Literature

श्रीराम

भवान्मे प्रियकामार्थं वचनं यदिहोक्तवान् ।

अकार्य कार्यसंकाशमपथ्यं पथ्यसंनिमम् ॥ २ ॥

( वा. रा. अयो. ११०)

हे जात्रालि ऋषिवर्या ! मला होणारें या बनवासाचे दुःख चुकवून मला कसेंतरी अयोध्येच्या सिंहासनावर एकदां बसवायें या सदुद्देशाने आपण असे उपदेशिले असले तरी यामुळे अकार्य तेच कार्य व अपय्य तेच पव्य म्हणून उघड उपदेशिल्याप्रमाणे झाले आहे. अकर्तव्य तेच कर्तव्य व अहित तेच हित म्हणून आपण मला कळवीत आहां.

निर्मर्यादस्तु पुरुषः पापाचार समन्वितः ।

मानं न लभते सत्सु भिन्नचारित्र्यदर्शनः ॥ ३ ॥

धर्माचे बंधन तोडून मन मानेल त्याप्रमाणे पापक आचरणारा चारित्र्यहीन होतो. सज्जनांत त्याची छी:यू होते. सर्वच त्याची निंदा करूं लागतात. जगांत त्याचे तोंड काळे होते. इहपरसुखांनाहिं तो आंचवतो.

कुलीनमकुलीनं वा वीरं पुरुषमानिनम् ।

चारित्र्यमेव व्याख्याति शुचिं वा यदि वाऽशुचिम् ॥ ४ ॥

मनुष्याची त्याच्या चारित्र्यावरूनच परीक्षा होते. हा कुलीन वा अकुलीन वीर वा भ्याड पवित्र किंवा गलिच्छ हे त्याच्या आचरणावरूनच स्पष्ट होते.

अनार्यस्त्वार्यसंस्थानः शौचाद्धीनस्तथाशुचिः 

लक्षण्यवदलक्षण्यो दुःशीलः शीलवानिव ॥ ५ ॥

अधर्म धर्मवेषेण यद्यहं लोकसंकरम् ।

अभिपत्स्ये शुभं हित्वा क्रियाविधिविवर्जितम् ॥ ६ ॥

कश्चेतयानः पुरुषः कार्याकार्यविचक्षणः । 

बहु मन्येत मां लोके दुर्वृत्तं लोकदूषणम् ॥ ७ ॥ ( वा. रा. अयो. कां. स. ११०)

अनार्याचे आचरण ठेवून घेऊन आर्याच्या वर्तनाचा डोलारा, माजविला, अशुद्ध आचरण आंत ठेवून वरपांगी शुद्ध आचार दाखविला, अवलक्षणी असून बरबर महान् लक्षणसंपन्न म्हणून बतावणी केली, दुःशील असून सुशील म्हणून मिरविलें, धार्मिकाच्या वेषाने मी लोकसंकरकारक अधर्म जगांत वाढविला, शुमकारक शास्त्रीय क्रिया सोडून बुद्धिपुरःसर अशास्त्रीय क्रियांकडे बलों, तर अशा मला दुईताला कार्याकार्यविचक्षण असा कोण तेजस्वी पुरुष मान देईल ?

हे जाबालि मुनि महाराज ! मनुष्य एकटाच जन्मून एकटाच मरतो, कोणाकडून काय व्हावयाचे आहे मातापिता, गुरुदेव, बंधुबांधव यांची भीड ठेवून तरी काय उपयोग, शेवटी कोणाचा कोण ? आपलाच आपण. जन्माला कारण असणाऱ्या मातापित्यांचे वचन कसें उलंघावें म्हणाल, तर मातापिता हे जन्माला कारण नव्हेतच; रजोरेताच्या मिश्रणानेच गर्भ राहतो; खरें म्हटलें म्हणजे याला कामच कारण आहे. इत्यादि जे तुम्हीं सांगतां तें पटण्या सारखे नाही.

अथाधिप्रजम् । माता पूर्वरूपम् । पिता उत्तररूपम् । प्रजा संधिः । प्रजनन संधानम् । इत्यधिप्रजम् ॥ (तैत्तिरीय शिक्षा अ. ३३ ). क्षेत्रभूता स्मृता नारी बीजभूतः स्मृतः पुमान् । क्षेत्रवीजसमायोगात् संभवः सर्वदेहिनाम् ॥ (मनु. ९/३३).

