्वमेवाभवत्‌
नास्त्यस्मादपरं यतो जगदिदं ब्रह्मैव सर्वम्‌ खलु।
तद्योऽबुध्यत सोऽभवत्तदपरं नासीत्स एवाद्वयः
ज्ञात्वा श्रीगुरुरामरुपमभयं चाश्रित्य धन्या वयम्‌।।13।।
अर्थ———ब्रह्मतत्वास सर्वांत प्रथम ”अहं” हे स्फुरण झाले. नंतर हे सर्व जग उत्पन्न झाले आणि हे सर्व जगत्‌ म्हणजे ब्रह्मच आहे. ज्याने हे जाणले तो त्यानंतर झाला. तो ब्रह्मतत्वाशी एकरुप नव्हता, स्वतःला वेगळे समजला. मात्र ह्‌या रामरुपाला जाणल्यावर आम्हास अभय प्राप्त होते व आम्ही धन्य होतो. ।।13।।

दशोऽपनिषदां सारं श्रीरामस्तवमुत्तमम्‌।
यः पठेच्छूणु याभक्त्या मुक्तिभाक्स भवेद्‌धु्रवम्‌।
जो हे उपनिषत्सार भक्तियुक्त अंतःकरणाने पठण करेल आणि श्रवण करेल त्याला निश्चितपणे मुक्ती प्राप्त होईल.

।।इति दशोपनिषत्सारश्रीरामभद्रस्तोत्रं सम्पूर्णम्‌।।

(श्रीमत्‌ प.प.श्रीधरस्वामी महाराज, सज्जनगड, यांच्या मूळ संस्कृत श्लोकांचा मराठी अनुवादअनुवादकः सौ. नलिनी प्रभाकर पाटिल, इंदूर)

home-last-sec-img