 पीक यावयाला सुक्षेत्र व उत्तम बीज या दोन्हींची आवश्यकता असल्याप्रमाणे प्रत्येकालाच आईवडिलांची अपेक्षा असते. कामानेच सृष्टि होते, तर कांहीं व्यंग नसतांनाहि कित्येकांना कां पुत्र होत नाहीत ? राजा दशरथानें शेवटीं पुत्रकामेष्टि याग संपादूनच आम्हां पुत्रांचा लाभ करून घेतला की नाही ? नवमास बागवून लहानाचे मोठे करून जे इतके कष्ट आई सोसते, वडील संगोपन करतात तें व्यर्थच का ? त्यांच्याशिवाय मुलाला जगणे तरी शक्य आहे का ? आपल्या तळहाताचा फोड करून, आपल्या पोटाला चिमटा घेऊन, आपल्या तोंडचा घांस काढून, वान्यति, पावसांत, उन्हांत, आपले नेसलेलें वस्त्र पांघरून, आईबाप जे मुलाला इतक्या मोहानें बाढवितात त्या उपकाराचे स्मरण मुलानें ठेवलें नाहीं तर तो कृतघ्न होणार नाही का ?

यं मातापितरौ क्लेशं सहेते संभवे नृणाम् । 

न तस्य निष्कृतिः शक्या कर्तुं वर्षशतैरपि ॥

मुलाच्या बाबतीत आईबापांनी जे कष्ट सहन केलेले असतात, शेंकडों वर्षांच्या सेवेनेंहि पण त्यांची निष्कृति होणे शक्य नाही. मातृदेवो भव, पितृ देवो भव, आचार्यदेवो भव । आईच्या ठिकाणी देवताबुद्धि ठेव, वडिलांच्या ठिकाणीं देवताबुद्धि ठेव, आचार्यांच्या ठिकाणी देवताबुद्धि ठेव म्हणून जें श्रुति सांगते तें उगीच का ? ‘ आचार्यः प्लावयितां आचार्य हा भवसमुद्र तारक असतो आणि म्हणूनच ‘गुरुगरीयान् पितृतो मातृतश्चेति मे मतिः । तो आईबापापेक्षांहि श्रेष्ठ असतो. संसारतारक वेदज्ञान ब्राह्मणापासून मिळतें, देवापितृकार्ये त्याच्यामुळेच होतात. इतर वर्गांचे ते एक छत्र असते. त्यांच्या तपःशक्तीने इतरांचे रक्षण होतें. म्हणून ब्राह्म णांना ‘ भूसुर’ अथवा ‘ भूदेव’ असे म्हणतात. आचार्य च प्रवक्तारं पितरं मातरं गुरुम् । न हिंस्याद् ब्राह्मणान्गाश्च सर्वाश्चैव तपस्विनः || (मनु. ४ १६२) उपनयनपूर्वक वेद शिकविणारा म्हणजेच आचार्य, वेदार्थ विवरून सांगणारा प्रवक्ता, गायत्रीचा उपदेश देणारा पिता, प्रथमगुरु म्हणवून घेणारी माता व महावाक्याचा उपदेश देऊन परमात्मैक्य साधून देणारा सद्गुरु, सदाचरणी वेदविद् ब्राह्मण आणि गोमाता व सारेच तपस्त्री यांना विरुद्ध बागवूं नये की यांच्याविरुद्ध जाऊं नये, म्हणून मनु महाराजांनी सांगितले आहे. आमच्या सूर्यवंशाचा आद्य पुरुष म्हणजेच मनु. याची ही अशी आम्हांला शिकवण आहे. ब्रह्मदेवाच्या दक्षिणांगापासूनच याची उत्पत्ति मग याचे महत्त्व किती असणार. तोच म्हणतो तयोर्नित्यं प्रियं कुर्यादा चार्यस्य च सर्वदा । तेष्वेव त्रिषु तुष्टेषु तपः सर्व समाप्यते ॥ ( मनु.) २ २२८. ) प्रति दिवशी आईवडिलांचे प्रिय आचरावें, सदैव आचार्याचे ‘ प्रिय करावें. या तिघांची तृप्ति झाली की सर्व तपाची पूर्ति झाली. तेषां त्रयाणां शुश्रूषा परमं तप उच्यते । न तैरनभ्यनुज्ञातो धर्ममन्यं समाचरेत् ॥ (मनु. २।२२९. )-या त्रिवर्गाची शुश्रूषाच श्रेष्ठ तप आहे. त्यांच्या संमतीशिवाय त्यांची शुश्रूषा सोडून इतर धर्माचे आचरण करूं नये. त्रिष्चप्रमाद्यन्नेतेषु त्रील्लोका विजयेद्गृही । दीप्यमानः स्ववपुषा देववद्दिवि मोदते ॥ (मनु. २।२३२.) यांच्या शुश्रूषेत कसला प्रमाद नाही झाला म्हणजे तीन्ही लोकांत त्या गृहस्थाश्रम्याचा जयजयकार होतो. तीन्ही लोकांत तो विजयी होतो. सूर्याप्रमाणें दिव्य तेज प्राप्त होऊन त्या दिव्य देहानें तो स्वगत आनंदानें नांदतो. त्रिष्वेतेष्वितिकृत्यं हि पुरुषस्य समाप्यते । एष धर्मः परःसाक्षाडुपथमोऽन्य उच्यते  २३७  आचार्यों ब्रह्मणो मूर्तिः पिता मूर्तिः प्रजापतेः । माता पृथिव्या मूर्तिस्तु भ्राता स्वो मूर्तिरात्मनः २२६ पिता वै गार्हपत्योऽग्निर्माताग्निदक्षिणः स्मृतः । गुरुराइवनीयस्तु साग्नित्रेता गरीयसी २३१॥ (मनु. २) इत्यादि असे आई वडील गुरु आचार्य व बंधु यांबद्दलचे अजून कितीतरी श्लोक मनूने लिहून ठेवले आहेत. मनूला कांहीं समजत नव्हते का यन्मनुरवदत्तद्वेषजम् । मनूने सांगितले ते निःसंशय भवरोगाचे औषध म्हणूनच समजावें असें उगीच का श्रुति सांगते?

गुरोर्यत्र परीवादो निन्दा वाऽपि प्रवर्तते । कर्णौ तत्र पिघातव्यौ गंतव्यं वा ततोऽन्यतः ॥ २०० ।। परीवादात्खरो भवति भ्वा वै भवति निंदकः । परिभोक्ता कृमिर्भवति कीटो भवति मत्सरी || २०१॥ (मनु. २) गुरुनिंदेविषयी मनूने किती सांगितले आहे ते पाहा ! गुरुची थट्टा अथवा निंदा चाललेली असली तर ती ऐकूं नये, कान झांकून घ्यावेत व सरळ तेथून निघून जावें. गुरूची थट्टा केल्याने पुढच्या जन्मीं शिष्य गाढव होतो, निंद केल्याने कुत्रा होतो. सेवेविरहित गुरूच्या धनअन्नादिकांनी जगणारा कृमी होतो आणि गुरूच्यां मत्सराने किडा होतो, हेंहि सर्वांनी लक्षांत ठेवण्यासारखे आहे. तुमचे सांगणे मी मानणे म्हणजे अकुलीनाप्रमाणे वागून कुलीन, अनार्याप्रमाणे वागून आर्य, अपवित्राप्रमाणे वागून पवित्र कुलक्षणी मनुष्याप्रमाणे वागून सुलक्षणी, दुःशील मनुष्याप्रमाणे वागून सुशील म्हणवून घेणे होय. धर्माच्या पडद्याआड लोकसंकरकारक, अविधि व अनाचाराचे धर्मशून्य आचरण, मी चालविलें तर, कोणता कार्याकार्याचे ज्ञान असणारा सन्मान्य विद्वान् दुर्वृत्त व लोकानिय अशा मला सन्मान देईल ? राजा म्हणून माझी श्रेष्ठता मानील? माता, पिता, गुरुदेव इत्यादींना मानून राज्यसुखाचा त्याग करून माझ्याप्रमाणे असल्या वनवासाचे कष्ट अनु भविणारा केवळ मूर्खच होय ! त्याचे डोके ठिकाणावर नाही म्हणून तुम्ही मला म्हणतां ! मातापिता यांचे वचन खरें केलें पाहिजे, त्यांची आज्ञा पालन केली पाहिजे, हें वेड डोक्यांत ठेवून विनाकारण दुःख भोगणे हा एक श्रमच नव्हे का ? असे मला विचारतां मातापित्यांचे वचन, त्यांची आज्ञा, त्यांची संपत्ति, त्यांचे राज्य, या सर्व भावना टाकून दिल्या पाहिजेत; वयांत आल्यावर या सर्व संपत्तीचा स्वतः मालक व्हावे म्हणून सांगतां ! राज्य इत्यादि सर्व सोडून, गृहस्थाश्रमाला अयुक्त असे अति कष्टप्रद वानप्रस्थाश्रमाचे आचरण करीत अरण्यांत तूं कां राहावेंस, म्हणून प्रश्न करतां ! याला मी काय म्हणावें ! वडिलांचे वचन सत्य करण्याकरितां व सापत्न आईची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याप्रमाणेच मी प्रतिज्ञा केली; व ती प्रतिज्ञा तडीस नेण्यास या तापसवेशानें मी अरण्यांत आहे. ‘सत्यं वद, धर्म चर । ‘ सत्य बोल, धर्मानें चाल म्हणून श्रुतीची आज्ञा आहे. सत्य आणि धर्म हे दोन्ही अजीबात नष्ट होतील तर जगद्व्यापारच थांबेल. एकहि कार्य पार पडणार नाहीं. येतों, जातों, राहतों, करतों या दुसऱ्याच्या वचनावर विश्वासूनच सर्व व्यवहार करतात. सारेच खोटे बोलावयाला लागले, बोलण्याविरुद्ध बागूं लागले तर परस्परांचे जीवनच खुंटेल. थोड्या फार सत्याच्या आचरणानेंच मनुष्य व्यवहार टिकून असतो.

अनुव्रतः पितुः पुत्रो मात्रा भवति संमतः ।

जायापत्ये मधुमतीं वाचं वदतु शांतिवाम् ॥ १॥

मा भ्राता भ्रातरं द्विक्षन मा स्वसारभुत स्वसा । 

सम्यञ्च: सव्रता भूत्वा वाचं वदत भद्रया ||२||(अ. वे. पै. शा: ५।१९.)

–पित्याच्या व्रताचें व वचनाचे पुत्रानें पालन करावें. आईची आज्ञा पाळावी. पत्नीने आपल्या पतीशीं शांतिसमाधानाचे मृदुमधुर भाषण करावें. बंधुबंधूंतून द्वेष नसावा. बहिणीबहिणींतून द्वेष नसावा. सर्वांनी ऐक्य राहावें. अव्याभिचार, सत्य इत्यादि व्रतांनी सर्वहि युक्त असावेत व सर्वांशीं सर्वांनीं शुभ आणि गोड बोलावें, असें श्रुति सांगते.

‘ सर्व वैभवांनी समृद्ध अशा अयोध्येत पट्टाभिषेक करून घेऊन स्वगत असणाऱ्या इंद्राप्रमाणें सुखाने राहा. तुझा दशरथाशीं कांहीं संबंधहि नाहीं; तो वेगळा तूं वेगळा. तो मरण पावून जावयाचें तिकडे निघून गेला. त्याच्या मरणानंतर तोच नाही असे झाल्यावर त्याचा संबंध काय राहातो पंचभूतात्मक देह पंचभूतांत मिळून गेल्यावर मेलेला शिल्लक कुठे राहातो ? तोच शिल्लक नसतांना त्यानें स्वतःच्या पत्नीला दिलेल्या वचनाचे पालन तूं केलें नाहीस तर त्याला तरी नरक कसा प्राप्त होणार ? असा प्रश्न आपण घालतां. ‘ रजरेतांच्या मिश्रणानेंच गर्भात जन्म होतो. खरें म्हटलें म्हणजे याला कामच कारण आहे,’ असा सिद्धांत आपण स्थापतां याला काय म्हणावें शरीरं वाव किलेदं म्रियते न जीव इति । शरीर मात्र मरण पावतें त्यांत असणारा जीव मरत नाही. अविनाशी वा अरेग्यमात्मा हा आत्मा अमर आहे. स इह प्रविष्ट आनखाग्रेभ्यः | तो अविनाशी आत्माच शरीराच्या नखशिखांत व्यापून आहे. देहोहमीत मिथ्याध्यास वशाजीवः | त्या अशरीर अविनाशी आत्म्याला केवळ मी देह , या कल्पनेनें जीवभाव येतो. पुण्येन पुण्यं लोकं गच्छति पापेन पाप सुभाभ्यामेव मनुष्यलॊकम् ।-पुण्यकर्माच्या योगानें तो स्वर्गादि पुण्यलोकांना जातो. पापकर्माच्या योगानें नरक लोकांना जातो. पापपुण्याचे समप्रमाण झालें असतां तो मर्त्य लोकाला येऊन मनुष्य होतो. ज्ञात्वा तं मृत्युमत्येति । याला स्वरूपभूत चित्सुख परमात्म्याचे ज्ञान झाले असतां तो मृत्यूला ओलांडून जातो. म्हणजे अविनाशी परमात्माच होतो. न तस्य प्राणा उत्क्रामन्ति अत्रैव समवलीयन्ते । – त्याचे प्राण कोणत्याहि लोकाला न जातां ठायींच्या ठायीं विरघळतात. न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते पुनर्नाभिजायते पुनर्नाभिजायते । पुन्हां तो जन्माला कधींच येत नाहीं, पुन्हां तो कधींच जन्माला येत नाही म्हणून श्रुति दोनदोनदां सांगते. जीवाचें ‘मी’ हैं भान सर्व देहांत व्यापून असतें. अहं कर्ता, अहं भोक्ता, अहं बद्ध, अहं मुक्तः ।  मी कर्ता, मी भोक्ता, मी बद्ध, मी मुक्त म्हणून त्याचा व्यवहार असतो. देह जड आहे त्यामुळे हा ‘मी’ म्हणणारा देह नव्हे. शवांत मीपण दिसून येत नाही. देहामुळेच ‘मी’ उद्भवतें, असें म्हटल्यास तो देह दहनापर्यंत तिथेच निश्चेष्ट पडून असतो. त्यांत ‘मी’ ही भावना कां दिसून येत नाहीं? यावरून ‘कांहीं तरी’ प्रवेशून कांहीं काळ देहांत राहातें व शेवटीं देहाला सोडून जातें व तें ‘मी’ या आपल्या जाणीवेनें देहाहून विलक्षण असे देहांत असतें, असें युक्तीनेहि कळून येतें. कर्मानुगो गच्छति जीव एकः । देहाची व देह सुखाची कल्पना असेपर्यंत तो वस्त्राप्रमाणे देह सोडून कर्माप्रमाणे फळ भोगण्यास, इच्छेनें दुसऱ्या गांवास गेल्याप्रमाणे लोकांतरास जातो व देहात्म भावाचा निरास होऊन देहसुखाची कल्पना नष्ट झाली की या वासनेनें लाभणारें जन्ममरण नाहींसें होऊन परमात्मस्वरूप ज्ञानानें त्या चित्सुख स्वरूपाशीं अभिन्न होऊन राहातो व त्या वेळीं तो मुक्त म्हटला जातो. हैं युक्तीनेंहि, श्रुतिप्रमाणानेंहि व माहात्म्यांच्या अनुभवानेंहि सिद्ध होते व तुमचा देहात्मवाद सूर्योदयाच्या नंतर निशा नष्ट झाल्याप्रमाणे शिल्लक राहात नाही. पुढे कोणतें तरी मोठें सुख मिळेल त्यासाठी धर्माचरण मुख्य आहे इत्यादि भावना करून त्याच्या आशेनें सहजगत्या मिळालेलें सुख सोडून दुःख अनुभवीत विनाकारण कां मरावें ! जिवंत असतांनाच दुःख भोगणारे मेल्यावर तर तिथे हें कोणतेंहि सुखाचे साधन नसल्यामुळे कसचें सुख अनुभवितात त्यांना जिवन्त असतांनाहि दुःख आणि मेल्यावरहि दुःखच हे धर्मशास्त्राचे वचन मानणे अगदी फोल आहे म्हणून तुमचे सांगणे कोणालाहि पटत नाहीं. त्याग एवातिरिच्यते । यज्ञदानप्रजननादि सर्व साधनांपेक्षां त्यागच श्रेष्ठ म्हणून श्रुतीचे सांगणे आहे. आनंदस्वरूपांत दुःखरूप प्रपंचाचा केवळ आरोप आहे व त्याच्या त्यागानें केवळ आनंदाची प्राप्ति होते, हें युक्तीलाहि पटून त्यागाचे महत्व जाणवते. प्रपंचांत दुःखाचेच अनुभव येत असल्यामुळेहि याहून विलक्षण सुखाची इच्छा होणे व त्याकरितां हें सर्व सोडून प्रयत्न करणेंहि ऐहिक जीवनांत सहज दिसून येणारा धर्म आहे, हेंहिं पण लक्षांत येतें.

मेल्यानंतर त्याचे श्राद्ध करावयाला तोच राहात नाहीं असे झाल्यावर त्याला पोहोचावें म्हणून या ब्राह्मणांना अन्न घालण्यांत काय अर्थ आहे ? आणि तेंहि त्याला मिळत नाही असे एकदां ठरल्यावर ब्राह्मणांना पोटभर जेवण घालून आपले अन्न व्यर्थ खर्च करणें हें कोणतें व्यवहारचातुर्य ! एकाच्या जेवण्याने दुसऱ्याचे पोट भरतें तर मरण पावल्यानंतर केलेले हें श्राद्ध जिवंत असतांनाच केलें तर काय हरकत आहे ? दूर प्रवासांत असणाऱ्याच्या नांवानें घरांत कोणाला तरी पोटभर वाढले तर तिथे त्याचे पोट कां भरूं नये ? या तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून आईबापांच्या उपकाराची फेड करावी या दृष्टीने असे तोपर्यंत ऋणी होऊन अन्नपानादिकांनी त्यांची सेवा केल्या प्रमाणे त्यांच्या मरणोत्तरहि देह असेपर्यंत श्रुतीच्या विधानाप्रमाणे श्राद्धपक्षादि मुलगा करतो. पितर मुक्त होऊन पितरांच्या नांवानें श्राद्धपक्षादि केल्यास अर्यमादि नित्य पितरांची ती उपासना होते व त्यांच्या कृपेनें गृहस्थांना संतति-संपत्तीचा लाभ होतो असे शास्त्रवचन असल्यामुळे व पुन्हां मुक्त न आलेले पितर पितृलोकांत असतात व मनुष्यमानाचे एक वर्ष म्हणजे पितृ मानाचा एक दिवस होत असल्यामुळे वर्षोवर्षी केलेलें श्राद्ध म्हणजे त्यांना रोजचें भोजन होतें असें श्रुतीचे सांगणें आहे. यमराज्ञः पिताच्छ (शतपथ १८|२|४६) यमाय पितृमते स्वधा नमः । (शतपथ २८।२।७४ ) अधामृता पितृषु संभवन्तु । ( अथर्व. १८|४|४८). इत्यादि

वाक्यांवरून मरणोत्तर पितरांचे अस्तित्व सिद्ध होते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । म्हणून तैतिरीय उपनिषदामध्येहि आज्ञापिले आहे. ही धर्म शास्त्राची वचनें तुला कशाला हवीत ? दानधर्माच्या विधानांनी युक्त असे सर्व ग्रंथ आपले जीवन सुखाने चालावे म्हणून ब्राह्मणांनी करून ठेविले आहेत. यज्ञ करा, दान द्या, कष्ट करा, सर्व सोडा हे सर्व बुद्धिवंतांनी आपल्या स्वार्थ करितां सांगितलेले विचार आहेत हे सर्व खरें धरून बसून उपयोग नाही प्रत्यक्ष येथें मिळणारें सुख सोडून कांहीं तरी कष्ट सोसले तर, पुढे सुख मिळेल अशी कल्पनाहि करूं नये ‘ चल ! अयोध्येला येऊन सुखानें राज्य कर म्हणून हे जाबालि मुने ! हे तुमचे बोलणे म्हणजे केवळ नास्तिकपणाचें आहे. हे मत व वर्तनक्रम ऐकून कोणाला चांगला म्हणून वाटला तरी विष मिश्रित पक्वान्नाप्रमाणे तो त्याज्य आहे. तुमच्या विधानाला खरें सुख आणि खरी शांति देणाऱ्या दिव्य वेदशास्त्रांचा आधार नाहीं.

देवपितृमनुष्याणां वेदश्चक्षुः सनातनम् । देव, पितृ, मनुष्य या सर्वांना वेद म्हणजे डोळेच आहेत असें मनु महाराज म्हणतात.

वेदविरुद्ध असलेले वर्तन करण्यास गेलें तर, चांगले सोडून जाणून बुजून वाईट व अशुभ मार्गास लागल्याप्रमाणे होईल. अशा अधर्माचा मार्ग धरून सज्जनांच्या द्रोहाला पात्र होणारा मी भ्रष्ट होईन, दुःशील होईन, दुःखी होईन, आपले हित गमावून दुसऱ्यालाहि कंटकप्राय होईन. श्रीरामाचे पवित्र जीवनच यामुळे नासून जाईल. विवेक- विचार असणारा कोणीहि माझा गौरव करणार नाही. माझें त्या वेळचे आचरण लोकांना तारक न होतां मारक होईल. मी स्वतः नासून दुसऱ्यांनाहि नासून टाकनि. येथेहि अपकीर्ति होऊन मेल्यावरहि मला नरकप्राप्ति चुकणार नाही. 

home-last-sec-img